Protein Digestion: प्रथिने आणि फायबर समृद्ध अन्नपदार्थ भूक वाढवण्यासाठी उत्कृष्ट असतात. चेन्नईच्या श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्चमधील क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आणि लेक्चरर सीव्ही ऐश्वर्या यांच्या मते, पनीर आणि छोलेसारख्या उच्च-प्रथिने पर्याय भूक नियंत्रित ठेवून रक्तातील साखरेची पातळी स्थिर करतात, परंतु सर्वांची पचनक्रिया सारखी नसते. अनेकदा लोकांना प्रोटीनयुक्त पदार्थ पचवण्यास समस्या निर्माण होतात.
एस्टर सीएमआय हॉस्पिटल, बंगळुरूच्या क्लिनिकल न्यूट्रिशन अँड डायटेटिक्सच्या प्रमुख एडविना राज यांनी सांगितले की, पाचन समस्यांमध्ये प्रामुख्याने पोट फुगणे, गॅस आणि पोटदुखी यांचा समावेश होतो. त्यापलीकडे काहींना थकवा, स्नायू कमकुवतपणा आणि वजन कमी होणे या समस्यादेखील निर्माण होऊ शकतात.
प्राग्मॅटिक न्यूट्रिशनच्या मुख्य पोषणतज्ज्ञ मीनू बालाजी यांनी खालील पाच संकेत सूचीबद्ध केली आहेत, जी आपल्या शरीराला प्रथिने पचण्यात अडचण येत असल्याचे सूचित करतात:
१. पोट फुगणे किंवा गॅस : पोट फुगणे हे सर्वात सामान्य लक्षण आहे. जेव्हा प्रथिने पूर्णपणे पचत नाहीत तेव्हा ते आतड्यांमध्ये आंबू शकतात, यामुळे गॅस आणि सूज येते.
२. जेवणानंतर थकवा : अकार्यक्षम पचन आणि ऊर्जा वळवल्यामुळे जास्त प्रथिनेयुक्त अन्न खाल्ल्यानंतर तुम्हाला थकवा येऊ शकतो.
३. वारंवार अपचन किंवा छातीत जळजळ : हायड्रोक्लोरिक ॲसिडद्वारे प्रथिने पचन पोटात सुरू होते. त्यामुळे तुम्हाला अपचन किंवा छातीत जळजळ यासारखी लक्षणेदेखील जाणवू शकतात.
४. कमकुवत केस, नखे किंवा त्वचा : खराब प्रोटीन पचन म्हणजे कमी अमिनो ॲसिड शोषले जातात, ज्यामुळे कमकुवतपणा, ठिसूळ नखे, केस पातळ होतात आणि त्वचेचे आरोग्य खराब होते.
५. स्नायू दुखणे किंवा खराब पुनर्प्राप्ती : त्याचप्रमाणे जेव्हा पुरेसे अमिनो ॲसिड उपलब्ध नसते, तेव्हा स्नायूंचे नुकसान होऊ शकते. शिवाय व्यायाम केल्यानंतर तुमच्या रिकव्हरीवर परिणाम होईल.
प्रथिने सहज पचण्यासाठी तुम्ही काय करू शकता?
प्रथिनांचे सहज पचन सक्षम करण्यासाठी राज यांनी सांगितले की, कमी पौष्टिक घटकांसह एन्झाईम्सचा पुरेसा स्राव महत्त्वाचा आहे. भिजवलेले, अंकुरीत केलेले वनस्पती-आधारित प्रथिने पचण्यास मदत होते. एका वेळी कमी खाणे आणि अन्न योग्य प्रकारे चावून खाणेदेखील मदत करते.
“जर शरीराद्वारे प्रथिने योग्य प्रकारे पचली जाऊ शकत नाहीत, तर तुमच्या शरीरात अशी कमतरता निर्माण होईल, ज्यामुळे स्नायू आणि आरोग्य या दोघांनाही हानी पोहोचू शकते. म्हणून तुमच्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टचा सल्ला घ्या. नोंदणीकृत आहारतज्ज्ञांच्या मदतीने, प्रोबायोटिक्सच्या नैसर्गिक स्रोतांचा समावेश करून आणि तुमच्या आतड्याला सूज आणणारे अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्न टाळून तुम्ही प्रथिने पचनक्षमता सुधारू शकता, ज्यामुळे तुमचे शोषण खराब होते,” असे राज म्हणाले.
त्यांनी सांगितले की, प्रथिने शोषण आणि संपूर्ण आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही हायड्रेटेड राहा आणि जास्त अन्नपदार्थ खाण्यावर नियंत्रण ठेवा.