नाश्ता दिवसातील सर्वात महत्त्वाचे जेवण म्हणून मानतात, जे तुमच्या ऊर्जेच्या पातळी आणि चयापचयासाठी कसे होईल हे ठरवते. सर्व नाश्त्याचे पर्याय सारखे नसतात. काही पदार्थ हृदयाच्या आरोग्यासाठी विशेषतः हानिकारक असू शकतात.
आपण रोज नाश्ता साठी खात असलेले अनेक लोकप्रिय पदार्थ सोयीस्कर किंवा आनंददायी वाटू शकतात, परंतु नियमितपणे सेवन केल्यास त्यांचे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
नवी दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमधील कार्डिओथोरॅसिक आणि हार्ट अँड लंग ट्रान्सप्लांट सर्जरीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. मुकेश गोयल यांच्या मते, “सकाळी नाष्ट्यासाठी सामान्यतः खाल्ले जाणारे काही पदार्थ हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि इतर हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजारांच्या विकासास हातभार लावू शकतात.”
डॉ. गोयल यांच्या मते, हृदयाच्या आरोग्यासाठी सर्वात वाईट नाष्ट्याचे पाच पर्याय खाली दिले आहेत:
१. जास्त साखरे असलेले तृणधान्ये (High-Sugar Breakfast Cereals) :
हे तृणधान्ये सोयीस्कर असू शकतात, परंतु त्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रक्तातील ग्लुकोजच्या पातळीत जलद वाढ होते. यामुळे इन्सुलिन प्रतिरोध, जळजळ आणि लठ्ठपणा आणि टाइप २ मधुमेहाचा धोका वाढू शकतो – हे दोन्ही हृदयरोगासाठी महत्त्वपूर्ण जोखीम घटक आहेत.
२. प्रक्रिया केलेले मांस उत्पादने (Processed Meat Products) :
बेकन आणि सॉसेजसारख्या पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅट्स (saturated fats) आणि सोडियमचे प्रमाण जास्त असते. डॉ. गोयल यांच्या मते, महामारी विज्ञानाच्या अभ्यासात प्रक्रिया केलेले मांस नियमित सेवनाचे कोरोनरी हृदयरोग आणि उच्च रक्तदाबाच्या वाढीव जोखमीशी संबंध दिसून आले आहेत. या उत्पादनांमधील नायट्रेट्स एंडोथेलियल डिसफंक्शनमध्येदेखील योगदान देऊ शकतात, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका आणखी वाढतो.
३. पेस्ट्री आणि डोनट्स (Pastries and Doughnuts) :
या लोकप्रिय नाश्त्याच्या पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट्स आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. ट्रान्स फॅट्स एलडीएल (वाईट) कोलेस्ट्रॉल वाढवतात आणि एचडीएल (चांगले) कोलेस्ट्रॉल कमी करतात, ज्यामुळे लिपिड प्रोफाइलवर नकारात्मक परिणाम होतो. या पदार्थांचे उच्च ग्लायसेमिक इंडेक्स (High glycemic load) इन्सुलिन प्रतिरोध आणि कालांतराने हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी समस्यांनादेखील कारणीभूत ठरू शकते.
४. फुल-फॅट क्रीम चीज (Full-Fat Cream Cheese) :
जरी ते चविष्ट असले तरी फुल-फॅट क्रीम चीजमध्ये सॅच्युरेडेट फॅट्स भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते, ज्यामुळे एथेरोस्क्लेरोसिसचा धोका वाढतो – हृदयरोगासाठी एक प्रमुख घटक.
५. आर्टिफिशिअल, फ्लेवर्ड डेअरी क्रीमर्स (Artificial, Flavoured Non-Dairy Creamers):
या क्रीमर्समध्ये बहुतेकदा अंशतः हायड्रोजनेटेड तेल असतात, जे ट्रान्स फॅट्सचा स्रोत असतात. नियमित सेवनाने लिपिड प्रोफाइल खराब होऊ शकतात आणि हृदयरोगाचा धोका वाढू शकतो.
तुमच्या दिवसाची हृदय-निरोगी सुरुवात करण्यासाठी, कमी सॅच्युरेटेड फॅट्स, ट्रान्स फॅट्स आणि साखरेचे प्रमाण असलेले नाश्ता पर्याय निवडणे आवश्यक आहे, असे डॉ. गोयल म्हणाले.