Cardiologists Share Simple Tips to Healthy Heart : जगभरात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतेय. चालता-बोलता व्यक्ती अचानक हृदय विकाराच्या झटक्यामुळे मरण पावतोय, त्यामुळे हृदयविकार हा आजार केवळ भारतासाठी नाही तर जगभरासाठी एक चिंतेचा विषय आहे. कारण केवळ वृद्धच नाही तर तरुण मुलंदेखील या आजारामुळे ग्रासलेली दिसत आहेत.

व्यक्तीच्या धमन्यांमध्ये चरबी आणि कोलेस्ट्रॉल जास्त प्रमाणात जमा झाल्यामुळे हृदयापर्यंत रक्त प्रवाह पोहोचण्यात अडचणी येतात. अशा परिस्थितीत व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. यामुळे हृदयरोगतज्ज्ञ काही सवयी आणि पदार्थ टाळण्याचा सल्ला देतात, ज्यामुळे तुम्ही हृदयाची नीट काळजी घेऊ शकता. याविषयी हृदय शल्यचिकित्सक डॉ. जेरेमी लंडन यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे, ज्यात त्यांनी हृदयरोग टाळण्यासाठी कोणत्या सवयी टाळल्या पाहिजेत हे सांगितले आहे.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
Budh Shani Kendra Drishti
१२ नोव्हेंबरपासून चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब, मिळणार अपार पैसा अन् धन
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”

हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित आजारांपासून दूर राहण्यासाठी टाळा ‘या’ चार सवयी

१) सिगारेट ओढणे टाळा.
२) दारू पिणे टाळा, कारण तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीसाठी अल्कोहोल विषारी आहे.
३) शीतपेये पिणे टाळा.
४) मैद्यापासून बनवलेले अन्नपदार्थ खाणे टाळा.

डॉ. लंडन म्हणाले की, तुम्ही आहाराचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास ८० टक्के वजन नियंत्रण ठेवू शकता. म्हणजे वजन नियंत्रणात ८० टक्के भाग हा आहारावर अवलंबून असतो, तर २० टक्के भाग व्यायाम आहे; त्यामुळे व्यक्तीने काहीही खाताना जरा विचार करून खाल्ले पाहिजे.

हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित आजारात या सवयींमुळे कसे नुकसान होते? जाणून घ्या

या विषयावर मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे सल्लागार कार्डियाक सर्जन डॉ. बिपीनचंद्र भामरे इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हणाले की, अति मद्यपान किंवा धूम्रपान केल्याने उच्च रक्तदाब होऊ शकतो, ज्याला हायपरटेंशन असेही म्हणतात. उच्च रक्तदाबामुळे एखाद्या व्यक्तीच्या हृदयाच्या स्नायूवर दबाव येऊ शकतो, परिणामी हृदयविकाराचा झटका येतो.

सॉफ्ट ड्रिंक्सला ‘लिक्विड डेथ’ असेही म्हणतात, कारण त्यात जास्त प्रमाणात साखर असते; ज्यामुळे तुमच्या हृदयाच्या आरोग्याला हानी पोहोचते. पास्ता, ब्रेड, स्नॅक्स आणि कपकेक यांसारख्या मैद्याच्या पिठापासून बनवलेल्या खाद्यपदार्थांमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. कारण तुमचे शरीर हे पदार्थ खाल्ल्यानंतर त्याचे साखरेत रूपांतर करते आणि चरबीच्या स्वरूपात साठवते. यामुळे पोटाभोवती चरबी जमा होऊ शकते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य खराब होऊ शकते. यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, असेही डॉ. भामरे म्हणाले.

यामुळे तुम्हाला हृदयाच्या आरोग्याशी संबंधित तुमच्या चिंता आणि हृदयविकाराचा धोका कसा कमी करावा याविषयी डॉक्टरांचा सल्ला घ्या, त्यांच्याशी चर्चा करा, तुमचे हृदय आणि एकूणच आरोग्य सुधारण्यासाठी ते तुम्हाला एक योग्यप्रकारचा आहार खाण्याचा सल्ला देऊ शकतात.

“छातीत दुखणे, थकवा येणे, डोके दुखणे, थंड घाम येणे, मळमळ होणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. व्यक्तीने नियमित व्यायाम केला पाहिजे, यासाठी रोज ४० मिनिटे चालणे किंवा सायकल किंवा पोहणे गजरेचे आहे, असेही डॉ. भामरे म्हणाले.