Ice Chewing Habit: गोड किंवा चवदार खायचंय असं वाटणं अगदी सामान्य आहे, परंतु जर तुम्हाला बऱ्याचदा बर्फ खाण्याची इच्छा होत असेल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. “बऱ्याच जणांनी त्यांच्या आयुष्यात एकदा तरी बर्फ चघळला आहे. परंतु, सतत बर्फ चघळावा किंवा खावासा वाटणे विविध आरोग्य समस्या दर्शवू शकते,” असे डॉ. प्रतीक तिबडेवाल, सल्लागार गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड यांनी सांगितले.

बर्फ चघळणे ही एक अशी परिस्थिती आहे जिथे एखाद्या व्यक्तीला सतत बर्फ खाण्याची किंवा शून्य किंवा कोणतेही पौष्टिक मूल्य नसलेले पदार्थ चघळण्याची इच्छा असते. या इच्छेला पिका (pica) असेही म्हणतात,” असे डॉ. तिबडेवाल यांनी indianexpress.com ला सांगितले. अशी भावना लोहाची कमतरता किंवा अशक्तपणा दर्शवू शकते.

हेही वाचा… डोळे चोळण्याची तुमची सवय आताच करा बंद! तज्ज्ञांनी सांगितला हा धोका

“लोहाची कमतरता ही अशी स्थिती आहे, जिथे एखाद्याचे शरीर पुरेशा प्रमाणात हिमोग्लोबिन तयार करू शकत नाही. हेमोग्लोबिन हे लाल रक्त पेशी (RBC) मध्ये उपस्थित असलेले प्रथिन आहे, जे फुफ्फुसातून उर्वरित शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी जबाबदार असतात. लोहाच्या कमतरतेमुळे अशक्तपणा असलेल्या लोकांसाठी बर्फ चघळणे समाधानकारक असू शकते आणि यामुळे स्मरणशक्ती, सतर्कता, शिकण्याची व निर्णय घेण्याची क्षमता आणि अनेक कार्ये एकाच वेळी करण्याची क्षमता सुधारण्यास मदत होते,” असे डॉ. तिबडेवाल यांनी स्पष्ट केले.

“तथापि, बर्फ चघळल्यामुळे दातांमध्ये फटी येण्यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात, तसेच दातांच्या एनामेलचे नुकसान होऊ शकते आणि दातांची संवेदनशीलता वाढू शकते. दातांना बर्फाच्या कठोरतेचा सामना करण्यासाठी तयार केलेले नाही आणि वारंवार ताणामुळे दातांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते,” असे डॉ. पी. वेंकट कृष्णन, ज्येष्ठ सल्लागार, आंतरवर्तीय औषध, आर्टेमिस हॉस्पिटल्स यांनी सांगितले.

हेही वाचा… “मला जिराफ म्हटलं जायचं”, सोनाली बेंद्रेवर एकेकाळी व्हायची टीका, बॉडिशेमिंगचा आरोग्यावर कसा होतो परिणाम, तज्ज्ञांनी केला खुलासा

“पण, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, बर्फ खाण्याची प्रत्येक इच्छा ही पोषण किंवा लोहाच्या कमतरतेचे संकेत देत नाही. “कधीकधी हे कायमच्या सवयींमुळे असू शकते, कारण काही लोकांना बर्फाचा टेक्सचर आणि थंडपण आवडतो. पण, या सवयीमुळे तुमच्या ओरल हेल्थचे नुकसान होऊ शकते आणि दातांना हानी होऊ शकते,” असे डॉ. तिबडेवाल यांनी सांगितले.”

कशाची मदत होऊ शकते?

लोहाच्या कमतरतेचा अशक्तपणा किंवा इतर आरोग्याशी संबंधित समस्या असली तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. “निदान झाल्यास आहार किंवा सप्लिमेंट्सद्वारे कमतरता दूर केली तर बर्फ चघळण्याची आवड कमी होऊ शकते,” असे डॉ. वेंकट म्हणाले.

“बर्फाऐवजी आरोग्यदायक पर्याय वापरा, ज्यामुळे त्याच्यासारखा थंडपणा आणि कुरकुरीतपणाचा अनुभव मिळू शकतो. जसे की, थंड आणि कुरकुरीत भाज्या (उदा. गाजर) हे तुमच्या दातांना हानी न पोहोचवता बर्फ चघळण्याची इच्छा पूर्ण करण्यात मदत करू शकते. “सवय सोडण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आणि पर्यायी धोरणे आवश्यक असू शकतात”, असे डॉ. वेंकट यांनी सांगितले.

“ही सवय सोडण्यासाठी तुम्ही कधी आणि का बर्फ चघळता याची नोंद ठेवा. तुम्हाला खाण्याची इच्छा कधी होते ते शोधा, त्यामुळे तुम्हाला ही सवय नियंत्रणात आणण्यास आणि ती कमी करण्यास मदत करू शकते,” असे डॉ. वेंकट यांनी सांगितले.