First Case of HMPV Infection in India : संपूर्ण जग कोरोना महामारीतून सावरले असतानाच आता पुन्हा चीनमध्ये नव्या ह्युमन मेटान्यूमोव्हायरलचा (HMPV) कहर झाला आणि आता तो भारतात येऊन पोहोचला आहे. भारतात आतापर्यंत या व्हायरसची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आले. मीडिया रिपोर्टनुसार, बंगळुरूमधील बॅप्टिस्ट रुग्णालयामध्ये एका आठ महिन्यांच्या मुलाला आणि तीन महिन्यांच्या मुलीला एचएमपीव्हीचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या रुग्णांचा कोणताही आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास नाही. त्यामुळे कोरोनानंतर आता एचएमपीव्ही व्हायरस भारतासाठी आरोग्याच्या दृष्टीने नवे आव्हान निर्माण करत आहे. दरम्यान, एचएमपीव्ही व्हायरस नेमका किती घातक आहे, याची लक्षणे नेमकी काय आहेत आणि संसर्ग झाल्यास कोणते उपाय केले पाहिजेत याविषयी जाणून घेऊ…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

HMPV व्हायरस म्हणजे काय? (What Is HMPV Virus)

एचएमपीव्ही व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींना याचा संसर्ग होण्याचा धोका असतो. खोकला, शिंकणे, स्पर्श करणे आणि बाधित व्यक्तींच्या सतत संपर्कात आल्यास हा व्हायरस पसरतो. आंध्र प्रदेशचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे संचालक के. पद्मावती यांच्या माहितीनुसार, हा व्हायरल कोविड-१९ प्रमाणेच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतो. प्रामुख्याने लहान मुले, वृद्ध आणि कमजोर रोगप्रतिकार शक्ती असलेल्या लोकांना याची लवकर लागण होण्याची शक्यता आहे.

एचएमपीव्ही व्हायरसचा कोणाला अधिक धोका?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, एचएमपीव्ही व्हायरसची लक्षणे सौम्य स्वरूपाची आहेत. पण ब्रॉन्कायलाइटिस (फुप्फुसांचा संसर्ग) आणि दम्याचा त्रास असलेल्या व्यक्तींनी जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. ज्या व्यक्तींना फुप्फुसाचा कोणताही आजार आहे; जसे की, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग डिसीज असलेल्या लोकांना या आजाराची गंभीर लक्षणे जाणवू शकतात. एचएमपीव्हीबाधित काही लोकांमध्ये न्यूमोनिया किंवा ब्रॉन्कायलाइटिससारखी धोकादायक लक्षणे दिसू शकतात.

तोंडातून येणारी दुर्गंधी काही सेकंदांत होईल दूर! फक्त करून पाहा ‘हा’ सोपा उपाय; मिळेल ताजेतवानेपणाचा अनुभव

एचएमपीव्हीचा तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो?

एचएमपीव्ही (HMPV) फुप्फुसांवर परिणाम करणारा व्हायरस आहे. त्यामुळे फ्लूसारखा संसर्ग होतो. थंड वातावरणात हा विषाणू अधिक नुकसान करू शकतो. बाधित व्यक्तीच्या थेट संपर्कात आल्याने या विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका असू शकतो. दरम्यान, या आजाराची लक्षणे कोरोना विषाणूप्रमाणेच आहेत.

लक्षणे काय आहेत? (HMPV Virus Symptoms)

एचएमपीव्हीबाधित व्यक्तीला खोकला, ताप, घसा खवखवणे, नाक वाहणे किंवा सर्दीमुळे नाक चोंदणे अशी लक्षणे जाणवू शकतात. काही प्रकरणांमध्ये श्वास घेण्यासही त्रास होऊ शकतो.

एचएमपीव्ही व्हायरसच्या संसर्गावर उपाय कोणते?

एचएमपीव्ही व्हायरसवर सध्या कोणतीही लस किंवा अँटीव्हायरल उपचार उपलब्ध नाहीत. बरेच लोक विश्रांती आणि हायड्रेशनने बरे होतात. परंतु, काही गंभीर प्रकरणांमध्ये हॉस्पिटलायजेशन आणि ऑक्सिजन थेरपी आवश्यक असू शकते. मात्र, याबाबत घाबरण्याची गरज नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. परंतु, तुम्ही बचावासाठी मास्क घालणे, हात वारंवार धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे व रोगप्रतिकार शक्ती वाढवणे गरजेचे आहे. तसेच डॉक्टरांच्या सल्लाशिवाय कोणतीही अँटीव्हायरल औषध घेणे टाळा.