Green Tea Benefits: शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल कमी करायचे आहे का? तर आज आम्ही तुम्हाला एक उत्तम मार्ग सांगणार आहोत. अनेकजण दररोज दुधाचा चहा किंवा कॉफी पिण्याऐवजी ग्रीन टी पितात. वास्तविक ग्रीन टी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ग्रीन टी प्यायल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो. शिवाय, वजन कमी करण्यासाठी आणि हृदयविकार कमी करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर आहे.

ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात त्यामुळे ते संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर असते. ग्रीन टीमध्ये पॉलीफेनॉल असते ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. चला तर मग जाणून घेऊया ग्रीन टीचे इतर कोणते फायदे आहेत?

Health Benefits Of Anjeer
Health Benefits Of Anjeer : सकाळी रिकाम्या पोटी खा अंजीर; लगेच दूर होतील ‘या’ पाच समस्या
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
coriander juice beneficial for weight loss
Coriander Juice : खरंच कोथिंबिरीचा रस प्यायल्याने वजन कमी होते? जाणून घ्या, हा रस आरोग्यासाठी कसा फायदेशीर?
Methi Sprouts Benefits
वजन नियंत्रणात ठेवण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत मोड आलेली मेथी आहे फायदेशीर; किती प्रमाणात खावी? तज्ज्ञांचे मत घ्या जाणून
chia seeds health benefits soaked chia seeds benefits and direction to use
रोज चिया सीड्स खाण्याचे हे आहेत आरोग्य फायदे, वाचा कशाप्रकारे करावे सेवन
delicious oatmeal poha
ओट्स खायचा कंटाळा येतोय? मग ट्राय करा ओट्सचे चविष्ट पोहे
drinking water with food cause gas or indigestion Know from experts
अन्नाबरोबर पाणी प्यायल्याने गॅस किंवा अपचन होऊ शकते का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
Find out if you should switch to cauli rice like Kartik Aaryan did while shooting for Chandu Champion
चंदू चॅम्पियनसाठी कार्तिक आर्यनने भाताऐवजी खाल्ला Cauli Rice? काय आहे हा cauli rice? तुम्ही खाऊ शकता? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

ग्रीन टी पिण्याचे फायदे

NCBI वर प्रकाशित केलेल्या संशोधनानुसार ग्रीन टीमध्ये पॉलिफेनॉल आणि पॉलिसेकेराइड असतात जे मधुमेहींसाठी फायदेशीर असतात. ग्रीन टी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचा प्रयत्न करते. ग्रीन टीचे सेवन केल्याने शरीरात साठलेली चरबी कमी होते. ग्रीन टी शरीरातील चयापचय प्रक्रिया वाढवण्याचा प्रयत्न करते. जे वजन कमी करण्यास मदत करते. वजन कमी करण्याच्या आहारात तुम्ही ग्रीन टीचा समावेश करू शकता.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यास उपयुक्त

हेल्थ लाइननुसार, खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यात ग्रीन टी महत्त्वाची भूमिका बजावते. ग्रीन टी चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे काम करते. ग्रीन टीच्या सेवनाने हृदयाघाताचा धोका कमी होतो. जर तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर तुम्ही ग्रीन टीचे नियमित सेवन करावे. यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका दूर होतो.

( हे ही वाचा: लसूण खाल्ल्याने Blood Sugar झपाट्याने कमी होईल; फक्त खाण्याची पद्धत जाणून घ्या)

ग्रीन टी कसा बनवायचा

जर तुम्ही ग्रीन टी बॅग्ज वापरत नसाल तर तुम्ही अशा प्रकारे ग्रीन टी पिऊ शकता. यासाठी प्रथम पाणी उकळून घ्या. त्यात ग्रीन टी टाका आणि थोडा वेळ झाकून ठेवा आणि गॅस बंद करा आणि नंतर ग्रीन टी गाळून प्या.

ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ

तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा ग्रीन टी पिऊ शकता. व्यायामापूर्वी तुम्ही ग्रीन टी पिऊ शकता, ही चहा तुमच्या शरीराला ऊर्जा देते. तसेच तुम्ही नाश्ता केल्यानंतर अर्धा तासाने ही चहा पिऊ शकता. तसंच जेवण करण्यापूर्वी किंवा नंतर अर्धा तासाने ग्रीन टी पिऊ शकता. तुम्ही रात्री झोपण्याच्या दोन तास आधीही ग्रीन टी पिऊ शकता.