गोष्ट तशी जुनी आहे,पण तरीही आपल्याला खूप काही सांगणारी आणि शिकवणारी. काही वर्षांपूर्वी अमेरिकेचे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारतभेटी करता आले होते. दिल्लीत त्यांचा तीन दिवस मुक्काम होता. यानंतर काही अमेरिकन माध्यमांनी बराक ओबामा दिल्ली सारख्या एका सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी एक असणाऱ्या शहरामध्ये तीन दिवस राहिल्यामुळे त्यांचे आयुष्य काही तासांनी कमी झाले आहे,अशी बातमी केली. आपण ती वाचली आणि विसरूनही गेलो .खरं म्हणजे विसरून जावी अशी ही बातमी नाही आणि हा प्रश्न केवळ एकट्या बराक ओबामांचा नाही तर तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांचा, सर्वांचाच आहे.

गेले काही दिवस वायूप्रदूषण जगभरातच मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. विशेषतः भारतासारख्या विकसनशील देशामध्ये त्याचे प्रमाण काळजी करावे, असे आहे. जगातील सर्वाधिक प्रदूषित देशांमध्ये आपला क्रमांक दुसरा लागतो. भारतातील सर्वसामान्य व्यक्तीचे सरासरी आयुष्य वायूप्रदूषणामुळे ५.२ वर्षांनी कमी होते असा जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल सांगतो आणि हेच आपण दिल्ली किंवा लखनौ सारख्या सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये राहत असू तर आपले आयुर्मान सुमारे नऊ ते दहा वर्षांनी कमी होते. याचा अर्थ बराक ओबामा यांच्या दिल्लीतील राहण्याबाबत अमेरिकन माध्यमांनी केलेली बातमी हा आपणा सर्वांसाठीच एक सावधगिरीचा इशारा होता.

Global Warming, Chandrapur , International Conference on Climate Change-2025,
‘ग्लोबल वॉर्मिंग’विरोधात शंखनाद, चंद्रपुरात पर्यावरण बदलावर…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
अग्रलेख : ‘मौसम’ है आशिकाना…
last two days temperature in Mumbai increased and dew in atmosphere has reduced
मुंबईत ढगाळ वातावरणाची शक्यता
Winter: Tips to Maintain Respiratory Health
हिवाळ्यात श्वास घेण्यास त्रास होतोय? श्वसनाशी संबंधित आरोग्य कसे जपावे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात
la nina become active in the pacific ocean impact on kharif crop
ला निना सक्रिय… रब्बी पिकांना फायदा? पण परिणाम अल्पकालीनच?
shivaji nagar mumbai pollution
मुंबई : शिवाजी नगरमधील वायू प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ
mumbai High Court air pollution mumbai city
मुंबईकरांनी आणखी किती काळ धुक्याचे वातावरण पाहायचे ? वायू प्रदुषणाची समस्या कायम असल्यावरून उच्च न्यायालयाची विचारणा

आणखी वाचा: आपणच होऊ आपली सावली! उन्हामुळे वाढलेल्या प्रत्येक त्रासावर डॉ. प्रदीप आवटे यांचे उत्तर जाणून घ्या

मागील ४ वर्षांपासून संयुक्त राष्ट्र संघटना ७ सप्टेंबर हा दिवस , निळ्याभोर आभाळासाठी स्वच्छ हवा दिवस म्हणून साजरा करते आहे. क्लीन एअर डे फॉर ब्ल्यू स्काइज, किती सुंदर वाटते ना, निव्वळ वाचूनही. यावर्षीच्या या क्लीन एअर डेचं घोषवाक्य आहे, टुगेदर फॉर क्लीन इयर! अर्थात आपली हवा स्वच्छ होण्यासाठी आपणा सर्वांना एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे.

वायू प्रदूषण कशा कशामुळे होते?
आपल्या उघड्या डोळ्यांनाही न दिसणारे सूक्ष्म कण ज्याला इंग्रजीमध्ये पार्टिक्युलेट मॅटर म्हणजेच पीएम या संक्षिप्त नावाने ओळखले जाते पीएम २.५,पीएम १० अशा अतिसूक्ष्म कणांमुळे वायूप्रदूषण होत असते. आपल्या केसाच्या एक तीसांश इतका कमी व्यास असणारे हे कण किती छोटे असतील, याची आपल्याला कल्पना येऊ शकते. याशिवाय कार्बन, मिथेन नायट्रोजन ऑक्साईड ,सल्फर डाय ऑक्साईड यासारखे वायू देखील वायू प्रदूषणामध्ये भर घालतात.
कोळसा, खनिज तेल लाकूड शेतातील पालापाचोळा आदी गोष्टी जाळल्यामुळे त्यातून मोठ्या प्रमाणावर या सूक्ष्म कणांची निर्मिती होते. वारा हे सूक्ष्म कण , हे वायू प्रदूषण एका जागेवरुन दुसऱ्या जागी खूप मोठे अंतर ओलांडून नेऊ शकतो. त्यामुळे ग्रामीण भागातील वायू प्रदूषण शहरांमध्ये किंवा शहरातील वायू प्रदूषण ग्रामीण भागात पोहोचणे सहज शक्य होते. याशिवाय बांधकामे, रस्त्याची कामे विविध उद्योगधंदे याच्यातूनही मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होते.

१९९८ च्या तुलनेमध्ये या आपल्या देशातील सूक्ष्म कणांचे हवेतील प्रमाण ४२ टक्क्यांनी वाढले आहे, हे जर आपण लक्षात घेतले तर मागील दोन-तीन दशकांमध्ये वायू प्रदूषण किती मोठ्या प्रमाणावर वाढते आहे हे आपल्या लक्षात येईल. वायूप्रदूषणाचे परिणाम हे दुहेरी आहेत. एकीकडे ते मानवी आरोग्यावर भयावह असा दुष्परिणाम करते. त्यामुळे स्ट्रोक (ब्रेन अटॅक ), श्वसनसंस्थेचे जुनाट आजार ,फुफुसाचा कर्करोग तसेच हृदयविकाराचा झटका या अनेक कारणाने होणाऱ्या मृत्यूमध्ये वायूप्रदूषणाचा वाटा मोठा आहे. यामुळे अस्थमासारखे आजार देखील बळावतात.

यासोबतच दुसरा परिणाम होतो तो आपल्या एकूण हवामानावर. हवेमध्ये हे प्रदूषण करणारे घटक असल्यामुळे वातावरण अधिक तापते आणि त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगच्या प्रक्रियेला हातभार लागतो. याचा एकूणच परिणाम शेतीचे उत्पादन, मानवी पोषण आणि अखेरीस आपल्या आरोग्यावर होतो. २०१९ मध्ये हवेतील प्रदूषणामुळे निव्वळ भारतामध्ये १७ लाख लोकांचा मृत्यू झाला असावा असा एक अंदाज आहे. जगभरातील हे प्रमाण ६५ लाख एवढे आहे. त्यामुळे स्वाभाविकच मानवी मृत्यूचे वायू प्रदूषण हे भारतातील एक प्रमुख कारण आहे.यासोबतच अस्थमा, श्वसनाचे जुनाट आजार आणि तत्सम व्याधी झाल्यामुळे मनुष्यबळाचा महत्त्वाचा काळ वायू प्रदूषण ग्रासून टाकते. आपल्या एकूण सकल उत्पादनाच्या ०.३ ते ०.९% आर्थिक नुकसान वायू प्रदूषणामुळे होते हे लक्षात घेतले तर या समस्येमुळे होणारी जीवित आणि आर्थिक हानी किती मोठी आहे हे आपल्या लक्षात येईल.

वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो?

‘ निळ्याभोर आकाशाकरता स्वच्छ हवा, ‘ हे घोषणा म्हणून किती जरी सुंदर वाटले तरी ते वास्तवात आणण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे.

पहिली बाब हे साध्य करण्यासाठी आणि येणाऱ्या काळात वायू प्रदूषण वेगाने कमी करण्यासाठी शासन, समाज आणि व्यक्ती या तिन्ही पातळीवर आपल्याला काम करावे लागेल.
शासनाच्या स्तरावर २०१९ सालापासून राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. पंधराव्या वित्तआयोगाने पुढील पाच वर्षासाठी १.७ अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढी मोठी रक्कम वायू प्रदूषणाविरुद्ध लढण्यासाठी मंजूर केलेली आहे. आपल्या देशातील दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या ४२ शहरांनी आपल्या वायू प्रदूषणाची पातळी दरवर्षी किमान १५ टक्क्यांनी कमी कमी करत न्यावी, असे आपले नियोजन आहे. याशिवाय राष्ट्रीय क्लायमेट चेंज आणि मानवी आरोग्य कार्यक्रम असा एक महत्त्वाचा कार्यक्रम देखील केंद्र सरकारने सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक राज्यामध्ये एका पर्यावरण आरोग्य कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. आरोग्य संस्था या अधिकाधिक पर्यावरण स्नेही बनवणे ,वायू प्रदूषण ,उष्णतेची लाट, जलप्रदूषण याविषयी काम करणे, ऊर्जेचा विनियोग अत्यंत कार्यक्षमतेने आणि काटकसरीने करणे असे अनेक घटक या कार्यक्रमांमध्ये समाविष्ट आहेत. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने क्लायमेट चेंजच्या सर्व घटकांशी लढण्यासाठी एक राज्यस्तरीय कृती आराखडा देखील तयार करण्यात आला आहे.

जास्तीत जास्त प्रमाणात अपारंपारिक ऊर्जेचा अर्थात जिला आपण अक्षय ऊर्जा म्हणतो तिचा वापर करणे, इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढविणे,लोकांनी अधिकाधिक इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा यासाठी प्रयत्न करणे तसेच घरगुती वायू प्रदूषण टाळण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला एल पी जी च्या स्वरूपात सुरक्षित इंधन मिळवून देणे अशा अनेक प्रकारे शासन वायू प्रदूषण कमी करण्याकरता प्रयत्न करत आहे. अनेकदा गरीब जनतेला गॅस परवडत नाही तेव्हा निर्धुर चुली सारखी कल्पक योजना देखील त्यांच्या मदतीला येते.

धूळ निर्मिती रोखण्यासाठी नवीन बांधकाम ठिकाणी धूळ प्रतिबंधक पडदा वापरणे किंवा पाण्याची फवारणी करून तिथे धूळ तयार होऊ नये याकरता प्रयत्न करणे, अत्यंत आवश्यक आहे. एकूणच वायु प्रदूषण कमी करण्याकरता आपल्याला आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिकाधिक बळकट करण्याची गरज आहे. आपण सर्वांनी आपल्या नेहमीच्या कामाच्या ठिकाणी जाण्या-येण्याकरता आपली व्यक्तिगत वाहने वापरण्याची सवय सोडून द्यायला हवी आणि पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करायला हवा. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढवण्याकडे देखील शासन लक्ष देते आहे. त्याबरोबरच शहरांमध्ये वाहतूक कोंडी होऊ नये ,यासाठी अत्याधुनिक ट्राफिक कंट्रोल सिस्टीमचा वापरही शहरांमध्ये करणे गरजेचे आहे. शहरांमध्ये असणाऱ्या टेकड्या, बागा आणि एकूणच झाडे ही त्या शहराची फुप्फुसे असतात. त्यामुळे ही फुफ्फुसे अधिक अधिक हिरवी गर्द राहतील यासाठी प्रयत्न करणे देखील आवश्यक आहे.

शहरांमध्ये घरगुती कचरा मोठ्या प्रमाणावर तयार होतो. या कचऱ्याचे घराच्या पातळीवरच ओला कचरा, सुका कचरा या पद्धतीने विलगीकरण करणे तर आवश्यक आहेत पण कचरा जाळण्याऐवजी या कचऱ्यातून ऊर्जा निर्मिती करता येईल का, या दृष्टीने नियोजन करणे आवश्यक आहे. अनेक शहरे या वाटेने चालली आहेत .प्रत्येक शहरात वायु प्रदूषणाचे नियमित आणि निरंतर संनियंत्रण केले जात आहे. वायु प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वसामान्य जनतेला सोबत घेणेदेखील आवश्यक आहे. शालेय आणि महा विद्यालयीन मुले, शिक्षक यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. आपल्या राज्याला आपल्या विजेची गरज भागवण्याकरता मोठ्या प्रमाणावर औष्मिक विद्युत केंद्रांवर अवलंबून राहावे लागते तथापि ही औष्मिक विद्युत केंद्र मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण करतात. एकट्या महाराष्ट्रात आपली सगळी औष्मिक विद्युत केंद्र दर दिवसाला ९७३ टन सूक्ष्म कण,११२५ टन सल्फर डाय ऑक्साईड तर ६०९ टन नायट्रोजन ऑक्साईड हवेत सोडतात. हे प्रदूषण २७ लाख वाहनांच्या प्रदूषणाएवढे मोठे आहे आणि म्हणून शासन औष्मिक विद्युत निर्मितीपासून अक्षय ऊर्जेकडे जाण्याचा मार्ग चोखाळत आहे. सौर ऊर्जा, वाऱ्यापासून मिळणारी ऊर्जा ,उसाच्या बग्यास पासून किंवा पालापाचोळ्यापासून वीज निर्मिती अशा अनेक गोष्टी करून आपण वायु प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करतो आहोत.

घरगुती स्वरूपाचे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन आणि शहरातील सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देणे देखील आवश्यक आहे अन्यथा अत्यंत दाटी-वाटीत, खिडक्या ही नसणाऱ्या घरात लाखो लोक राहतात आणि वायू प्रदूषणाचे बळी होतात.

तुमची माझी जबाबदारी
वायू प्रदूषण केवळ सरकारी उपाययोजनांनी कमी होणार नाही. यासाठी आपणही व्यक्ती आणि समाज म्हणून काही जबाबदारी उचलावी लागेल. आपण स्वतः आपल्या व्यक्तिगत वाहनांचा वापर कमी करणे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापर करणे ही खूप गरजेची गोष्ट आहे. आपल्या घरात ,कार्यालयात साध्या विजेच्या दिव्याऐवजी एल इ डी चा वापर करणे, आपल्या सोसायटीमध्ये कार्यालयात शक्य तिथे सौरऊर्जा वापरणे,मुळात ऊर्जेची काटकसर करणे ,ज्या खोलीत आपण बसलो आहोत केवळ तिथलेच दिवे आणि पंखे चालू ठेवणे अशा साध्या साध्या गोष्टीतून आपण मोठ्या प्रमाणावर विजेची बचत करू शकतो. अनेकदा सरकारी कार्यालयात विनाकारण लाइट्स, फॅन्स , एसी चालू असताना आपल्याला दिसतात . आपण जबाबदार नागरिक या नात्याने त्या आवर्जून बंद करणे गरजेचे आहे. शक्य तिथे लिफ्ट ऐवजी जिना वापरणे, यासारख्या साध्या साध्या गोष्टी आपलं आभाळ अधिक निळेशार करण्यासाठी उपयुक्त आहे. आपण सगळ्यांनी हातात हात घेतला तर आपली हवा देखील आपल्या सोबत आरोग्याची गाणी गाऊ लागेल, गरज आहे ती आपण सूरात सूर मिसळण्याची !

Story img Loader