“हाय पल्लवी!! तू सांगितल्याप्रमाणे मी लाडवामध्ये कोकोनट शुगर वापरले आणि लाडू कमाल झालेत”. रेवाने उत्साहात ऑडिओ क्लिप पाठवली होती आणि सोबत लाडवाचे फोटो देखील.

तेलबियांचे लाडू तयार करताना अजिबात पांढरी साखर वापरायची नाही. साखरेला पर्याय म्हणून काय वापरावं याबद्दल वेगवेगळे पदार्थ आधीही वापरून झाल्यामुळे तेल बियांचे लाडू करताना खारीक पावडर मनुके हे सगळं वापरत वापरत गोडाचे प्रमाण खूप जास्त वाढतं त्यामुळे अतिशय कमी गोडव्यासाठी काय बरं वापरता येईल असा रेवाला प्रश्न पडला होता हे सगळे पर्याय बघून झाले होते आणि तिचा हा सगळा खटाटोप पाहता तिला कोकोनट शुगर वापरायचा सल्ला मी दिला होता.

winter healthy recipe in marathi mulyachi bhaji recipe how to prepare radish vegetable in winter
मुळ्याची भाजी न आवडणाऱ्यांसाठी अशी बनवाल तर नक्की खातील; जाणून घ्या पौष्टिक भाजीची सोपी रेसिपी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Jai-Veeru Swiggy's entry on Dalal Street welcomed by Zomato
“जय-वीरू!” दलाल स्ट्रीटवर स्विगीची एन्ट्री, झोमॅटोने केलं स्वागत! पाहा, Netflix, Amazon, Paytm, Coca Colaची भन्नाट प्रतिक्रिया
Carrot is beneficial for body how to make gajar ki kanji recipe in marathi
हिवाळ्यात सगळ्यात भारी, निरोगी, आणि चवदार गाजर कांजी! पिढ्यानपिढ्या बनवली जाणारी खास रेसिपी
Malai cauliflower recipe Different style recipe of making cauliflower for winter special
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
Amit Shah alleges that Ajit Pawar group is occupying the sugar factories Print politics news
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा; अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा

आणखी वाचा: Health Special: मोतीबिंदू का होतो? आणि त्यावरचे उपचार काय?

तुम्ही म्हणाल ज्याप्रमाणे अतिरिक्त खोबरं वापरलं तर शरीरातले चरबीचं प्रमाण वाढतं तसंही नारळातली साखर काय प्रकारे काम करते? मुळात नारळ हा बहुगुणी आहे आणि नारळाचा प्रत्येक भाग हा उपयुक्त असतो त्यामुळे नारळापासून तयार केलेली साखर ज्यामध्ये हलकेसे उसाचे देखील प्रमाण असते त्या साखरेला नारळाची साखर असे म्हटले जाते. खोबरं म्हटलं की डोळ्यासमोर सगळ्यात पहिली गोष्ट उभी राहते ती म्हणजे अरे बापरे म्हणजे ऑइल आलं म्हणजे कोलेस्ट्रॉल आलं आणि त्यात आता हे कोकोनट शुगर म्हणजे शुगर पण वाढणार की काय पण असं अजिबात नाहीये नारळाची साखर म्हणजेच कोकोनट शुगर तुमच्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे.

आणखी वाचा: Health Special: साखरेला मध पर्याय ठरु शकतो?

तांबूस रंगाची आणि साधारण ब्राऊन शुगर सारखी दिसणारी ही साखर सध्या बाजारात उपलब्ध आहे आणि विशेषतः हेल्थ सेक्शन मध्ये कोकोनट शुगर हमखास पाहायला मिळते. हा तांबूस रंग गुळापेक्षा हलका फिकट आणि ब्राऊन शुगरशी हलका मिळता जुळता असतो.

कोणत्याही कर्बोदकांचा सगळ्यात महत्त्वाचा गुण. त्याचा जीआय आणि कोकोनट शुगरने याबाबतीत मात्र बाजी मारलेली आहे म्हणजे कसं तर कोकोनट शुगरची नाजी कोकोनट शुगर चा जीआय म्हणजेच ग्लासेमिक इंडेक्स हा 35 आहे त्यामुळे कमी ग्लासमिक इंडेक्स असलेल्या या कोकोनट शुगरचे आहार शास्त्रामध्ये वेगळे आणि महत्त्वाचे स्थान आहे. गोड खाऊ पाहण्यासाठी किंवा ज्यांना मधुमेह आहे किंवा ज्यांना लठ्ठपणा उच्च रक्तदाब हृदयविकार यांसारख्या आजार आहेत त्यांनी एक चमचा साखर कोकोनट शुगरच्या स्वरूपात आहारात समाविष्ट करायला
याचा पोत आणि रंग हा बऱ्यापैकी गुळासारखा असतो मात्र याची चव थोडी वेगळी असते आणि पांढऱ्या साखरेची ही चव थोडी मिळती जुळती असल्यामुळे ही साखर आरामात पांढरे साखरेला पर्याय म्हणून सहज वापरता येऊ शकते. आशियाई देशांमध्ये खोबऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे वेगवेगळ्या आशिया देशांमध्ये हळूहळू खोबऱ्याच्या साखरेचे प्रमाण वाढत आहे . थायलंड, श्रीलंका, म्यानमार, कंबोडिया, इंडोनेशिया, मलेशिया यासारख्या देशांमध्ये ही साखर तयार केली जाते. अत्यंत न्यूट्रल पीएच अर्थातच आतड्याच्या स्वास्थ्यासाठी उपयुक्त आणि नेमका गोडवा हे या साखरेचे विशेष!
त्यामुळे तुम्हाला जर सरबत तयार करण्यासाठी किंवा कोणत्याही प्रकारचे आंबवलेले पदार्थ गोडव्यासह तयार करायचे असतील तर या साखरेचा उपयोग केल्यास चव आणि पोषण मिळू शकते.

आता तुम्ही म्हणाल की नारळ म्हटलं की त्याच्यामध्ये फॅट आलं आणि जर तेलच खायचं असेल तर मग ही साखर तरी का खायची?
मुळात ही साखर तयार करताना त्यातील खनिजांचे प्रमाण कमी होत नाही. या साखरेने तुमचे वजन वाढत नाही. दुसरं म्हणजे यातील अँटिऑक्सिडंट तुमच्या शरीराला हानी पोहोचवत नाहीत तसेच फिनोलिक कंटेंट शरीराला उपकारक आहे. या साखरेमध्ये काही प्रमाणात यातील कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज ,कॉपर, सोडियम ,पोटॅशियम ,झिंक ,लोह यासारखी महत्त्वाची पोषणमूल्ये आहेत जी या साखरेचे आहार मूल्य आणखी वाढवतात.

नारळाचा साखरेचा सगळ्यात महत्त्वाचा भाग असा की शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण योग्य प्रमाणात राखण्यासाठी आणि तुमच्या कोणत्याही आहारात योग्य प्रमाणात गोडवा आणण्यासाठी ही साखर अत्यंत उपयुक्त आहे. ज्याप्रमाणे आपण नेहमीच्या आहारामध्ये खोबऱ्याचा वापर करतो त्याचप्रमाणे ही साखर तुम्ही लाडू तयार करताना, शिरा तयार करताना नेहमीचे गोड पदार्थ तयार करताना वापरू शकता. ज्यांना संधिवात आहे किंवा ज्यांना जळजळ होते पोटामध्ये त्यांच्यासाठी ही साखर उत्तम आहे. ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांनी तुपाचे पदार्थ तयार करताना या साखरेचा वापर केल्यास वजन वाढण्यासाठी मदत होऊ शकते. गोड पदार्थ म्हटले की दातांचे विकार ओघाने आलेच. मात्र कोकोनट शुगर तुमच्या दातांचे संरक्षण करू शकते. मधुमेह असणाऱ्यांसाठी ही साखर वरदान ठरलेले आहे कारण एक ते दोन चमचे या प्रमाणात जरी तुम्ही नारळाची साखर तुमच्या आहारात वापरलीत तरी देखील तुमच्या मधुमेहाचे प्रमाण वाढत नाही. पावसाळी सहलीसाठी जाताना लिंबूपाळामध्ये नारळाची साखर ऍड केल्यास तुम्हाला ऊर्जा तर मिळतेच तसेच शरीराचा पीएच देखील सांभाळला जातो पांढऱ्या साखरेमुळे होणारे आतड्याचे नुकसान या साखरेमुळे होत नाही त्यामुळे नारळाच्या साखरेला आहारात समाविष्ट करून घ्यायला हरकत नाही.