Why Coconuts Are Not Allowed On Flights : जेव्हा आपण विमान प्रवास करतो तेव्हा कोणत्या गोष्टी सामानातून घेऊन जायच्या किंवा कोणत्या वस्तूंचा तुम्ही विमानात वापर करू शकत नाही याबद्दल अनेक सूचना आपल्याला दिल्या जातात. लाइटर, ड्राय सेल बॅटरीसारख्या ज्वलनशील तर चाकूसारख्या तीक्ष्ण वस्तूंसह, सुकलेला नारळदेखील तुम्ही विमान प्रवासात घेऊन जाऊ शकत नाही (Coconuts Are Not Allowed On Planes) … हे वाचल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का? याबद्दल द इंडियन एक्स्प्रेसने एव्हिएशन ट्रेनिंग इंडियाचे एव्हिएशनतज्ज्ञ राजगोपाल आणि राजौरी गार्डन, नवी दिल्ली येथील कॉस्मेटिक स्किन क्लिनिकच्या Aesthetic physician आणि कॉस्मेटिलॉजिस्ट डॉक्टर करुणा मल्होत्रा यांच्याशी चर्चा केली.

तज्ज्ञ राजगोपाल यांच्या म्हणण्यानुसार, सुकलेल्या नारळाचा आकार, वजन विमान प्रवासात एखाद्या दुर्घटनेत शस्त्रे म्हणून काम करू शकतात किंवा विमानाचे नुकसान करू शकतात किंवा प्रवाशांना यामुळे इजादेखील होऊ शकते. विमानातील सर्व जण सुरक्षित राहतील याची खात्री करण्यासाठी एअरलाइन्सने कठोर धोरणे लागू केली आहेत आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शस्त्र म्हणून काम करू शकणाऱ्या वस्तूंना सहसा विमानात नेण्यास बंदी घातली आहे.

firecrakers side effects on body
फटाक्यांचा धूर फुप्फुस आणि हृदयासाठी किती घातक? फटाक्यांमधील हानिकारक घटक कोणते?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
woman cheated grape growers, grape growers,
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक करणाऱ्या महिलेस दिल्लीत अटक
coriander juice beneficial for weight loss
Coriander Juice : खरंच कोथिंबिरीचा रस प्यायल्याने वजन कमी होते? जाणून घ्या, हा रस आरोग्यासाठी कसा फायदेशीर?
aishwarya narkar angry on netizen who troll avinash narkar
“शिमग्यातलं सोंग कुठेय?”, नवऱ्यावरून ट्रोल करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “स्वत:ची लायकी…”
Nagpur 63 tall building around airport
धोकादायक! नागपूर विमानतळाला ६३ उंच इमारतींचा विळखा…
Yogic treatment method with science can cure even incurable diseases says acharya upendra
आचार्य उपेंद्र म्हणतात, ‘मधुमेह, गुडघादुखी मंत्र साधना, अंतर योगातून उपचार…’
How To Make Coconut Jaggery Barfi
Coconut Jaggery Barfi : यंदा दिवाळीत बनवा तोंडात टाकताच विरघळणारी बर्फी? नक्की ट्राय करा ‘ही’ रेसिपी; अगदी कमी मेहनत लागेल

नारळाच्या वरचा भाग कडक असतो (म्हणजेच त्याचे कवच कठीण असते) आणि आत द्रव (लिक्विड) असतो. विमान आकाशात उंचावर गेल्यावर हवेचा दाब बदलल्यामुळे नारळ फुटण्याचा धोका असतो, ज्यामुळे विमान प्रवासात गोंधळ निर्माण होऊ शकतो किंवा सुरक्षेच्या समस्या निर्माण होऊ शकतात; असे डॉक्टर करुणा मल्होत्रा म्हणाल्या आहेत.

हेही वाचा…Eating Egg Whites Healthy Or Not : फक्त अंड्यातील पांढरा भाग खाणं शरीरासाठी चांगलं की वाईट? तज्ज्ञांनी मांडली मते…

डॉक्टर राजगोपाल म्हणाले की, सुकलेल्या नारळातील अतिरिक्त आर्द्रता (ओलावा) प्रवाशांसाठी अस्वस्थ आर्द्र (दमट) वातावरण तसेच विमानांच्या वेंटिलेशन सिस्टममध्ये संभाव्य समस्या निर्माण करू शकते. याचा अर्थ, जर नारळातून पाणी गळत असेल तर विमानाच्या आतील हवा दमट होऊ शकते, ज्यामुळे प्रवाशांना अस्वस्थता जाणवू शकते. यामुळे विमानाच्या यांत्रिकीसाठीही अडचणी येऊ शकतात.तसेच एअरपोर्टवर द्रव (लिक्विड) पदार्थ घेऊन येण्यासाठीचे कडक नियम आहेत. सुकलेल्या नारळातला द्रव पदार्थ १०० मिलिलिटरच्या मर्यादेपेक्षा जास्त असतो, त्यामुळे तो सामानातून आणण्यास बंदी आहे (Coconuts Are Not Allowed On Planes) ,” असं सांगितलं जातं.

नारळ स्कॅन करणे आव्हानात्मक

राजगोपाल यांनी असेही नमूद केले की, सुरक्षा कर्मचाऱ्यांना एक्स-रे मशीनचा वापर करून नारळ स्कॅन करणे आव्हानात्मक वाटू शकते. कारण सुकलेल्या नारळाच्या वरील कठीण कवच,आतले लिक्विड सामग्री लपवून ठेवू शकते आणि संशय निर्माण करू शकते.

सुकलेला नारळ कोणत्याही विमान प्रवासात गोंधळ निर्माण करू शकतात. एव्हिएशन तज्ज्ञांच्या मते, नारळाचे टुकडे लवकर पसरतात, ज्यामुळे वातावरण खराब होते आणि प्रवाशांसाठी, क्रूसाठी एक गडबडीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. सुकलेल्या नारळात आर्द्रता असते, ज्यामुळे केबिनच्या हवेची गुणवत्ता लक्षणीय प्रमाणात बदलू शकते, यामुळे प्रवाशांना अस्वस्थता आणि समस्यांना सामोरे जावे लागते.

अशांतता, आपत्कालीन परिस्थितीत नारळासारख्या कठीण वस्तू धोकादायक शस्त्र बनू शकतात, ज्यामुळे प्रवाशांना धोका निर्माण होतो; असे डॉक्टर मल्होत्रा ​​म्हणाले. या सर्व निर्बंधांमुळे एअरलाइन्स फ्लाइटमध्ये सुकलेले नारळ घेऊन जाण्यास परवानगी देत ​​नाहीत. काही फ्लाइट्समध्ये जरी परवानगी दिली जात असली तरीही त्यांना फक्त चेक-इन लगेजमध्येच परवानगी दिली जाऊ शकते. तरी एअरलाइनचे नियम आधीच तपासणे चांगले आहे, असे डॉक्टर मल्होत्रा ​​यांनी सांगितले आहे.