आमच्याकडे थालीपीठ म्हटलं की लोणी असतंच.
पण थालीपीठ लोण्यासोबतच खावं. फक्त लोणी अर्धा चमचा इतकंच असू दे.
सध्या घरी नाही करत मग मार्केट बटर वापरतो.
घरचं लोणी नसेल तर सध्या आवश्यकता नाहीये लोण्याची.
“ म्हणजे लोणी चांगलं नाही बरोबर?
“ हो, सध्या तुम्हाला आवश्यकता नाही “

माझा आणि रिचाचा हा संवाद सुरु असताना लोणी आणि त्याबद्दलच्या अनेक समजुती डोक्यात फेर धरू लागल्या. शिवाय जन्माष्टमी किंवा गोपाळकाला म्हटलं की दुधाच्या पदार्थांचं एक वेगळंच महत्त्व असतं. यामध्ये लोणी आणि दही हे दोन पदार्थ सगळ्यात जास्त वापरले जातात. आजच्या लेखात लोण्याबद्दल माहिती घेऊ. दुधापासून दही -दह्यापासून ताक -ताक घुसळून लोणी तयार केलं जातं. दुधातील शर्करा आणि पाणी यांचं प्रमाण कमीतकमी करून संपूर्ण स्निग्धांश स्वरूपात लोणी उपलब्ध करून घेतलं जातं.

Can 30 grams of protein within 30 minutes of waking help regulate cortisol and balance hormones
सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटांत ३० ग्रॅम प्रथिने खाल्ल्याने कॉर्टिसोलचे नियमन आणि हार्मोन्स संतुलन होईल का? तज्ज्ञांनी केला खुलासा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Milk paneer or curd Which is healthiest dairy product
दूध, पनीर व दही यांपैकी कोणता पदार्थ आहे सर्वांत जास्त फायदेशीर? कसे करावे सेवन, घ्या तज्ज्ञांकडून जाणून….
Pankaj Tripathi shares recipe for his ‘special’ masala chai
पंकज त्रिपाठी मसाला चहामध्ये टाकतात तमालपत्र! चहामध्ये तमालपत्र घालावे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या फायदे
Which metal vessel is used to boil
दूध उकळवण्यासह पिण्यासाठी कोणत्या धातूच्या भांड्याचा वापर केला जातो?
curd in any food be dangerous
कोणत्याही पदार्थांमध्ये दह्याचा सतत वापर करणं ठरू शकतं घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
Which of the raw and pasteurized milk is beneficial
कच्चे व पाश्चराइज्ड यापैकी कोणते दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर? तज्ज्ञांचे मत घ्या जाणून…
Testy bhindi fry khatti mitthi bhindi lady fingars recipe for lunch or diner
भेंडीची खट्टी -मीठी भाजी; ती पण चिकट न होता! पाहा सोपी मराठी रेसिपी

१ चमचा म्हणजे १५ ग्राम लोण्यामध्ये ७० हून जास्त टक्के साठून राहणारे स्निग्धांश आहेत. शरीरासाठी उपयुक्त असणारे पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स त्यामाने केवळ २५% आहेत. सगळ्यात महत्त्वाचं जीवनसत्वे आणि खनिजांचा पुरवठा लोण्याचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये बऱ्यापैकी फॅट सोल्युबल विटामिन्स असतात म्हणजे जीवनसत्व अ, ड, ई . के ! बऱ्यापैकी जीवनसत्व ब आणि यामध्ये आढळून येतात.

संशोधन केल्यानंतर लक्षात आलेली आणखी एक गोष्ट म्हणजे किमान १ चमचा लोणी आहारात असेल तर हृदय रोगापासून रक्षण होऊ शकते. ज्यांना सांधेदुखीचा किंवा संधिवाताचा त्रास आहे त्यांना लोणी अतिशय उपयुक्त आहे ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांनी किमान एक ते दोन चमचा लोणी आहारामध्ये नियमितपणे वापरावे मात्र लोणी वापरताना त्यामधील मिठाचे प्रमाण कमी किंवा शून्य असेल याची काळजी मात्र घ्यायला हवी.

ज्यांना दूध पचत नाही किंवा लॅक्टोज इंटॉलरन्स आहे अशा लोकांसाठी लोण्याचा वापर टाळणे उत्तम. ज्या वेळेला कोलेस्ट्रॉल आणि लोण्याचा विचार होतो त्या वेळेला एक मात्र गोष्ट नक्की की अतिरिक्त प्रमाणात लोण्याचा वापर केल्यामुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते ज्याचा तुमच्या हृदयवाहिनांमध्ये साठा वाढतो आणि तुमच्या वाईट कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणामुळे हृदयविकार होऊ शकतात. शक्यतो ज्यामध्ये खूप जास्त प्रमाणात स्निग्धांश असतात अशा प्रकारचे दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ न खाल्लेले बरे म्हणजेच लोण्यामध्ये साखर मिसळून किंवा लोण्यामध्ये क्रीम मिसळून किंवा लोणामध्ये कोणता तरी फ्लेवर मिसळून खाणे कधीही उपयुक्त नाही. सध्या कॉफी सोबत लोणी खाण्याचा एक जो ट्रेंड आलेला आहे अशा प्रकारची ब्लॅक कॉफी उपाशी पोटी खाल्ल्यास तुमच्या शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण प्रमाणात राहते आणि ज्यांना वजन कमी करायचे आहे किंवा भुकेचा समतोल शोधायचा आहे त्यांच्यासाठी लोणी उपयुक्त आहे की वंगण म्हणून दोन्ही अतिशय उपयुक्त आहे. व्यायाम आणि योग्य आहार यांना अशा प्रकारच्या लोण्याची साथ असेल तर वजन कमी करताना उपयोग होऊ शकतो.

लोण्यामध्ये सीएल नावाचा घटक असतो. या घटकाचा वजन कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांमध्ये वापर केला जातो. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तसेच हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी लोणी गुणकारी आहे. मेंदू तसेच मेंदूच्या पेशींच्या आरोग्यासाठी ताजे लोणी अत्यंत उपयुक्त आहे. ज्यांना फिट्स येणे , एपिलेप्सी यांसारखे आजार आहेत त्यांनी किमान १ चमचा लोणी नियमितपणे आहारात वापरावे.

लोण्यात असणारे लॉरिक ऍसिड आणि मिडीयम चेनसाठी ऍसिड ओमेगा ३आणि ओमेगा ६ योग्य संतुलन राखते तसेच ज्यांचे पोट वारंवार बिघडते त्यांच्यासाठी रोज उपाशीपोटी किमान अर्धा चमचा लोणी खाणे अत्यंत उपायकारक ठरू शकते. मासिक पाळीच्या वेळी खूप जास्त रक्तस्त्राव होत असल्यास आहारात लोण्याचे प्रमाण किमान १ चमचा इतके असावे.

लहान मुलांसाठी तसेच तरुण मुलांच्या आहारात घरगुती लोण्याचा समावेश जरूर करावा. आजच्या काळात स्क्रीनटाईम जास्त असणाऱ्यांसाठी किमान आहारात लोणी असणे आवश्यक आहे. ज्यांना हृदयविकार आहेत त्यांनी लोणी खाणे टाळावे, जर तुम्ही एक तास व्यायाम नित्य नियमाने करत असाल तर लोणी तुम्हाला फायद्याचे ठरू शकते मात्र व्यायामाला कंटाळा करणार्यांनी लोणी खाणे टाळावे. ज्यांना खोकला ,कफ ,दमा यांसारखे विकार आहेत त्यांनी लोण्याचा वापर कटाक्षाने टाळावा.