Coffee For Weight Loss: सोशल मीडियावर वेगवेगळ्या खाद्य संस्कृतीचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत चाललाय. वेगवेगळ्या पदार्थांसोबत नवीन नवीन ड्रिंक्ससुद्धा आता उपलब्ध होतात. यामध्ये काही विचीत्र प्रकारचे, विरुद्ध  पदार्थ एकत्र करुन तयार केलेले पदार्थ विक्रीसाठी असतात. त्यातल्या त्यात कॉफी आणि चहावर अजून वेगळे प्रयोग झाले नाही असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा. कारण, एक विचीत्र कॉफी बाजारात उपलब्ध आता मिळत आहे. अनेक जण झोप उडवण्यासाठी कॉफी घेतात मात्र ही कॉफी बघुनच तुमची झोप उडेल. हा कॉफीकॉम्बो ट्राय करण्याआधी तुमच्यासाठी ही कॉफी योग्य आहे का पाहुयात

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या बाजारात एका कॉम्बो कॉफिचा ट्रेंड आलाय. आतापर्यंत तुम्ही तुपातले वेगवेगळे पदार्थ खाल्ले असतील उदा, तुपातले लाडू, तुपातला शिरा, तुपातील पुरणपोळी मात्र कधी तुपातली कॉफी प्यायली आहे का ? हो आता बाजारात तुपातली कॉफी आलीय. ही कॉफी अनेक सेलिब्रिटींच्या पसंतीस उतरली आहे. स्टारबक्स सारख्या प्रसिद्ध कॉफी शॉपमध्येही ऑलिव्ह-ऑईल इन्फ्युज्ड ड्रिंक्स उपलब्ध आहे. ही कॉफी आपल्या नॉर्मल कॉफीसारखी नसून या कॉफीमध्ये तूप आणि ऑलीव ऑईलचा वापर केलाय. तुपामध्ये पौष्टिकता असते तर ऑलिव्ह ऑईलमुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यही सुधारते. तुपामध्ये पौष्टीकता असली तरही त्यामुळे कॅलरीस आणि चरबीचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे डाएटवर असणाऱ्यांसाठी किंवा वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी तर ही कॉफी घेणे फायद्याचे ठरणार नाही.

तुपातील कॉफी आरोग्यावर काय परिणाम करते? (Is Ghee Coffee Best For You)

  • तुप पौष्टिक असलं तरीही त्यामुळे शरिरातील कॅलरीस आणि फॅट वाढतं
  • कोलेस्ट्रॉलमुळे हृदयाचे विकार, हार्ट अटॅक, हाय ब्लडप्रेशर, पक्षाघात यासारख्या गंभीर समस्या होतात.
  • डाएटवर करणाऱ्यांनी किंवा वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तूप अधिक खाण्यामुळे लठ्ठपणाची समस्याही निर्माण होऊ शकते,
  • तूपामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट आहेत. ते दुधात मिसळून प्यायल्यास त्याचे फायदे दुप्पट होतात, मात्र कॉफिमध्ये तुप मिसळल्यास त्याचा फायदा होत नाही

तूप घालून कॉफी पिण्याचा ट्रेंड का लोकप्रिय झाला?

फूड ब्लॉगर सोशल मीडियाच्या माध्यामातून नव नवीन पदार्थ भेटीला आणत असतात. काही पदार्थ लोकांच्या पसंतीत उतरतात तर काही रिजेक्ट होतात. अशीच एक कॉफी बाजारात हेल्थी कॉफी म्हणून प्रसिद्ध झालीय. पूर्वीपासून तूपाचा आहारात समावेश हे पौष्टीक मानले जाते. तूपामध्ये खूप कॅल्शियम असते त्यामुळे सकाळी रिकामी पोटी जर तुपातली कॉफी घेतली तर ती आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल असं बऱ्याचं जणांना वाटतं. त्यामुळे आता नॉर्मल कॉफीपेक्षा ही हेल्थी कॉफी सुरु करण्याचा आता सगळे विचार करतायत. मात्र अशाप्रकारे तूप पिणे हे आहारासाठी घातक ठरु शकते अशी माहिती समोर आलीय.

हे ही वाचा<< हृदय बंद पडल्यास, श्वास थांबल्यास CPR कसा द्यायचा? ‘या’ सोप्या स्टेप्स शिकून तुम्हीही वाचवू शकता जीव

दरम्यान फक्त कॉफीतच नाही तर नियमीत आहारातही तुपाचा वापर कमी करण्याच सल्ला डॉक्टर देतात. सध्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेते वेगवेगळ्या शक्कल लावत असतात मात्र यावर लगेच विश्वास न ठेवता अशाप्रकारचे पदार्थ खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coffee with ghee and olive oil in the morning help you lose weight srk