Collagen Rich Drink Benefits : प्रत्येकाचा सुंदर दिसायला आवडते. आपली त्वचा इतरांपेक्षा सुंदर, निरोगी, मुलायम व चमकदार दिसावी, असे प्रत्येकाला वाटते. पण, त्यासाठी शरीरात कोलेजन असणे फार आवस्यक असते. शरीरातील सर्वांत मुबलक प्रथिनांच्या रूपात त्वचेची लवचिकता, हायड्रेशन व दृढता राखण्यात कोलेजन महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. त्यामुळे स्किनकेअर उत्पादनांपासून ते आहारातील पूरक पदार्थांपर्यंत, कोलेजेन हा एक आवश्यक घटक बनला आहे. कारण- त्यामुळे वृद्धत्व दर्शविणारी त्वचा पुन्हा तजेलदार, मुलायम अन् चमकदार होते. कोणत्याही कृत्रिम साधनांचा वापर न करता, नैसर्गिकरीत्या शरीरात कोलेजनचे प्रमाण वाढविता येते. याविषयी नुकतेच पोषणतज्ज्ञ लीमा महाजन यांनी इन्स्टाग्रामवर कोलेजनयुक्त पेय शेअर केले; जे प्यायल्याने तुमच्या त्वचेचे आरोग्य सुधारते, असे सांगण्यात आले आहे.
त्यासाठी महाजन यांनी एक वाटी चिकन किंवा मटणातील हाडांचे सूप बनविण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही चिकन किंवा मटणाबरोबर बीन्स किंवा मासेदेखील वापरू शकता. त्यासाठी सर्वप्रथम चिकनमधील हाडांचे तुकडे एका कुकरमध्ये टाका. त्यानंतर त्यात पाणी आणि थोड्या प्रमाणात व्हिनेगर घेऊन उकळवा. यावेळी त्यात चिकन बनविण्यासाठी आपण जे गरम मसाले वापरतो, ते सर्व गरम मसाले टाका. वापरलेल्या लिंबूचे दोन तुकडे टाका. (अशा प्रकारे तयार सूप हाडांची मजबुती, तसेच कोलेजन व खनिजांसाठी फायदेशीर असतो.) तुम्ही हे २४ तासापर्यंत उकळून पिऊ शकता.
हेही वाचा – चहा पिणे पूर्णपणे बंद केल्यास वजन होते कमी? डॉक्टर काय सांगतात, वाचा
पोषणतज्ज्ञ लीमा महाजन यांच्या मते, हे प्रथिने आणि खनिजेयुक्त पेय केवळ त्वचेची लवचिकता सुधारण्याचेच काम करीत नाही, तर केसही मजबूत करते, तसेच आतडी, सांध्यांचे आरोग्य आणि त्वचेचे स्वरूप सुधारते. याचा सर्वोत्तम परिणाम मिळविण्यासाठी ते आठवड्यातून किमान दोन वेळा प्यायले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. पण खरचं याने त्वचा आणि केसांना फायदा होता का याविषयी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना पोषणतज्ज्ञ रुचिका जैन यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
याबाबत वसंत कुंज, फोर्टिस हॉस्पिटलच्या मुख्य क्लिनिकल पोषणतज्ज्ञ रुचिका जैन यांनीही सहमती दर्शवली. त्यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, जेव्हा तुम्ही मटणातील हाडे, अस्थिबंधन, टेंडर व इतर संयोजी उतकांना जास्त काळ पाण्यात उकळवता तेव्हा त्यातील कोलेजन सूपमध्ये उतरते. हा कोलेजनसमृद्ध मटणाचे सूप, सामान्यतः मटणातील हाडांचा रस्सा म्हणून ओळखला जातो; जो सांध्यांचे आरोग्य, त्वचेची लवचिकता आणि एकंदर संयोजी उतींचे आरोग्य सुधारणे यांसारखे फायदे देऊ शकतो.
जैन यांनी नमूद केले की, हाडांचे स्रोत, मटण रस्सा बनविण्याची वेळ आणि तो बनविण्यासाठी वापरलेले विविध घटक यांवर कोलेजनचे प्रमाण आणि त्याचे विशिष्ट फायदे अवलंबून असतात.
मटणातील हाडांच्या रश्शाव्यतिरिक्त कोलेजनचे इतर अनेक नैसर्गिक स्रोत आहेत. त्यावर गुडगावमधील आर्टेमिस हॉस्पिटलच्या क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट शबाना परवीन यांनी सांगितले की, मासे, विशेषत: ज्यांची हाडे खाण्यायोग्य असतात. जसे की सॅलमन व सार्डिन. त्याशिवाय अंड्याचा पांढरा भाग, कोलेजन-समृद्ध प्राण्यांच्या भागांपासून बनविलेले जिलेटिन, चीज व दही यांसारखे दुग्धजन्य पदार्थ, फळे आणि लिंबूवर्गीय फळे, पालेभाज्या व जांभूळ यांसारख्या पदार्थांमध्येही कोलेजनचे प्रमाण खूप असते.
एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे आणि ती म्हणजे कोलेजन त्वचेसाठी अनेक फायदे प्रदान करू शकते; परंतु त्याची प्रभावीता व्यक्तीपरत्वे बदलू शकते. त्यामुळे संतुलित आहार, पुरेसे हायड्रेशन आणि त्वचेची काळजी घेण्याच्या योग्य सवयींसह निरोगी जीवनशैली संपूर्ण त्वचेच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, असे पोषण तज्ज्ञ जैन यांनी नमूद केले.