Colorectal Cancer Information: जगामध्ये कर्करोगामुळे मृत्यू पावणाऱ्यांच्या विविध अवयवांची क्रमवारी लावल्यास, मोठया आतड्याचा तिसरा क्रमांक लागतो. जगभर या कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. विशेषतः पाश्चात्य देशांमध्ये याचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यामानाने आशिया, आफ्रिका खंडामध्ये कमी आहे. परंतु हल्ली ज्या ज्या देशांमध्ये पाश्चिमात्य देशांप्रमाणे राहणीमान व खाणेपिणे बदलले आहे, त्या देशामध्ये मोठया आतड्याच्या कर्करोगाचे प्रमाणदेखील वाढते आहे.

मोठ्या आतड्याचा कॅन्सर म्हणजे काय?

What happens to your body if you eat raw onions every day
तुम्ही रोज कच्चा कांदा खाल्ला तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Sharad Pawar and Amit Shah
Sharad Pawar : शरद पवारांचं अमित शाह यांना उत्तर, “१९७८ मध्ये मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हा हे गृहस्थ…..”
Badlapur Crime News
Badlapur Crime : पत्नीवर बलात्कार करणाऱ्या मित्राची पतीने डोक्यात हातोडी घालून केली हत्या, बदलापूरमधली घटना
Who is Sadhvi Harsha Richariya
Who is Beautiful Sadhvi: महाकुंभमध्ये साध्वी म्हणून मिरवणारी हर्षा रिचारिया कोण आहे? जुने रिल व्हायरल करुन केलं जातंय ट्रोल
Anna Bansode statement over Sharad Pawar praise RSS
Sharad Pawar: मविआचं पुढं काय होणार? राष्ट्रवादीचे खासदार महायुतीत जाणार? शरद पवारांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

मोठे आतडे म्हणजे आपल्या अन्नपचन संस्थेच्या सर्वात शेवटचा नळीसारखा अवयव. त्यात चयापचय क्रियेनंतर उरलेला कचरा किंवा मल साठवलेला असतो. मोठ्या आतड्याचा कर्करोग हा आतड्याच्या आतील आवरणांपासून सुरु होतो व तेथून पुढे पसरतो. अनेकदा मोठ्या आतड्यामध्ये छोट्या छोट्या गाठी आढळून येतात. हे Polyps सुरुवातीस कर्करोगाचे नसतात. परंतु अनेक वर्षे तसेच आतडयांमध्ये राहिल्यास त्याचे परिवर्तन कर्करोगामध्ये होऊ शकते, म्हणून अनेकदा Surgeons – Colonoscopy (दुर्बिणीचा तपास) करताना हे Polyps आढळल्यास काढून टाकतात. असे Polyps काढून ते तपासणीस पाठवून त्यात कर्करोग आहे की नाही, हे पडताळून पाहिले जाते. हा कर्करोग संसर्गजन्य नसला तरी, अनुवांशिक वा खानदानी आहे. म्हणजेच एखाद्या कुटुंबात हा आजार झाला तर त्या कुटुंबातील इतर व्यक्तींना (भावंडे, मुले इ.) हा आजार होण्याची शक्यता जास्त असते.

आतड्याचा कर्करोग होण्याची कारणे –

१. असमतोल आहार – स्निग्ध पदार्थ म्हणजेच चरबी (फॅट) जास्त असलेला आहार या कर्करोगास आमंत्रित करतो. ज्या देशामध्ये जास्त चरबीयुक्त आहार घेतला जातो, तिथे या कर्करोगाचे प्रमाण जास्त आढळते. स्निग्ध (फॅट) पदार्थांच्या पचनक्रियेनंतर जे अंतिम घटक तयार होतात ते Carcinogenic म्हणजेच कर्करोगास आमंत्रण देतात. याउलट ज्या आहारामध्ये खूप प्रमाणात फळे, भाज्या, पालेभाज्या व फायबरयुक्त पदार्थांचा समावेश असतो (उदा. भारतीय चौरस आहार) त्या देशात/ त्या व्यक्तींना हा कर्करोग होण्याची शक्यता कमी असते.

२. मोठ्या आतड्यातील गाठी Polyps – हे Polyps (गाठी) जरी बऱ्याचदा कर्करोगाच्या नसल्या तरी काही वर्षांनी पुढे जाऊन त्याचे रुपांतर कर्करोगामध्ये होऊ शकते.

३. मोठ्या आतड्याचे काही आजार – Ulcerative Colitis (कोलायटीस), Familiar Polyposis (कुटुंबातील अनेक व्यक्तींच्या मोठया आतड्यात खूप गाठी असणे) हे आजार रुग्णांना अनेक वर्ष असतात. हे आजार ज्या रुग्णांना अनेक वर्षे असतात त्यांना मोठ्या आतड्याचा कर्करोग होण्याची शक्यता दसपटीने वाढते.

४.अनुवंशिकता व जनुकांचा प्रभाव – कुटुंबामध्ये म्हणजेच रक्ताच्या नात्यामध्ये जर कुणाला मोठ्या आतड्याचा कर्करोग झालेला असेल तर हा कर्करोग इतर व्यक्तींना होऊ शकतो. अशा व्यक्तींनी तसेच ज्यांना Ulcerative Colitis (१० वर्षांपेक्षा जास्त) असेल तर वर्षातून एकदा सर्जनकडून वा दुर्बिणीद्वारे मोठया आतड्याची तपासणी करणे आवश्यक असते.
या आजाराची लक्षणे काय असू शकतात ?

या कर्करोगाची विविध लक्षणे

  • १. थकवा, अशक्तपणा
  • २. शौचाला जाण्याच्या सवयींमध्ये बदल होणे म्हणजे जी व्यक्ती रोज सकाळी शौचास जाते त्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा शौचाला जायला लागणे वा संडास दोन-चार दिवसातून एकदा होणे
  • ३. पातळ शौचास होणे किंवा बध्दकोष्ठाचा त्रास सुरु होणे
  • ४. शौचास पहिल्यापेक्षा अरुंद होणे
  • ५. शौचावाटे रक्त जाणे
  • ६. वजन घटणे, पोटात दुखू लागणे वा पोट फुगल्यासारखे वाटणे.

मोठ्या आतड्याच्या कर्करोगाची लक्षणे आजार सुरु झाल्यानंतर बऱ्याच काळानंतर जाणवायला लागतात. कर्करोग पोटात कुठल्या भागात आहे, यावरुन लक्षणे बदलू शकतात. कर्करोगाची गाठ जर उजव्या बाजूला आतड्यात असेल तर हे आतडे मोठे असल्याने कॅन्सरची गाठ खूप मोठी झाल्याशिवाय त्रास सुरू होत नाही. त्यामुळे हा आजार फार उशिरा लक्षात येतो. या कर्करोगामध्ये बराच काळ शौचावाटे रक्त जाऊन त्या रुग्णामध्ये अॅनेमिया (रक्त कमी होण्याची) लक्षणे म्हणजेच थकवा, दम लागणे इ. दिसतात.

हेही वाचा >> Ghee: झोपेतून उठताच एक चमचा तुपाचे सेवन करण्याचे फायदे वाचून व्हाल थक्क; खाण्याची पद्धतही नीट वाचा

तपासण्या कोणत्या कराव्यात ?

रुग्णास जेव्हा मोठया आतड्याचा कर्करोग असण्याची शक्यता वाटते तेव्हा पुढील तपासण्या कराव्या.

१. Colonoscopy यामध्ये एक नळी (दुर्बिण) शौचाच्या जागेमधून मोठया आतड्यापर्यंत आत टाकली जाते व आतडे आतून पूर्णपणे पाहून घेतले जाते. काही संशयास्पद आढळल्यास वा Polyps आढळल्यास ते काढून बाहेर घेतले जातात व पॅथॉलॉजिस्ट कडून कॅन्सरसाठी तपासून घेतले जातात.

. सीटी स्कॅन – (CT Scan) आतड्याचा कॅन्सर कुठे व किती पसरलाय हा तपास केला जातो.

३. Ba Enema – बेरीयम नावाचे पांढर औषध एनिमा द्वारे मोठया आतडयात टाकून एक्स-रे काढणे. दुर्बिणीच्या तपासामुळे हल्ली याची आवश्यकता कमी पडते.

मोठ्या आतड्याचा कॅन्सर होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी?

  • १. योग्य आहार घ्यावा, ज्यात पालेभाज्या, सलाड, तंतुमय पदार्थ म्हणजे कोंडा न काढता केलेल्या चपात्या, पॉलिश न केलेले तांदूळ वगैरे अन्न घ्यावे, चरबीयुक्त पदार्थांचे प्रमाण कमी करावे उदा. तेल, अंडी, मटण, चीज, बटर.
  • २. पन्नाशी नंतर प्रत्येकाने दरवर्षी किंवा शौचाच्या सवयीत बदल झाल्यास आपले शौच तपास करुन त्यातून रक्त जात नाही ना हे पाहावे तसेच शौचाची जागा आतून तपासून घ्यावी.
  • ३. कॅन्सर रुग्णाच्या फॅमिलीमध्ये कुणी संशयास्पद असेल तर त्याच्या रक्त, लघवी, शौचाचा तपास करुन घ्यावा. सोनोग्राफी, एन्डोस्कोपी, तपास इ. जरुरीप्रमाणे करुन घ्यावे.

उपाययोजना

योग्य उपाययोजना योग्य वेळेत झाल्या तर मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचे रुग्ण अनेक वर्षे चांगले राहू शकतात, म्हणूनच कर्करोगाचे लवकर निदान हे महत्वाचे ठरते.

१. शस्त्रक्रिया – मोठ्या आतड्याचा खराब झालेला भाग काढून टाकणे, हीच सर्वात चांगली उपाययोजना. कर्करोगाच्या दोन्ही बाजूंचा ५-१० सेमी भाग काढून ते पुन्हा जोडले जाते. मोठ्या आतड्याच्या आजूबाजूचा भागही काढला जातो. जर आजूबाजूचे अवयव या कर्करोगाला अडकलेले असतील तर तेही शक्य असल्यास काढले जातात. सर्वसाधारणतः मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचे उपाय केल्यानंतर रुग्ण जगण्याची शक्यता चांगली असल्यामुळे मोठया शस्त्रक्रिया केल्या जातात. जर यकृत/ फुप्फुस हे ही कर्करोगामुळे ग्रस्त झाले असल्यास त्याचा भाग काढून रुग्णास वाचवाता येते. अगदी पुढे गेलेल्या कर्करोगावर शस्त्रक्रिया करता येत नाही.

२. केमोथेरपी – (Chemotherapy) आज अनेक नवीन औषधे बाजारात उपलब्ध आहेत. ही औषधे वापरुन कर्करोगाच्या गाठी कमी करता येते. यामुळे मोठ्या गाठी काढणे सुकर होते. तसेच शस्त्रक्रिया केल्यानंतर थोडासा आजार बरा करता येतो. ही औषधे जरी महाग असली तरी त्याचा चांगला परिणाम होतो. परंतु कुठल्याही कर्करोगाच्या औषधांप्रमाणे याचेही शरीरावर अनावश्यक परिणाम होतात. त्यामुळे काळजी बाळगणे आवश्यक असते.

Story img Loader