स्वत:ची सुरक्षा आणि अन्न मिळवण्यासाठी आदिमानवाकरिता डोळे महत्त्वपूर्ण अवयव होते. आसपासच्या धोक्याचा मागोवा घेत अन्न शोधण्यासाठी त्यांचे डोळे चारही दिशांना फिरत होते. थोडक्यात, डोळ्यांची नेहमीच सर्व दिशेने हालचाल होत असे. पण आजचा काळ वेगळा आहे. बदलत्या जीवनशैलीचा आपल्या डोळ्यांवर वाईट परिणाम होता आहे. आज काल बराच वेळ काम करताना, मनोरंजनासाठी आपण स्क्रिनकडे टक लावून आणि अगदी जवळून पाहत असतो. थोडक्यात, आपल्या महत्त्वाच्या ज्ञानेंद्रियांपैकी एक म्हणजे डोळा, ज्याच्या आरोग्याला सध्याच्या शहरी जीवनशैलीचा फटका बसत आहेत. बहुतेक शहरांमध्ये डोळ्यांचा संसर्ग होत असल्याचे सध्या आढळून येत आहे. डोळ्यांच्या आरोग्याची योग्य काळजी न घेतल्यास आणि कमी प्रतिकारशक्ती असेल तर डोळ्यांचा संसर्ग होऊ शकतो. डोळ्यांचे व्यायाम, आहार, विश्रांती आणि डोळे साफ करण्याच्या काही साधे उपाय करून डोळ्यांची काळजी घेता येते. पालकांनी त्यांच्या मुलांच्या डोळ्यांची आणि त्यांच्या स्वतःची काळजी घेण्याची नितांत गरज आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

योग प्रशिक्षक कामिनी बोबडे यांनी इंडियन एक्सप्रेसला डोळ्यांचे आरोग्य आणि व्यायामाबाबत माहिती देताना स्वत:चा अनुभव सांगितला. त्या म्हणाल्या, ”डॉक्टरांनी जरी चष्मा वापरण्याचा सल्ला दिला असला आपण स्पष्ट पाहण्यासाठी त्यावर जास्त अवलंबून राहतो जे योग्य नाही. मी सहावीत असताना माझ्याकडे मायनस दोन पॉवरचे चष्मा होते. हे चष्मा थिएटर चित्रपट पाहण्याशिवाय मी ते कधीच घातले नाही. यामुळे ब्लॅकबोर्ड किंवा दूरच्या कोणत्याही वस्तूकडे पाहण्यासाठी माझ्या डोळ्यांच्या स्नायूंवर आणि नसांवर ताण येत असे. मला असेही जाणवले की, डोळे मिचकावणे आणि घट्ट बंद केल्याने माझी दृष्टी अधिक स्पष्ट होते. तेव्हा मला माहित नव्हते की, डोळे मिचकावणे, ताणणे आणि आराम करणे हे चांगले व्यायाम आहेत. थोडक्यात, कालांतराने माझी दृष्टी सुधारली आहे. आता डोळ्यांचे व्यायाम हा माझ्या रोजच्या योगाभ्यासाचा भाग झाला आहे.”

आपली दृष्टी स्पष्ट आणि आयुष्यभर चांगली ठेवण्यासाठी आणि डोळ्यांचा संसर्गसारख्या आजारांना बळी पडू नये यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे डोळ्यांचे व्यायाम करायला पाहिजे, असे योग प्रशिक्षक बोबडे सांगतात.

  • दररोज सकाळी, जेव्हा तुम्ही दात घासता तेव्हा तळहातावर थंड पाणी घ्या आणि पापण्यांवर कमीतकमी १० वेळा शिंपडा.
  • सुरुवातीला दररोज आणि नंतर कमीत कमी पर्यायी दिवशी किंवा जेव्हा जेव्हा तुम्हाला कॉप्युटर, लॅपटॉप किंवा मोबाईल सारख्या उपकरणांवर खूप कामकेल्यास किंवा सायनसमुळे त्रास जाणवतो अशा वेळी आवश्यक वाटेल तेव्हा नेतिचा (एका नाकपुडीतून पाणी सोडून दुसऱ्या नाकपुडीतून बाहेर काढणे) सराव करा.
  • डोळे ओलसर ठेवण्यासाठी डोळे मिचकावणे हा एक चांगला मार्ग आहे आणि ते कारच्या विंड शील्डप्रमाणे काम करतो. विशेषत: आजच्या प्रदूषित जगात डोळ्या मिचवकल्याने आतील घाण साफ होते.

व्यायाम

  • खुर्चीवर आरामात बसा, किंवा तुमची पाठ सरळ आणि जाणीवपूर्वक पायांची मांडी घालून, मुद्दाम तुमचे संपूर्ण शरीर शिथिल करा. हे आवश्यक आहे.
  • तुम्ही किती टोकापर्यंत स्पष्टपणे पाहू शकता याची जाणीव ठेवून तुमचे डोळ्याची बुबुळे अत्यंत उजवीकडे फिरवा. नंतर अगदी डावीकडे पाहण्याच्या उद्देशाने हळू हळू डोळ्यांची बुबुळे डावीकडे फिरवा. जेव्हा तुम्ही कमाल दृष्टीपर्यंत पोहोचता तेव्हा तीन ते पाच वेळा डोळे मिचकावा. ताणू नका. निवांत रहा. याच्या पाच ते दहा फेऱ्या करा.
  • त्याचप्रमाणे डोळे मिचकावत वर आणि खाली हलवा. पाच ते दहा फेऱ्या करा.
  • नंतर वरच्या उजवी बाजून खाली डावीकडे अशी तिरकी डोळ्यांची हालचाल करा. किमान पाच फेऱ्या करा.
  • शेवटी, घड्याळाच्या दिशेने आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने डोळे फिरवा. डोळे मिचाकवत प्रत्येक दिशेने पाच फेऱ्या करा.

हेही वाचा – टोमॅटो, बटाटा आणि वांग्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी सुरक्षित आहे का? जाणून घ्या आहारतज्ज्ञांकडून….

नासिका दृष्टी

आरामात बसा, नंतर तुमचा डावा हात डोळ्यां समोर वर करा, हात सरळ ठेवा. अंगठा बाहेर आणि सरळ ठेवून मुठ बनवा. अंगठ्याच्या टोकाकडे पहा, नंतर नाकाच्या टोकाला स्पर्श होईपर्यंत हळू हळू जवळ हलवा. नाकाच्या टोकाला स्पर्श करेपर्यंत अंगठ्याच्या टोकावर लक्ष केंद्रित करा. मग हळू हळू ते पुन्हा सुरुवातीच्या स्थितीकडे न्या, तुमची नजर अंगठ्याच्या टोकावर स्थिर ठेवा. जर तुम्हाला काही ताण वाटत असेल तर डोळे मिचकावा किंवा बंद करा आणि आराम करा.

हाताच्या तळव्यांनी डोळे झाका

आरामात बसा. आपले तळवे उबदार होईपर्यंत घासून घ्या, नंतर आपल्या डोळ्यांवर हात ठेवा. हाताच्या बोटांनी डोळे झाकले जातील याची खात्री करा. काही वेळ तसेच ठेवा आणि मग डोळ्यांवरून हात काढा. ही एक फेरी आहे. डोळ्यांच्या समस्येच्या तीव्रतेनुसार पाच ते दहा फेऱ्या करा.

आहार:

व्हिटॅमिन ए समृद्ध पदार्थ हे निरोगी डोळे आणि दृष्टीसाठी सर्वोत्तम आहे. डोळ्याची कोणतीही समस्या दूर करण्यासाठी वर्षभर गाजराच्या रसाचा ग्लास पिणे आवश्यक आहे. व्हिटॅमिन ए समृद्ध असलेले इतर पदार्थ म्हणजे पालक, रताळे याचे सेवन करा.

हेही वाचा – पहिला हार्ट अटॅक टाळण्यासाठी ॲस्पिरिन वापरता का? डॉक्टरांकडून जाणून घ्या; ते कसे काम करते?

विश्रांती:

हे महत्वाचे आहे. मानसिक ताण, काळजी आणि चिंता हे डोळ्यांच्या सभोवतालच्या नसा आणि स्नायूंवर ताण देतात आणि दृष्टी कमी करते. त्यामुळे शवासन आणि योग निद्रा यांसारखी विश्रांती महत्त्वाची आहे.

स्पष्टपणे विचार करण्यासाठी आणि वास्तविकता जाणून घेण्यासाठी, आपल्याला चांगली दृष्टी आवश्यक आहे,. म्हणून मौल्यवान डोळ्यांची काळजी घ्या.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Conjunctivitis is just an outcome of poor eye health here are a few yoga exercises for healthy eyes snk