How To Avoid Constant Peeing: उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही प्रवासाचे प्लॅनिंग करत असाल तर आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. तुम्ही ट्रेन, बस, गाडी, विमान कशानेही प्रवास करत असाल तर एक समस्या तुम्हालाही कधीतरी जाणवली असेल, ती म्हणजे वारंवार वॉशरूमला जावे लागणे. यामुळेच अनेकदा प्रवासाचा मूड खराब होतो. वयस्कर व्यक्ती, लहान मुले, स्त्री- पुरुष सगळ्यांनाच हा त्रास होऊ शकतो. यामागे तुमचा अतिसक्रिय ब्लॅडर कारण असू शकतो. या त्रासाचे नेमके कारण, लक्षणे व उपाय याविषयी डॉ विमल दासी – संचालक, युरोलॉजी विभाग, मॅक्स हॉस्पिटल यांनी हेल्थशॉट्सला माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अतिसक्रिय ब्लॅडर म्हणजे काय? (What Is Overactive Bladder)

डॉ दासी म्हणतात, कमजोर ब्लॅडर ही समस्या पुरुष व स्त्री दोघांमध्ये असते पण सहसा महिलांना याचा त्रास अधिक होऊ शकतो. तज्ज्ञ म्हणतात की, महिलांना अतिसक्रिय ब्लॅडरचा दुप्पट सामना करावा लागू शकतो. जेव्हा मूत्राशय अनपेक्षित व सातत्याने आंकुचित होते तेव्हा अतिसक्रिय ब्लॅडरचा त्रास बळावतो. स्ट्रोक, मधुमेह किंवा रजोनिवृत्ती दरम्यान स्त्रियांमध्ये हार्मोनल बदलांशी सुद्धा हा त्रास संबंधित असू शकतात. यात मुख्य लक्षण म्हणजे तुम्हाला सतत लघवीला इच्छा होऊ शकते. याशिवाय खालील लक्षणे सुद्धा दिसून येऊ शकतात-

• अचानक लघवी करण्याची तीव्र इच्छा होते
• लघवीच्या वारंवारतेत वाढ (दिवसभरात 6 ते 8 वेळा).
• लघवी करण्यासाठी रात्री एकापेक्षा जास्त वेळा जागे होणे.
• लघवी करण्याची इच्छा असूनही प्रत्यक्षात लघवी न होणे

अतिसक्रिय ब्लॅडरवर उपाय (How To Avoid Constant Washroom Breaks)

  1. कॅफीन आणि द्रव पदार्थांचे सेवन किती करावे?

तुम्‍ही तुमच्‍या दिवसाची सुरुवात एक कप कॉफीने करू शकता, परंतु प्रवास करणार असाल तर चहा- कॉफी टाळणे उत्तम ठरेल. डॉ दासी म्हणतात की कॅफिन हे एक उत्तेजक पेय आहे जे मध्यवर्ती मज्जासंस्थेवर परिणाम करू शकते आणि हृदय गती तसेच रक्तदाब वाढवू शकते. यामुळे काही लोकांना चिंता किंवा अस्वस्थता अनुभवावी लागते. हे टाळण्यासाठी कॉफी- चहा, कार्बोनेटड ड्रिंकचे सेवन टाळावे. पाण्याचे सेवन करण्यास हरकत नाही पण अतिरेक करू नये.

  1. खाण्याकडे लक्ष द्या

अतिसक्रिय मूत्राशय असलेल्या महिलांनी, प्रवास करत असताना संतुलित आहार घ्यावा आणि पोर्शन कंट्रोलवर लक्ष केंद्रित करावे.

  1. क्रॉनिक आजार असल्यास…

तुम्हाला मधुमेहासारखा कोणताही त्रास असल्यास तुमची औषधे कोणत्या वेळेत घ्यायची याविषयी डॉक्टरांचा सल्ला घ्या. शक्यतो प्रवासाच्या काही वेळ आधी औषधे घेणे टाळणे उत्तम ठरेल.

  1. UTI टाळण्यासाठी स्वच्छता राखा

बहुतांश वेळा मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे सुद्धा वारंवार लघवीला जाऊ लागू शकते. त्यामुळे खाजगी स्वच्छता राखून मूत्राशयाचे आरोग्य सुधारण्याकडे लक्ष द्या. सार्वजनिक शौचालय वापरताना आवश्यक ती काळजी घ्या.

हे ही वाचा<< २० रुपयांहून कमी खर्चात भुवया छान दाट व जाड करण्याचे १० सोपे उपाय; कसा वापर करायचा जाणून घ्या

टीप: ज्या दिवशी तुम्ही प्रवास करत नसाल त्या दिवशी तुम्ही नियमितपणे पेल्विक व्यायाम करू शकता. तसेच जळजळ जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Constant urge of peeing but can not do it how to avoid uti infections at public toilet during traveling health expert answers svs
Show comments