Weight loss snacks: तुम्हाला सकाळचा नाश्ता करायला आवडतो; परंतु तुम्ही तुमच्या वाढत्या वजनामुळे चिंतेत आहात? अशा वेळी पौष्टिक नाश्ता म्हणजेच व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर व हेल्दी फॅट्स यांनी समृद्ध असलेला नाश्ता करायला हवा. एस्टर व्हाईटफिल्ड हॉस्पिटल, बेंगळुरू येथील मुख्य क्लिनिकल आहारतज्ज्ञ वीणा व्ही. यांच्या मते, अशा निवडीमुळे जास्त खाणे टाळता येते आणि तुमच्या रोजच्या जेवणातील कॅलरीजचे संतुलन राखण्यासत मदत मिळते.

वजन कमी करणे हे तुमचे उद्दिष्ट असल्यास, पोट भरणाऱ्या स्नॅक्सला प्राधान्य द्या आणि खाण्याची लालसा नियंत्रित करण्यात स्वत:ला मदत करा. आज आम्ही तुम्हाला कमी कॅलरीज असलेले पौष्टिक स्नॅक्स कोणते हे सांगणार आहोत; ज्याच्या सेवनाने तुम्ही वजनही नियंत्रणात ठेवू शकाल.

भाजलेले काजू आणि बिया : ड्रायफ्रुट्स आणि भाजलेल्या बियांचे मिश्रण प्रथिने, फायबर प्रदान करते. पौष्टिक स्नॅकसाठी त्यांच्या फळांचाही आस्वाद घ्या.

मखाने किंवा उकडलेल्या चण्याची कोशिंबीर : मखाने आणि उकडलेल्या चण्याची कोशिंबीर हे दोन्ही पदार्थ प्रथिने आणि फायबरचा समृद्ध स्रोत आहेत. उकडलेल्या चण्यामध्ये कांदा, टोमॅटो, काकडी, बीटही टाका. त्यामुळे तुमची भूक नियंत्रित करण्यास मदत होईल.

पीनट बटरसह सफरचंदाचे तुकडे : सफरचंद फायबर देते; तर पीनट किंवा बदाम बटरमध्ये निरोगी चरबी आणि प्रथिने असतात. हा एक स्वादिष्ट पर्याय ठरतो, जो अधिक खाण्याची लालसा नियंत्रित करण्यास आपल्याला मदत करतो.

उकडलेले अंडी : उच्च प्रथिनांचा स्रोत म्हणजे उकडलेले अंडी. त्यात भरपूर पोषक घटक असतात आणि आश्चर्यकारकपणे कॅलरीज कमी असतात. त्यामुळे भूक कमी होण्यास मदत मिळते.

हेही वाचा: निरोगी आरोग्यासाठी सकाळी उठल्यानंतर काय करावं? आरोग्यतज्ज्ञांनी सांगितल्या टिप्स

रताळे : रताळी ही कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सने समृद्ध असतात, जी दीर्घ कालावधीसाठी ऊर्जा देतात. हे ऊर्जा पातळी वाढवण्यास मदत करतात.

केळी : कार्बोहायड्रेट्स आणि पोटॅशियमने समृद्ध केळी ऊर्जा आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी उत्तम आहेत.

ओट्स : बीटा-ग्लुकन यांसारखे विरघळणारे फायबर असलेले ओट्स स्थिर ऊर्जा देऊन जास्त प्रमाणातील भूक नियंत्रणात ठेवतात.

Story img Loader