तुमच्यातील अनेक जण सकाळी लवकर उठून तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करतात. पण, व्यायाम करण्यासोबत पोषक आहार घेणंही तितकचं महत्वाचं असतं. अनेक जण नियमित व्यायाम तर करतात, पण व्यायाम केल्यानंतर हेल्दी अन्न खात नाहीत किंवा चुकीच्या पदार्थांचे सेवन करतात. यामुळे व्यायामाचा योग्य तो परिणाम आपल्या शरीरावर दिसून येत नाही. तर आज आम्ही तुम्हाला व्यायामानंतर कोणतं रिकव्हरी ड्रिंक पिण्यास योग्य आहे हे सांगणार आहोत. व्यायाम केल्यानंतर नारळाच्या पाण्यात पिवळ्या वाटाण्याची प्रोटीन पावडर मिसळणे; हे पेय आरोग्यासाठी उत्तम ठरेल.द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना डॉक्टर लवनीत बत्रा आणि डॉक्टर निरुपमा राव यांनी नारळाच्या पाण्यासोबत प्रोटीनचे सेवन करणे आरोग्यासाठी कसे फायदेशीर ठरेल याची माहिती दिली आहे.

नारळाचे पाणी स्वादिष्ट आणि हेल्दी असते. त्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. नारळाचे पाणी प्यायल्याने शरीर ताजंतवानं होतं. नारळ पाण्यात कॅलरीज अतिशय कमी असतात. मात्र, त्यामध्ये पोषक तत्वे मोठ्या प्रमाणात असतात. हे एक सुपर ड्रिंकच्या रुपात आपल्या शरीरात काम करते. तसेच अनेक डाळी या प्रोटीनचा उत्तम स्रोत आहेत. पिवळ्या आणि हिरव्या डाळींमधून शरीराला साधारण ९ ते १० ग्रॅमपर्यंत प्रोटीन मिळते. मूग, चण्याची डाळ प्रोटीनची कमतरता पूर्ण करतात. अनेक डाळींमधून प्रोटीन मिळवणे सहज शक्य होते. त्यामुळे वर्कआउटनंतर नारळाच्या पाण्यात, पिवळ्या वाटाण्याची प्रोटीन पावडर मिक्स करणे हे आरोग्यासाठी उत्तम पेय ठरेल. रेजुआ एनर्जी सेंटर, मुंबईच्या डॉक्टर निरुपमा राव या आहार तज्ज्ञांनी हे संयोजन विविध व्यक्तींसाठी योग्य ठरू शकते असे सांगितले आहे.

Hack to remove coconut from its shell
नारळाच्या करवंटीमधून खोबरे बाहेर काढण्यासाठी ‘ही’ सोपी पद्धत नक्की ट्राय करा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Health benefits associated with boiled food
Gurmeet Choudhary: दीड वर्ष साखर, चपाती, भात अन् भाकरी खाल्लीच नाही तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? वाचा तज्ज्ञांचे मत…
When's The Best Time To Eat Rice? to burn fats and calories also keeps blood sugar in control health tips
मंडळी आता भात न सोडता वजन व ब्लड शुगरवर मिळवा नियंत्रण! तज्ज्ञांनी सांगितली भात खाण्याची योग्य वेळ
gul poli
“तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!” संक्रातीनिमित्त झटपट बनवा खमंग खुसखुशीत तिळाची पोळी! ही घ्या रेसिपी
nashik nylon manja loksatta news
नाशिकमध्ये एक लाखाचा नायलाॅन मांजा जप्त
arrival of vegetables in huge amount for Bhogi
भोगीनिमित्त भाज्यांची मोठी आवक; भुईमुग शेंग, भेंडी, पापडी, वालवर, वांगी, गाजर महाग
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही

तुम्ही जेव्हा व्यायाम करता तेव्हा शरीराचे स्नायू ताणले जातात. आणि व्यायाम करताना निघणारा घाम शरीरातले पाणी कमी करतो. यामुळे तज्ज्ञ एनर्जी ड्रिंक्स पिण्याचा नेहमीच सल्ला देतात. डॉक्टर निरुपमा राव यांनी स्पष्ट केले की, नारळाच्या पाण्यात पिवळ्या वाटण्याची प्रोटीन पावडर मिसळल्याने एक पेय तयार होते, जे वनस्पती आधारित प्रथिने नारळाच्या पाण्यातील हायड्रेटिंग आणि इलेक्ट्रोलाइट-समृद्ध गुणधर्मांसह एकत्र करते.

प्रथिनांचा योग्य तो वापर आहारात केल्याने तुमच्या फिटनेस उद्दिष्टांमध्ये त्याचा फरक पडू शकतो. असे म्हटले जाते की, पुरेशी प्रथिने आपल्या शरीरातील रोग बरे करण्यास आणि शरीराची शक्ती वाढवण्यास मदत करू शकतात. पोषणतज्ज्ञ डॉक्टर लवनीत बत्रा यांच्या मते, जर तुम्हाला तुमच्या आहारात पुरेशी आणि चांगल्या दर्जाची प्रथिने समाविष्ट करायची असल्यास ‘पिवळ्या वाटण्याचे प्रोटीन’ (Yellow Pea Protein) हा एक सोपा आणि जलद मार्ग ठरेल .

हेही वाचा… इतर आजार असणाऱ्यांनी ‘एरिस’ आणि ‘पिरोला’ पासून संरक्षण मिळवण्यासाठी नवीन कोविड बुस्टर घ्यावा का? वाचा तज्ज्ञ काय सांगतात…

व्यायाम केल्यानंतर तुमच्या शरीरातील प्रथिनांची गरज १२-२५ ग्रॅमने वाढू शकते. तेव्हा तुम्हाला पिवळ्या वाटाण्याच्या प्रोटीन पावडरचा उपयोग प्रथिने मिळवण्यासाठी मदत करू शकतात. व्यायाम केल्यानंतर तुम्ही नारळाच्या पाण्यासोबत प्रोटीनचे सेवन केल्यास तुमचे शरीर समृद्ध होऊ शकते आणि प्रथिनांची कमतरतादेखील भरून निघू शकते.

डॉक्टर लवनीत बत्रा यांच्या मते, या पेयाचे सेवन केल्यास, डाळीतील उच्च प्रथिनांचे प्रमाण पोट साफ होण्यास, ग्लुकोजचे शोषण करणे तसेच भूक-नियंत्रणात आणण्यास मदत करते. ग्लायसेमिक इंडेक्स (GI) रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते. लठ्ठपणा कमी करते आणि ज्यांना मधुमेहाचा धोका आहे, त्यांना मात्र याचा फायदा होतो. कारण यातील अँटिऑक्सिडंट मधुमेह रुग्णांना फायदे देऊ शकते, असे डॉक्टर लवनीत बत्रा यांनी सांगितले आहे.

डॉक्टर निरुपमा राव यांनी नारळाचे पाणी आणि प्रोटीनचे सेवन का करावे, याचे काही फायदे पुढीलप्रमाणे सांगितले आहेत:

१. प्रथिने स्त्रोत : पिवळा वाटाणा प्रोटीन हे प्रथिनांचे शाकाहारी-अनुकूल स्त्रोत आहे, जे शाकाहारी आहेत किंवा शाकाहारी डाएट याचे पालन करतात, त्यांच्यासाठी हे योग्य ठरेल.

२. हायड्रेशन : नारळाचे पाणी हे पोटॅशियम आणि सोडियमसारख्या इलेक्ट्रोलाइट्सचे नैसर्गिक स्त्रोत आहे, जे व्यायामानंतर हायड्रेशन आणि इलेक्ट्रोलाइट यांची पातळी पुन्हा समतोल राखण्यास मदत करू शकते.

३. पौष्टिक विविधता : नारळाचे पाणी आणि पिवळ्या वाटाण्यांचे प्रोटीन; जीवनसत्त्वे, खनिजे, हायड्रेशनसह पोषक तत्वांचे मिश्रण प्रदान करते, जे संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते; असे डॉक्टर निरुपमा राव यांनी स्पष्ट केले आहे.
डॉक्टर निरुपमा राव यांच्या मते, नारळाचे पाणी आणि पिवळ्या वाटाण्यांचे प्रोटीन मिक्स करून तयार केलेलं हे पेय विविध व्यक्तींसाठी योग्य असू शकतं. शाकाहारी, क्रीडापटू किंवा जे लोक ताजेतवाने आणि पौष्टिक पेय घेऊ इच्छितात, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय असू शकतो, असे डॉक्टर निरुपमा राव म्हणाल्या आहेत. .

साधारणपणे पिवळ्या वाटण्याचे प्रोटीन बहुतेक लोकांसाठी सुरक्षित असते,जेव्हा याचे सेवन मध्यम प्रमाणात केले जाते. तुम्ही पिवळ्या वाटाण्याचे प्रथिने आणि नारळाचे पाणी किती प्रमाणात प्यावे हे तुमच्या आहारातील आणि पौष्टिक गरजांवर अवलंबून असते. या पेयाचे सेवन करताना, तुमच्या दैनंदिन प्रथिनांची आवश्यकता आणि तुमची कार्यक्षमता यांसारख्या घटकांचा विचार करा, असे डॉक्टर बत्रा म्हणाल्या आहेत. तसेच व्यायामानंतर आहारात हे पेय तुम्हाला समाविष्ट करायचे आहे की नाही हे तपासण्यासाठी आहारातील पोषक विश्लेषण करणे आवश्यक आहे किंवा आहारात समाविष्ट करण्यापूर्वी तज्ज्ञांशी बोलणे गरजेचं आहे, असे डॉक्टर लवनीत बत्रा म्हणाल्या आहेत.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. गरज भासल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या)

Story img Loader