Binge Drinking : मद्यपान हे आरोग्यासाठी हानिकारक आहे, तरीसुद्धा काही लोक आरोग्याची पर्वा न करता मद्यपान करतात. सध्या मद्यपानामध्ये ‘बिंज ड्रिंकिंग’ (Binge drinking) नावाचा एक नवा प्रकार आला आहे. जे लोक महिन्यातून एकदाच मद्यपान करतात, पण त्यावेळी अति प्रमाणात दारूचे सेवन करतात, यालाच ‘बिंज ड्रिंकिंग’ म्हणतात.
महिन्यातून एकदा अति प्रमाणात मद्यपान केले तरीही त्याचा शरीरावर आणि स्नायूंवर नकारात्मक परिणाम दिसू शकतो. नियमित मद्यपान केल्यामुळे शरीरावर जितका दुष्परिणाम होतो, तितका नकारात्मक परिणाम या ‘बिंज ड्रिंकिंग’ प्रकारामुळे होत नाही, तरीसुद्धा ‘बिंज ड्रिंकिंग’ आरोग्यास धोकादायक ठरू शकते आणि तुमच्या फिटनेसमध्ये अडचणी निर्माण करू शकते. याविषयी उदयपूरच्या पारस हेल्थ, इंटरनल मेडिसिनचे संचालक डॉ. मधू नहर यांनी सविस्तर सांगितले.
दारूच्या सेवनामुळे शरीरातील पेशी जेव्हा प्रोटिन्स बनवतात, तेव्हा अडथळा निर्माण होतो. हे प्रोटिन्स स्नायूंच्या विकासासाठी आवश्यक असतात.
डॉ. नहर सांगतात, “सतत मद्यपान केल्यामुळे वर्कआउटनंतर शरीरातील प्रक्रिया मंदावते, ज्यामुळे स्नायू कमकुवत होतात.”
मद्यपानामुळे शरीरातील लघवीचे प्रमाणसुद्धा वाढते आणि सतत घाम येतो. अशा वेळी स्नायूंची ऊर्जा कमी होते, त्यामुळे वर्कआउट करताना स्नानू नीट काम करत नाही.
हेही वाचा : नाशपती खा, वजन कमी करण्यापासून रक्तदाब नियंत्रित ठेवण्यापर्यंत मिळतील हे फायदे; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…
डॉ. नहार सांगतात, अति प्रमाणात मद्यपान केल्याने शरीरातील पेशींना स्नायूंच्या विकासासाठी आवश्यक असलेले जीवनसत्त्वे आणि खनिजांसारखे पोषक तत्त्वे शोषून घेण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.”
दारूमुळे टेस्टोस्टेरॉनसारखे हार्मोन्स संतुलित ठेवण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. हे हार्मोन्स स्नायूंच्या विकासासाठी अत्यंत गरजेचे असतात. अति प्रमाणात मद्यपान केल्यामुळे शरीरातील स्ट्रेस हार्मोन वाढतो, त्यामुळे स्नायूंची वाढ थांबते.
डॉ. नहार पुढे सांगतात, “शरीर नेहमी हायड्रेटेड ठेवणे, संतुलित आहार घेणे आणि शरीराला पुरेसा वेळ देणे, यामुळे मद्यपानाचा नकारात्मक प्रभाव कमी करता येऊ शकतो. स्नायूंच्या विकासासाठी मर्यादित प्रमाणात दारूचे सेवन करणे गरजेचे आहे, यामुळे तुम्ही निरोगी जीवन जगू शकता.