Triphala Benefits: आवळा, हरड यांप्रमाणेच त्रिफळादेखील एक प्राचीन आयुर्वेदिक उपचार आहे; जो सध्या अनेक समस्यांवर रामबाण उपाय म्हणून वापरला जात आहे. अनेक आजारांवर फायदेशीर, तसेच बद्धकोष्ठतेवर उपचार करण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत आणि दातांच्या समस्या सोडविण्यासाठीही सर्वत्र याचा वापर केला जातो. त्रिफळा सूज कमी करण्यासाठीही फायदेशीर आहे. तसेच काही प्रयोगशाळांमधील अभ्यासानुसार, त्रिफळा कर्करोगांपासून संरक्षण करू शकतो.

परंतु, त्रिफळा अनेक समस्यांवर उपाय असूनही या औषधाचे काही दुष्परिणामदेखील होऊ शकतात. त्रिफळा खाणारे अनेक जण केवळ त्याचे फायदेच पाहतात आणि त्याच्या संभाव्य दुष्परिणामांकडे दुर्लक्ष करतात. त्रिफळाचे उपचार सुरू करण्यापूर्वी त्याचे चांगले किंवा वाईट असे सर्व परिणाम जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
pune Arogya sena
औषधांच्या किमती नियंत्रणात आणा, आरोग्य व्यवस्था सक्षम करा! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेनेकडून खुला जाहीरनामा
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
lead in turmeric FSSAI
तुमच्या आहारातील हळद विषारी आहे का? संशोधनात हळदीत आढळून आली ‘या’ हानिकारक धातूची भेसळ
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर

कनिक्का मल्होत्रा (सल्लागार, आहारतज्ज्ञ व मधुमेह शिक्षक) यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस.कॉम’ला त्रिफळाच्या काही दुष्परिणामांची माहिती दिली आहे.

आतड्यांवरील परिणाम होऊ शकतो

कनिका यांच्या मते, त्रिफळाच्या वापराचे तुमच्या आतड्यावर बरेच संभाव्य दुष्परिणाम होऊ शकतात. “जास्त प्रमाणात त्रिफळाचे सेवन केल्याने त्याच्या नैसर्गिक रेचक प्रभावामुळे अतिसार आणि ओटीपोटात दुखण्याचा त्रास होऊ शकतो. तसेच रिकाम्या पोटी त्रिफळाचे सेवन केल्याने पोटासंबंधीच्या समस्या निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो,” असे कनिक्का यांनी सांगितले. त्यांनी पुढे हेही स्पष्ट केले की, त्रिफळाचे अधिक सेवन करण्यापूर्वी एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे; विशेषत: जर तुम्हाला इतर वेळीदेखील पोटाची समस्या उद्भवत असेल तर”

गर्भवती महिलांनाही होऊ शकतो दुष्परिणाम

गर्भवती किंवा स्तनपान करवणाऱ्या महिलांना त्रिफळाचे सेवन करण्याची शिफारस केलेली नाही. गर्भधारणेदरम्यान त्रिफळाचे सेवन केल्यास, नंतर स्तनपानाच्या समस्या उद्भवू शकतात आणि काही प्रकरणांमध्ये गर्भपाताचा धोकाही वाढू शकतो. खरे तर कनिक्का हे सुचवितात की, “गर्भधारणेदरम्यान कोणताही पूरक आहार घेण्यापूर्वी आरोग्य तज्ज्ञाशी (हेल्थ एक्स्पर्ट्सशी) सल्लामसलत करणे गरजेचे आहे.”

त्रिफळाचे सेवन कसे करावे?

त्रिफळाचे सेवन करण्यापूर्वी आहारतज्ज्ञ, पोषणतज्ज्ञ, फार्मासिस्ट किंवा आरोग्य सेवा प्रदात्याशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे. त्याशिवाय त्रिफळाच्या योग्य डोसबद्दल पुरेशी वैज्ञानिक माहिती उपलब्ध नाही, ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. परंतु, काही स्रोत असे सुचवतात की, एखाद्या व्यक्तीने दररोज केवळ ५०० मिलिग्रॅम ते एक ग्रॅमचे सेवन केले पाहिजे.

हेही वाचा: लहान मुलांचा ताप कमी करण्यासाठी ओले सॉक्स वापरावे? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला..

कनिक्का यांनी सांगितले, “काही आयुर्वेदिक पूरकांमध्ये धोकादायक प्रमाणात शिसे, पारा किंवा आर्सेनिक यांसारखे दूषित घटक आढळले आहेत.” म्हणून हर्बल सप्लिमेंटचे सेवन करण्यापूर्वी त्याची गुणवत्ता तपासणेदेखील अत्यावश्यक आहे.”