सकाळी लवकर शाळेत जायचं म्हणून, तर ऑफिसला जाण्यासाठी लवकर उठायचं म्हणून आपल्यातील बरेच जण रोजच्या ठरलेल्या वेळेतच रात्रीचं जेवण करतात. काही जण नऊ, दहा तर काही जण अगदी अकरा वाजतासुद्धा जेवतात; तर काही जण भूक लागल्यावर जेवायला घेतात. आजच्या डिजिटल जगात आपण केव्हा, किती वेळा आणि किती खावे याबद्दल आपल्याला अनेकदा सल्ले दिले जातात. पण, अलीकडेच हृदयरोगतज्ज्ञ आणि लेखक, डॉक्टर बेल्ले मोनाप्पा हेगडे यांनी काटेकोर वेळापत्रकानुसार खाणे हा आपल्या आरोग्यासाठी सर्वोत्तम मार्ग असू शकत नाही, असे स्पष्ट केलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की, आपण आपल्या शरीराचे ऐकले पाहिजे आणि जेवणाच्या निर्धारित वेळा पाळण्याऐवजी जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हाच खाल्ले पाहिजे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका रीलमध्ये, त्यांनी एका अमेरिकन बालरोगतज्ज्ञाबद्दल एक ऐतिहासिक किस्सा शेअर केला आहे, ज्यामध्ये मुलांसाठी कठोर आहार वेळापत्रकांचा सल्ला दिला होता. परिणामी, अशा काही निवडक प्रकरणांमध्ये बाळांचा मृत्यू झाला असे समोर आले. अखेरीस त्यांनी असे म्हटले आहे की, जेव्हा बाळांना भूक लागते तेव्हा ते रडतात. त्यामुळे घड्याळाच्या नव्हे तर त्यांच्या भूकेच्या संकेतांवर आधारित त्यांना खायला दिलं पाहिजे, असा दावा केला आहे. कारण आपल्यापैकी बऱ्याच जणांना दररोज ठराविक वेळी नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण खाण्याची सवय असताना डॉक्टर बेल्ले मोनाप्पा हेगडे सुचवतात की, ही प्रथा आपल्या नैसर्गिक शारीरिक लयांशी जुळत नाही.
हेही वाचा…जिमला जाण्यापूर्वी ‘या’ वेळेत करा बीटाच्या रसाचे सेवन; स्नायू राहतील मजबूत, वाचा तज्ज्ञ काय म्हणतात
व्हिडीओ नक्की बघा…
तर या विषयाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी व आहाराच्या या संकल्पनेचा अवलंब करताना द इंडियन एक्स्प्रेसने सल्लागार आहारतज्ज्ञ आणि मधुमेह शिक्षक कनिक्का मल्होत्रा यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी डॉक्टर म्हणाल्या की, आहाराचा समतोल राखण्याची एखादी वेळ ठरवा, पण तुमच्या शरीराच्या भुकेचे संकेतसुद्धा लक्षात घ्या. कारण जर तुम्हाला मधुमेहासारख्या आरोग्यविषयक समस्या असल्यास तुमच्या रक्तातील साखर स्थिर ठेवण्यासाठी जेवणाच्या पद्धतीची एक चौकट तयार करा, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
वेळ विरुद्ध भूक (Timing vs. hunger) – या दोन्ही पद्धती व त्यांचे होणारे परिणाम वेगवेगळे आहेत:
जेवणाचे ठरलेले वेळापत्रक आणि भूक लागल्यावर अन्नाचे सेवन करण्याची सकारात्मक व नकारात्मक बाजू जाणून घेऊ.
वेळापत्रकानुसार जेवणे –
शारीरिक प्रभाव : मधुमेह किंवा पूर्व मधुमेह असलेल्यांसाठी रक्तातील साखरेचे नियमन करू शकते. पचनास प्राधान्य देऊ शकते; ज्यामुळे अन्न प्रक्रिया सुरळीत होते.
उत्तर – तर याची नकारात्मक बाजू पाहता ठरलेल्या वेळेत अन्नाचे सेवन केल्याने भुकेकडे दुर्लक्ष होते, यामुळे ठरवलेल्या वेळेत जास्त खाणे, चयापचय बिघडवणे आणि संभाव्यतः पचनास त्रास होऊ शकतो.
भूक लागल्यावर अन्नाचे सेवन करणे –
शारीरिक प्रभाव : आपल्या शरीराच्या नैसर्गिक संकेतांना प्रतिसाद देतो. पचनक्रिया आणि पोषक घटकांचे शोषण, मदत आणि चयापचय क्रियादेखील सुधारते.
उत्तर – तर याची नकारात्मक बाजू पाहता व्यस्त शेड्यूलमुळे जेवण टाळल्यास नंतर जास्त प्रमाणात खाल्लं जातं आणि रक्तातील साखरेची पातळी विस्कळीत होऊ शकते.
जेवण आणि वजन व्यवस्थापन :
डॉक्टर कनिक्का मल्होत्रा यांनी वेळेवर जेवण घेणे आणि वजन कमी करणे यामधील सामान्य सिद्धांतसुद्धा मांडला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार खाण्याचे निश्चित वेळापत्रक असल्याने अति खाणे टाळता येते, यामुळे वजन कमी करण्यासही मदत होते. तसेच वेगवेगळ्या शरीराच्या हालचाल किंवा चलनवलन स्तरावर आधारित आहाराचे सेवन तुम्ही करू शकता. तुम्ही ॲक्टिव्ह दिवसांमध्ये कमी खाऊ शकता किंवा विश्रांतीच्या दिवसांमध्ये जास्त खाऊ शकता. यावेळी तुमचे कठोर वेळापत्रक आधुनिक जीवनशैलीसाठी नम्र ठरू शकते. हा दृष्टिकोन काहींसाठी उपयुक्त ठरू शकतो वा काहींसाठी नाही. पण, ही आहाराच्या सेवनासाठी कोणत्याही प्रकारची जादूची गोळी नाही आहे. तुम्ही आरोग्यवर्धक आहाराच्या निवडींवर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या शरीराची हालचाल किंवा चलनवलन स्तरावर आधारित आहाराचा मार्ग निवडा, असे डॉक्टर म्हणतात.
तसेच ही बाब लक्षात घेणेही महत्वाचे आहे की, लक्षपूर्वक, मनापासून खाणे ही संतुलनाची एक गुरुकिल्ली आहे. डॉक्टर मल्होत्रा ठामपणे सांगतात की, कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त, तुम्ही किती मनापासून अन्नाचे सेवन करता यावर भर देणंही तितकेच महत्त्वाचे आहे. हे तुम्हाला खरी भूक आणि भावनिक किंवा सवयीचे संकेत यांच्यात फरक समजून घेण्यास मदत करते.
भूकेचे संकेत : तुमच्या शरीराचे संकेत समजून घ्या. पोट वाढणे, ऊर्जा कमी होणे किंवा एखादी गोष्ट करताना लक्ष न लागणे म्हणजे तुम्हाला भूक लागली असेल हे समजून घ्या आणि त्यावेळेस काहीतरी खाऊन घ्या.
भावनिक ट्रिगर : तुम्ही स्वतःला विचारा, ‘मला खरोखर भूक लागली आहे का?’ की फक्त तणाव, कंटाळवाणेपणा या भावनेनं अन्नाचे सेवन करतो आहे, तेव्हा तुम्हाला दोन्ही गोष्टींमधला फरक समजेल.
मनापासून जेवणाचे सेवन करण्यासाठी डॉक्टरांनी पुढील काही टिप्स सांगितल्या आहेत जसे की,
१. अन्न हळूहळू चावून खा आणि आपल्या अन्नाचा स्वाद घ्या.
२. तुमचं पोट भरेल तितक्याच अन्नाचे सेवन करा, जबरदस्ती खाऊ नका.
३. मित्र-मैत्रिणींबरोबर बोलताना किंवा त्यांच्या बरोबर चालत असताना कोणत्याही पदार्थांचे सेवन करू नका.
४. जेवताना फोन किंवा टीव्ही पाहू नका.
तर आज आपण या लेखातून वेळापत्रकानुसार अन्नाचे सेवन करणे व भूक लागल्यावर अन्नाचे सेवन करणे याचे फायदे आणि तोटे पाहिले.