Side Effects Of Contraceptive Pills Taken Daily: बहुतांश महिला गर्भधारणा टाळण्यासाठी ‘गर्भनिरोधक गोळ्यांचा’ वापर करतात. या गर्भनिरोधक गोळ्या अनेक महिलांच्या दैनंदिन दिनचर्येचा एक अविभाज्य घटक बनल्या आहेत, असे म्हणायला हरकत नाही. या गोळ्यांचे काम गर्भधारणा टाळणे हे असले तरीही हार्मोन्स बेस या गर्भनिरोधक गोळ्यांचा दररोज वापर केल्यास, त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

तर याचबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने बंगळुरू येथील बोन अॅण्ड बर्थ क्लिनिकच्या प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ, सल्लागार डॉक्टर गाना श्रीनिवास यांच्याशी संवाद साधला. गर्भधारणा टाळण्यापलीकडे या गोळ्यांचे दररोज सेवन केल्यास त्यांचा शरीरातील हार्मोन्सची पातळी बदलण्यापासून ते विविध अवयव प्रणालींवर परिणाम करण्यापर्यंत या गोळ्यांचा प्रभाव पडू शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे.

डॉक्टर गाना श्रीनिवास सांगतात, ”गर्भनिरोधक गोळ्या (‘द पिल’) यांचे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते. एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे दोन्ही संप्रेरक असलेल्या गर्भनिरोधक गोळ्यांना COC म्हणतात. ही संप्रेरके गर्भधारणा टाळण्यासाठी सिम्फनी तयार करतात.”

१. ओव्ह्युलेशन सप्रेशन (Ovulation Suppression) :

ओव्ह्युलेशन म्हणजे स्त्रियांमधील बीजांडकोश फुटून स्त्रीबीज बाहेर येण्याची क्रिया. या गोळ्या एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ग्रंथीमधून फॉलिकल-स्टिम्युलेटिंग हार्मोन (एफएसएच) आणि ल्युटेनिझिंग हार्मोन (एलएच) सोडण्यास प्रतिबंध करतात. ही संप्रेरके अंडाशयातून अंडी तयार करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. संशोधनानुसार, ९९% पेक्षा जास्त प्रकरणांमध्ये सीओसी (COC) ओव्ह्युलेशन दाबून ठेवतात.

हेही वाचा…Weak Sense Of Smell: ‘वास न येणं’ ठरू शकतं हृदयविकाराचं पहिलं लक्षण? पण असं का घडतं, यावर उपचार काय? जाणून घ्या डॉक्टरांकडून

२. घट्ट झालेला सर्व्हिकल श्लेष्मा : प्रोजेस्टिन गर्भाशयाच्या श्लेष्माची सुसंगतता बदलते. मग हा श्लेष्मा जाड होऊन आणि शुक्राणूंना भेदणे कठीण म्हणजे अभेद्य होते. हा एक अडथळा निर्माण करतो आणि त्यामुळे शुक्राणूंना स्त्रीबीजांपर्यंत पोहोचण्यास प्रतिबंध होतो.

३. गर्भाशयाच्या अस्तरात बदल : प्रोजेस्‍टेरोन गर्भाशयाचे (एंडोमेट्रियम) अस्तरदेखील पातळ करते; त्यामुळे गर्भाशयात एग इम्प्लांट करण्यासाठी कमी अनुकूल ठरते.

दररोज गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचे अल्पकालीन आणि दीर्घकालीन (शॉर्ट टर्म, लाँग टर्म) दुष्परिणाम पुढीलप्रमाणे :

एखाद्या औषधाप्रमाणे गर्भनिरोधक गोळ्या दररोज घेतल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. हा अनुभव काही व्यक्तींमध्ये आढळून येऊ शकतो, असे डॉक्टर श्रीनिवास सांगतात.

शॉर्ट टर्म दुष्परिणाम (Short-Term Side Effects) :

डॉक्टर श्रीनिवास सांगतात की, दररोज या गोळ्या घेतल्यास मळमळ, स्तनाचा नाजूकपणा, रक्तस्राव, डोकेदुखी, मूड बदलणे, कामवासना कमी होणे आदी समस्या जाणवू शकतात. हे सामान्यत: पहिल्या काही महिन्यांत कमी होते. कारण- त्यावेळी शरीर हार्मोन्सशी जुळवून घेत असते.

लाँग टर्म दुष्परिणाम (Long-Term Side Effects) :

डॉक्टर श्रीनिवास म्हणतात की, COCs दररोज घेतल्यास शिरांसंबंधी थ्रोम्बोइम्बोलिझम (VTE)च्या जोखमीशी संबंधित समस्या उदभवू शकतात; जो रक्ताच्या गुठळ्यांचा एक प्रकार आहे. “बीएमजे मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित मेटा-विश्लेषणात असे आढळून आले की, गैर-वापरकर्त्यांच्या तुलनेत सीओसी वापरकर्त्यांमध्ये VTE चा धोका अंदाजे दोन ते चार पट जास्त आहे. तथापि, हा धोका तुलनेने कमी आहे

तसेच, याचे काही फायदेदेखील आहेत. या गोळ्या केवळ गर्भधारणा रोखण्यासाठीच नाही तर मासिक क्रॅम्प्स कमी करण्यात, अंडाशय व एंडोमेट्रियल कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात. ‘द लॅन्सेट’मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात असे आढळून आले आहे की, COC चा वापर गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका ५० टक्के कमी करू शकतो, असे डॉक्टर श्रीनिवास म्हणतात.

हेही वाचा…Dark Circles: तुमच्या डोळ्यांखाली का येतात काळी वर्तुळं? डॉक्टरांकडून जाणून घ्या ‘ही’ पाच कारणं अन् आजच करा तुमच्या सवयीत बदल

कोणी या गोळ्यांचे सेवन करावे कोणी नाही?

१. धूम्रपान : COC वापरणाऱ्या ३५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांना जर धूम्रपान करण्याची समस्या असेल, तर त्यांच्यामध्ये हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीची गुंतागुंत होण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. जागतिक आरोग्य संघटनेकडून धूम्रपान करणाऱ्या महिलांसाठी पर्यायी गर्भनिरोधक पद्धतींचा वापर करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

२. वैद्यकीय अटी: VTE, उच्च रक्तदाब, यकृत रोग किंवा विशिष्ट प्रकारचे कर्करोग असलेल्या महिलांनी COCs वापरू नयेत, असा दिला जात आहे.

३. ड्रग इन्टेरॅक्शन : काही औषधे, जसे की प्रतिजैविक औषधे, COCs शी संवाद साधू शकतात आणि त्यांचा प्रभाव कमी करू शकतात.

दररोज गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने प्रजनन क्षमतेवर कितपत परिणाम होईल?

डॉक्टर श्रीनिवास म्हणतात की, ही गोळी घेतल्याने प्रजनन क्षमतेवर परिणाम होईल की नाही ही एक सामान्य चिंता आहे. पण, निश्चिंत राहा; दररोज गोळ्या घेतल्यास त्यांचा प्रजनन क्षमतेवर दीर्घकालीन परिणाम होत नाही. एकदा तुम्ही ते घेणे थांबवले की, ओव्ह्युलेशन आणि मासिक पाळी काही महिन्यांत सामान्यपणे परत येऊ लागते.