देशात मधुमेहाच्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मधुमेहामध्ये शरीराला पुरेसे इन्सुलिन बनवता येत नाही किंवा जेवढे इन्सुलिन तयार होते, ते शरीर योग्य प्रकारे वापरत नाही. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. इन्सुलिन हा एक संप्रेरक आहे जो अन्नातून साखर शरीराच्या पेशींमध्ये वाहून नेतो. इन्सुलिनच्या अपुऱ्या उत्पादनामुळे रक्तात साखर राहते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो.
खराब जीवनशैली, चुकीचा आहार, शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे आजकाल अनेक लोक टाइप 2 मधुमेहाचे बळी ठरत आहेत. याच वाढत्या मधुमेहाच्या समस्येपासून स्वत:चा बचाव करण्याचे काही उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्याचा अवलंब केल्यास तुम्ही या आजाराचा धोका बर्याच प्रमाणात कमी करू शकता.
हेही वाचा- लठ्ठपणामुळे तुमची त्वचा काळी पडू शकते? जाणून घ्या काय सांंगतात तज्ञ…
साखर –
साखर आणि कर्बोदके भरपूर प्रमाणात असलेले पदार्थ रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवतात. जेव्हा तुम्ही साखर आणि त्यापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करता तेव्हा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. त्यामुळे तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता वाढते. तुम्हाला जर हा आजार टाळायचा असेल, तर आजपासूनच तुमच्या आहारात व्हाइट ब्रेड, बटाटे, कार्बोहायड्रेटयुक्त मैदा असे साखरेचे पदार्थ जास्त प्रमाणात खाणे टाळा.
फायबर –
उच्च फायबर असलेले अन्न तुमच्या आतड्याच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जातात. ते वजनासोबतच मधुमेहाचा धोकाही कमी करतात. फायबरचे दोन प्रकार आहेत. यापैकी एक विरघळणारे आणि एक न विरघळणारे, विरघळणारे फायबर पाणी शोषून घेतात. हे रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासही मदत करतात. US हेल्थ एजन्सी सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या मते, सफरचंद, केळी, ओट्स, मटार, काळे बीन्स, स्प्राउट्स आणि एवोकॅडो यांसारख्या पदार्थांमध्ये विरघळणारे फायबर आढळते.
हेही वाचा- ‘या’ ब्रेडने वजन होईल कमी, अभ्यासात समोर आली माहिती; पांढरा ब्राऊनचा वाद सोडा स्वस्त पर्याय पाहा
व्यायाम –
नियमितपणे व्यायाम करणे शरीराची सतत हालचाल करणे. हे सर्व प्रकारच्या आजारांपासून दूर ठेवण्याचा हा एक उत्तम उपाय आहे. यासाठी तुम्हाला जास्त व्यायाम करण्याची किंवा जिममध्ये जाण्याची गरज नाही. तर केवळ सकाळ-संध्याकाळ चालणे किंवा ट्रेडमिलवर चालूनही तुम्ही स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकता.
पाणी प्या –
कोणतेही पेय पाण्याला पर्याय असू शकत नाही किंवा ते तुम्हाला त्यातून मिळणारे फायदेही देऊ शकत नाही. जेव्हा मधुमेह आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याचा विचार येतो, तेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत पाण्याचे प्रमाण वाढवावे लागेल. कोल्ड्रिंक्स आणि इतर साखरयुक्त पेयांपासून दूर राहा आणि त्याऐवजी पाणी जास्त प्रमाणात प्या. यामुळे तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहील, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यासीही मदत होईल.
पोर्शन कंट्रोल –
हेही वाचा- २०३५ पर्यंत जगभरातील ५० टक्याहून अधिक लोकांना ‘हा’ आजार होणार? तुम्हाला किती धोका कसे राहाल सावध…
मधुमेहासारख्या जुनाट आजाराचा धोका कमी करायचा असेल तर वजन नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. जर तुम्हाला तुमचे वजन नियंत्रित करायचे असेल तर आजपासूनच पोर्शन कंट्रोलची सवय लावून घ्या. पोर्शन कंट्रोल म्हणजे तुम्हाला तुमच्या ताटात मर्यादित प्रमाणातच अन्न घ्यावे लागेल. अनेकवेळा ताट भरलेले असल्यामुळे लोक भुकेपेक्षा जास्त अन्न खातात. त्यामुळेच ताटात कमी जेवण देण्याची सवय लावावी लागेल. असं केल्यानेही तुम्ही तुमची साखर नियंत्रणात ठेवू शकता.