Cough Syrup Precautions: मुंबई, पुणे, ठाणे, यवतमाळ, विदर्भासह राज्यातील पावसाने मागील तीन दिवसात अक्षरशः थैमान घातले आहे, अशातच त्वचा रोग, सर्दी ताप खोकल्याच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. खोकला किंवा कफ झाल्यावर डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा अनेकजण घरगुती उपचार करण्याला प्राधान्य देतात. जर हे उपचार आयुर्वेदिक किंवा नैसर्गिक असतील तर ठीक पण तुम्ही डॉक्टरांचं सल्ल्याशिवाय थेट कफ सिरप सारखी औषधे घेत असाल तर मात्र वेळीच सावध होण्याची गरज आहे.

ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने लोकांना खोकल्यावरील उपचार म्हणून कफ सिरप वापरताना काय काळजी घेणे आवश्यक आहे याविषयी मार्गदर्शन केले आहे. बहुतांश कफ सिरपमध्ये ओपिएट फोल्कोडाइन असते ज्यामुळे रुग्णांना गंभीर ऍलर्जी होऊ शकते. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) युरोपमधील पुराव्यांच्या आधारे कारवाईची शिफारस केल्यानंतर ही बाब समोर आली आहे.

Fight Winter Cold Cough with lemon and clove water
Fight Winter Cold, Cough : घसा खवखवतोय, सर्दीसुद्धा झाली आहे? मग सकाळच्या कॉफीऐवजी ‘या’ पेयाने करा तुमच्या दिवसाची सुरुवात
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Ajit Pawar Jayant Patil x
Jayant Patil : “अरे बाप नाही, तुझा काकाच…”, जयंत पाटलांचं अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर
Loksatta explained Why has the central government recommended the influenza vaccine
केंद्र सरकारने इन्फ्लूएन्झा लशीची शिफारस का केली आहे? भारताला फ्लूचा विळखा?
mumbai weather updates city records moderate air quality
मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच
karnataka goverment bans tobbacco products using offices staff
सरकारी कार्यालयातील तंबाखू, गुटखा खाणाऱ्या कर्मचाऱ्यांची आता खैर नाही; ‘या’ राज्यात कडक आदेश लागू
Special campaign against Pneumonia by Zilla Parishad to prevent child death
बालमृत्यू टाळण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे न्यूमोनियाविरोधात विशेष मोहीम
Air Quality Index, air pollution, Uran city, raigad district
हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास

Pholcodine-युक्त सिरप भारतात सर्वात सामान्यपणे Promethazine च्या संयोगाने उपलब्ध आहेत, ज्याचा वापर ऍलर्जीच्या परिस्थितीवर उपचार करण्यासाठी केला जातो. काही सामान्य ब्रँड्समध्ये Klar द्वारे Zytolix P, Mankind द्वारे Teddykoff आणि Acron द्वारे Tussacron यांचा समावेश होतो.

भारतीय सल्लागार काय म्हणतात?

औषध नियामकाने ही उत्पादने बाजारातून काढून घेतली नसली तरी, ग्राहकांना कफ सिरप घेताना फोल्कोडाइनवर लक्ष ठेवणे किंवा सर्वोत्तम पर्याय म्हणजे वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. मुळातच भारतात औषधविक्री केवळ प्रिस्क्रिप्शनवर आधारित होणे अपेक्षित असताना, काहीवेळा किरकोळ विक्रेत्यांकडूनही ओव्हर-द-काउंटर सुद्धा औषधे विकली जातात.

येत्या काळात जर आपल्यावर गंभीर शस्त्रक्रिया होणार असेल म्हणजेच ज्यामध्ये सामान्य भूल (ऍनेस्थेशिया) देण्याची गरज असेल तर अशावेळी आपण गेल्या १२ महिन्यांत फॉल्कोडाइन औषधे घेतली असल्यास डॉक्टरांना कळवणे आवश्यक आहे.

कफ सिरप का टाळावे?

मार्चमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने व आता डीजीसीआयने सांगितल्यानुसार, संबंधित कफ सिरप घेतल्यानंतर १२ महिन्यांपर्यंत अॅनाफिलेक्टिक प्रतिक्रिया होण्याचा धोका असतो. विशेषतः जेव्हा रुग्णांना न्यूरोमस्क्युलर ब्लॉकिंग एजंट म्हणजेच शस्त्रक्रियेदरम्यान एखादी बाजू सुन्न करण्यासाठीची भूल दिली जाते तेव्हा हा धोका बळावण्याची शक्यता असते.

अॅनाफिलेक्टिक प्रतिक्रिया ही जीवघेण्या एलर्जीची स्थिती आहे. विशिष्ट प्रकारच्या जनरल ऍनेस्थेसिया अंतर्गत शस्त्रक्रिया करणार्‍या रूग्णांमध्ये, रक्तदाब कमी होणे, रक्त परिसंचरण कमी होणे, हृदयाची असामान्य गती, श्वसननलिका बंद होणे आणि ऑक्सिजनची पातळी कमी होणे यासारखी लक्षणे दिसून येतात.

फ्रेंच अभ्यासकांच्या निरीक्षणात असे दिसून आले आहे की ज्या लोकांनी मागील १२ महिन्यांत फोल्कोडाइन औषधांचे सेवन केले होते त्यांना या अॅनाफिलेक्टिक प्रतिक्रियांचा धोका चार पटीने जास्त होता.

हे ही वाचा<< भाताचा ‘हा’ प्रकार आयुर्वेदानुसार आहे सुपरफूड! सेवनाची ‘ही’ पद्धत कोकण, केरळात आहे प्रसिद्ध

कफ सिरपला पर्याय काय?

फोलकोडाइन हे ओपिओइड खोकला शमन करणारे औषध आहे जे मुले आणि प्रौढ दोघांमध्ये कोरड्या खोकल्याचा त्रास कमी करण्यासाठी वापरले जाते. याऐवजी आपण इतर खोकला प्रतिबंधक जसे की डेक्स्ट्रोमेथोरफान असलेले सिरप सुद्धा निवडू शकता. किंवा अधिकाधिक हर्बल उपचारांकडे सुद्धा वळू शकता.