Couvade Syndrome: कुटुंबात नव्या पाहुण्याचे आगमन होणार म्हटल्यावर होणारे आई-बाबा बाळाची आतुरतेने वाट पाहतात. बाळ जन्माला येणार कळल्यापासून ते संपूर्ण नऊ महिने गर्भवती महिलेची खूप काळजी घेतली जाते. गर्भधारणेदरम्यान अनेक भावना एकत्र निर्माण होतात. कधी उत्सुकता, उत्साह, अपेक्षा, थोडी भीती आणि सकाळी थोडं आजारी असल्यासारखे वाटू शकते. पण, जर गर्भवती महिलेसह बाळाच्या वडिलांना मळमळ आणि डोहाळे सुरू झाले तर? हे कोणतेही काल्पनिक दृश्य नाही; ही एक वास्तविक घटना आहे, जी कोवेड (Couvade) सिंड्रोम म्हणून ओळखली जाते.
कोवेड (Couvade) सिंड्रोम म्हणजे काय?
चंदिगड येथील क्लाउडनाइन ग्रुप ऑफ हॉस्पिटल्समधील स्त्रीरोग विभागाच्या सहयोगी संचालक डॉ. ऋतंभरा भल्ला यांनी कोवेड सिंड्रोम, ज्याला सहानुभूतीपूर्ण गर्भधारणा किंवा पुरुष गर्भधारणा अनुभव असेही म्हणतात, याचे स्पष्टीकरण दिले. त्या म्हणाल्या, जेव्हा एखाद्या पुरुषाला गर्भधारणेशी संबंधित लक्षणे जाणवतात, ज्यात सौम्य त्रासदायक ते अगदी अस्वस्थता असते. या लक्षणांमध्ये मळमळ, वजन वाढणे, मूड स्विंग आणि अगदी प्रसूती वेदनांचा समावेश असू शकतो. अधिकृतपणे वैद्यकीय स्थिती म्हणून मान्यता नसली तरी कोवेड सिंड्रोम संस्कृतींच्या पलीकडे जातो आणि जगभरातील गर्भवती वडिलांमध्ये त्याचे दस्तऐवजीकरण केले गेले आहे, असे डॉ. भल्ला म्हणाल्या.
लक्षणांची सुरुवात आणि कारणे

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

कोवेड सिंड्रोमची लक्षणे

जोडीदार महिलेच्या गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत सुरू होतात, बहुतेकदा देय तारीख जवळ येताच ती तीव्र होतात, असे डॉ. भल्ला यांनी स्पष्ट केले. ते शारीरिक आणि मानसिक अनुभवांचे संयोजन असू शकते.

सकाळी मळमळ जाणवणे

गर्भवती जोडीदारांप्रमाणेच, कोवेड सिंड्रोम असलेल्या पुरुषांना सकाळी मळमळ जाणवू शकते.

वजन वाढणे

जोडीदाराच्या वाढत्या पोटासह अस्पष्ट वजन वाढणे ही कोवेड सिंड्रोममध्ये वारंवार घडणारी घटना आहे.

शारीरिक अस्वस्थता

पोटदुखी आणि फुगणे हे गर्भवती महिलेच्या शारीरिक बदलांचा परिणाम असू शकते.

भावनिक रोलरकोस्टर

वाढलेला चिडचिडेपणा, ताण आणि मूड स्विंग्स ही कोवेड सिंड्रोमची सामान्य वैशिष्ट्ये आहेत, जी गर्भवती महिलांमध्ये अनेकदा दिसणाऱ्या भावनिक चढउतारांचे प्रतिबिंब आहेत.

डोहाळे लागणे

वडिलांनाही कैरी, लोणचं असे विविध पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होऊ शकते किंवा अचानक त्यांना आवडता पदार्थही किळसवाणा वाटू शकतो, जो गर्भवती महिलांच्या अन्नाच्या सवयींप्रमाणे असतो.

झोपेचा त्रास

निद्रानाश किंवा जास्त झोप येणे हे गर्भवती वडिलांच्या झोपेच्या पद्धतींमध्ये व्यत्यय आणू शकते.

डॉ. भल्ला यांच्या मते, कोवेडे सिंड्रोमचे नेमके कारण अजूनही थोडे गूढ आहे, परंतु अनेक सिद्धांत ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतात:

मानसिक घटक

गर्भवती जोडीदाराबद्दल वाढलेली सहानुभूती, येणाऱ्या पितृत्वाबद्दलची चिंता आणि ओळखीतील बदलांमुळे अवचेतन ताण; या सर्वांमुळे कोवेड सिंड्रोम असलेल्या पुरुषांमध्ये मानसिक लक्षणे उद्भवू शकतात.

जैविक घटक

काही अभ्यास असे सूचित करतात की, गर्भवती वडिलांमध्ये हार्मोनल चढउतार भूमिका बजावू शकतात. या बदलांमध्ये प्रोलॅक्टिनची वाढलेली पातळी, महिलांमध्ये दूध उत्पादनाशी संबंधित हार्मोन आणि टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होणे यांचा समावेश असू शकतो.

सांस्कृतिक घटक

काही संस्कृतींमध्ये, गर्भधारणेमध्ये पुरुषांच्या सहभागाभोवती काही विधी आणि अपेक्षा असतात. हे सांस्कृतिक प्रभाव कोवेडसारखी लक्षणे विकसित होण्यास हातभार लावू शकतात.

कोवेड सिंड्रोमसह जगणे

कोवेड सिंड्रोमला वैद्यकीय हस्तक्षेपाची आवश्यकता नसली तरी लक्षणे त्रासदायक असू शकतात. डॉ. भल्ला कोवेड सिंड्रोमचे व्यवस्थापन करण्यासाठी समग्र दृष्टिकोनाची शिफारस करतात. आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप याद्वारे शारीरिक आरोग्य सुधारता येते. भावनिक आव्हानांचे व्यवस्थापन करण्यासाठी थेरपी, सपोर्ट ग्रुप्स आणि मोकळे संवाद यांसह मानसिक आधार महत्त्वाचा आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Couvade syndrome is signs of pregnancy in men real or not sap