COVID 19 New Variant JN1 Symptoms: मागील काही दिवसांमध्ये करोना विषाणूचा नवीन उपपक्रार असलेल्या ‘जेएन.१’चे रुग्ण देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी आढळले आहेत. केरळ, महाराष्ट्र, गोव्यासह अनेक राज्यांमध्ये जेएन.१ बाधित रुग्णांवर उपचार चालू आहेत. भारतात शुक्रवारी दुपारपर्यंत ६४० नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. सर्वाधिक रुग्णसंख्या ही केरळ राज्यात आढळून आलेली आहे. यामुळे साहजिकच अनेकांच्या मनात करोनाच्या या नव्या संकटाविषयी भीती निर्माण झाली आहे. आरोग्य विभागातर्फे समोर आलेल्या माहितीनुसार, घसा खवखवणे, वाहणारे नाक, अंगदुखी आणि ताप हे बहुतेक COVID-19 च्या नव्या प्रकारचे लक्षण असू शकते मात्र काही रेस्पिरेटरी संसर्ग सुद्धा याचे न दिसणारे लक्षण असू शकते. मात्र कोणत्याही स्थितीचे निदान करण्यासाठी चाचणी हा एकमेव मार्ग आहे.

डॉ रोमेल टिकू, डायरेक्टर, इंटर्नल मेडिसिन, मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, साकेत, नवी दिल्ली यांनी याबाबत इंडियन एक्सस्प्रेसशी संवाद साधताना COVID- १९, जेएन.१ संदर्भात काही गैरसमजुतींवर स्पष्ट माहिती दिली आहे. डॉ. टिकू म्हणतात, दिल्ली एनसीआरमध्ये वायू प्रदूषण आणि थंड तापमानामुळे फ्लू, खोकला, घसा खवखवणे आणि इतर विषाणूजन्य आजारांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे ही लक्षणे कोविड-19 संसर्गाचीच असतील असे म्हणता येणार नाही.

account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
mercury in nashik drops 9 4 degrees celsius
नाशिकमध्ये थंडीचे पुनरागमन; पारा ९.४ अंशावर
Cold weather Thane district, Thane district temperature,
ठाणे जिल्हा पुन्हा गारठला, जिल्ह्यातील तापमान सरासरी १२ अंश सेल्सिअस
Impact of climate change on health Increase in patients coming to hospital for treatment
वातावरण बदलाचा आरोग्यावर परिणाम; अंगदुखी,सर्दी -खोकला, ताप, घसा दुखीमुळे नागरिक त्रस्त
Rumors , Nashik, health university,
नाशिक : आफवांवर विश्वास ठेवू नये, आरोग्य विद्यापीठाचे आवाहन
Doctor appointed as head of J J Hospitals nursing college
जे.जे. रुग्णालयाच्या परिचर्या महाविद्यालयाच्या प्रमुखपदी डॉक्टरची नियुक्ती
30 bed updated ward at Thane District Hospital for treatment of Zika patients Mumbai print news
झिका रुग्णांच्या उपचरासाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात ३० बेडचा अद्यावत कक्ष !

कोणताही संसर्गजन्य आजार हा इम्युनोकॉम्प्रोमाइज्ड म्हणजेच अधिक जोखीम असलेल्या गटात (ज्यांना अगोदरच अनुवांशिक आजार आहेत किंवा वय, वजन, अन्य आजार अधिक आहेत) गांभीर्यानेच घ्यायला हवा. अशा व्यक्तींसाठी आरटीपीसीआर चाचणी अत्यंत महत्त्वाची आहे. करोनाचा नवीन प्रकार JN.1 बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी चाचणी करायला हवी, यासाठी विमानतळावर चाचणी आणि थर्मल स्क्रीनिंग सुरू करायला पाहिजे. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की कोरोनाव्हायरसमुळे अनेक लक्षणे उद्भवू शकतात, त्यापैकी काही अजूनही पटकन लक्षात येण्यासारखी नाहीत.

कोविड, इन्फ्लूएंझा, व्हायरल संसर्गांमध्ये फरक करणे कठीण का आहे?

चाचणी केल्याशिवाय तुम्ही लक्षणांमध्ये फरक सांगू शकत नाही. गेल्या तीन महिन्यांपासून फ्लूची प्रकरणे येत आहेत परंतु चाचणी न करता, त्यांना कोविड विषाणूचा संसर्ग झाला आहे की नाही हे सांगता येत नाही. तुम्ही निदान होण्यासाठी नमुने तपासले नाहीत आणि पाठवले नाहीत, तर तुम्हाला व्हायरसचे स्वरूप कळणे जवळपास अशक्य आहे.

बीएमजेच्या एका अभ्यासात असे म्हटले आहे की “यापूर्वी झालेले लसीकरण, पूर्वीच्या संसर्गापासून तयार झालेली प्रतिकारशक्ती आणि ओमिक्रॉनच्या विकासाच्या तुलनेत एकूण नव्या उपप्रकारचा संसर्ग कमी तीव्रतेने होतो. नव्या उपप्रकारात मुख्यतः श्वसन प्रणालीत अडथळे, ताप, स्नायू दुखणे, थकवा, शिंका येणे, घसा खवखवणे आणि खोकला यापुरते मर्यादित आहेत. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल (CDC) यांच्या माहितीनुसार, जर एखाद्या व्यक्तीला COVID-19 असेल, तर त्यांना फ्लूच्या लक्षणांपेक्षा संसर्गाच्या वेळेपासून लक्षणे दिसायला जास्त वेळ लागू शकतो.

प्रदूषणामुळे होणारा फ्लूचा संसर्ग तुम्ही कसा ओळखाल ?

खोकला, सर्दी आणि घसा खवखवणे याचा त्रास होत असताना, जर का तुम्हाला प्रदूषण-संबंधित आजार असेल तर रुग्णांना सहसा चक्कर येते किंवा श्वास घेण्यास त्रास होतो. ज्यांनी कधीही इनहेलर वापरला नाही त्यांनाही ते वापरावे लागू शकते.

नवीन व्हेरिएंटबद्दल काळजी करण्याची गरज आहे का?

फ्लूच्या विषाणूशी संबंधित प्रकरणांमध्ये तुरळक वाढ ऋतूबदलानुसार होतच असते, विशेषत: हिवाळ्यात. त्यामुळे आपण असे म्हणू शकत नाही की पूर्वी ज्याप्रमाणे करोनाने हाहाकार केला होता तसेच आताही पुन्हा घडेल, याची शक्यता फारच कमी आहे पण आपण सतर्क राहावे. जरी JN.1 अधिक संक्रमणीय वाटत असले तरी, लस आणि प्रतिकारशक्तीचा प्रभाव आपल्याला रुग्णालयात दाखल व्हावे लागण्यापासून आणि न्यूमोनियासारख्या इतर गुंतागुंतांपासून वाचवू शकते.

सर्दीची सामान्य लक्षणे असलेल्या प्रत्येकाने चाचणी घ्यावी का?

जर लक्षणे सौम्य असतील आणि तुम्ही निरोगी असाल तर तुम्ही चाचणी टाळू शकता परंतु जर परिस्थिती गंभीर असेल ताबडतोब चाचणी करा, विशेषत: तुम्हाला अन्य आजार असल्यास किंवा ६० पेक्षा जास्त वय असल्यास, गर्भवती असल्यास चाचणी तुम्हाला सुरक्षित राहण्यास मदत करू शकते.

कोविडची विशिष्ट लक्षणे कोणती आहेत?

अतिसार आणि इतर (गॅस्ट्रो) आतड्यांसंबंधी समस्या ही वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे आहेत. शरीरदुखी, घसा खवखवणे, सर्दी, स्नायू दुखणे आणि डोकेदुखी यांचाही यात समावेश होतो.

लक्षणे दिसू लागल्यावर कोणते औषध घ्यावे?

पॅरासिटामॉल हे सर्वात सुरक्षित आहे परंतु ते विचारपूर्वक वापरले पाहिजे कारण यामुळे गॅस्ट्र्रिटिस होऊ शकते आणि मूत्रपिंडाच्या समस्या वाढू शकतात. वृद्ध आणि मधुमेहींसाठीही आपण त्याचा जपून वापर केला पाहिजे.

कोणत्या टप्प्यावर डॉक्टरांना भेटावे?

लक्षणे दोन दिवसांनंतरही कायम राहिल्यास, डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर तुम्हाला तिसऱ्या दिवशी १०० डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त ताप आला असेल आणि सतत खोकला आणि शरीरात तीव्र वेदना होत असतील तर तुम्हाला डॉक्टरकडे जावे लागेल.

हे ही वाचा<< ४० व्या वर्षाआधी ब्रेन स्ट्रोकचा धोका असतो का? लक्षणे सर्वात आधी दिसतात का, पद्मश्री विजेत्या तज्ज्ञांचे उत्तर वाचा

कोविडमध्ये अतिसार किती वाईट असू शकतो?

तुम्हाला दिवसातून तीन वेळा वॉशरूम वापरावे लागेल आणि अधूनमधून उलट्या होत असतील भूक लागत नसेल तर हे लक्षण विचारात घ्यायला हवे.

Story img Loader