करोनाची चौथी लाट भारतात येण्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे चीन आणि जपानमध्ये वाढणाऱ्या करोना केसेस. करोनाचे अनेक रूग्ण या दोन्ही देशांमध्ये आढळत आहेत. त्यामुळे भारत सरकार अलर्ट मोडवर गेलं आहे. कोव्हिड प्रोटोकॉल पाळा असं आवाहन पुन्हा एकदा करण्यात येतं आहे. अशात महत्त्वाची बाब ही आहे की आपल्याला आपली प्रतिकारशक्ती वाढवून करोनापासून बचाव कसा करता येईल?

प्रतिकारशक्ती कशी वाढवता येईल?

आपण आहारात काही पदार्थांचा समावेश केला तर आपली प्रतिकारशक्ती वाढू शकते आणि करोनापासून आपला बचाव होऊ शकतो. राम मनोहर लोहिया आयुर्विज्ञान संस्थेचे मेडिकल ऑफिसर संजय कुमार पांडे सांगतात की नैसर्गिकरित्या प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आत्ताचा मोसम सर्वात चांगला आहे. आयुर्वेदात या ऋतूला शिशिर म्हटलं गेलं आहे. या ऋतूमध्ये आपण जे खातो ते सहजरित्या पचतं. अशात आपल्याला जर प्रतिकार शक्ती वाढवायची असेल तर आपल्याला भाज्या जास्तीत जास्त प्रमाणात खाल्ल्या पाहिजेत.

Use wet socks to reduce fever in children
लहान मुलांचा ताप कमी करण्यासाठी ओले सॉक्स वापरावे? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला..
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
article about weakness problem in wome causes of weakness in women
स्त्री आरोग्य : बायांनो, तुम्हाला विकनेस जाणवतो?
Priyanka Chopra immunity boosting drink jugaad
Immunity boosting drink : गरम पाण्यात फक्त ‘या’ तीन गोष्टी करा मिक्स; रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रियांका चोप्राचा जुगाड; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
Healthy Foods for Your Liver
लिव्हर खराब होण्याचा धोका वाटतोय? लिव्हरमधील फॅट्स झपाट्याने काढून टाकतात ‘हे’ आठ पदार्थ? सेवनाची पद्धत घ्या समजून…
increasing weight, health special, health,
health special : वाढत्या वजनाने मानसिकतेवर कसा परिणाम होतो?
These simple tips will help you keep your bike
पावसाळ्याच्या दिवसात बाईक स्वच्छ ठेवण्यासाठी ‘या’ सोप्या टिप्स करतील मदत
Health centers should be capable of diagnosing cancer
‘कर्करोग निदानासाठी आरोग्य केंद्रे सक्षम हवीत’

कोणते पदार्थ आपली प्रतिकारशक्ती वाढवतील?

करोनापासून बचाव करायचा असेल तर अशा फळांचं सेवन करा ज्यामध्ये सी जीवनसत्त्वाचा समावेश असेल. आता अशी फळं कुठली? तर अर्थातच संत्रं, आवळा, लिंबू ही होय. या फळांमुळे आपली प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. आपल्या शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ही फळं उपयुक्त मानली गेली आहेत.

हेही वाचा – Coronavirus: देशभरामध्ये परत मास्कसक्ती? केंद्र सरकार म्हणालं, “मास्क बंधनकारक करण्यासंदर्भात सध्या…”

Orange
(Photo-pixabay)

हिरव्या पालेभाज्यांचा आहारात आवर्जून करा समावेश

डॉक्टर पांडे यांनी सांगितल्यानुसार आपण या कालावधीत हिरव्या पालेभाज्या खाण्याचं प्रमाणही वाढवलं पाहिजे. करोनापासून वाचायचं असेल तर हिरव्या पालेभाज्या रोज खा. या भाज्यांमध्ये व्हिटॅमिनसोबतच प्रोटीनही असतं. पालक, मेथी, चवळई, माठ, शेपू या भाज्या शरीराला पोषक घटक पुरवतात.

आयुर्वेदिक काढा तयार करा आणि स्वतःला ठेवा फिट अँड फाईन

संजय कुमार पांडे सांगतात की फळं आणि हिरव्या पालेभाज्या याशिवाय काढाही उपयुक्त ठरतो. तुळस, दालचिनी, वेलची, ज्येष्ठमध, हळद, आलं आणि गूळ यांच्यापासून तयार केलेल्या काढ्यामुळेही आपली प्रतिकारशक्ती वाढते. या प्रकारचा काढा प्यायल्याने फुफ्फुसांची क्षमता वाढते. तसंच ज्येष्ठमध खाल्ल्याने घशाला जाणवणाऱ्या खोकला, खवखव या तक्रारी दूर होतात. तुळसही अँटी ऑक्साईड म्हणून काम करते. गुळवेलही आरोग्यदायी असते. गुळवेलीच्या काढ्यामुळे खोकला, सर्दी, ताप हे आजार बरे होतात. तसंच ते झाले नसतील तर त्याचा संसर्ग टाळता येतो. आज तकला दिलेल्या मुलाखतीत डॉ. पांडे यांनी ही सगळी माहिती दिली आहे.

आणखी वाचा – करोनाच्या नव्या व्हेरीयंटपासून वाचण्यासाठी मदत करतील ही १० उपकरणं; जाणून घ्या किंमत आणि उपयोग

काढा नेमका कसा तयार कराल?

काढा तयार करण्यासाठी दालचिनी, ज्येष्ठमध, गुळवेल, तुळस या सगळ्याची कुटून पावडर तयार करा. आयुर्वैदिक मेडिकलमध्ये तुम्हाला हे सगळे घटक अगदी सहज मिळतील. त्यानंतर दोन कप पाणी घ्या. त्यात एक मोठा चमचा ही कुटलेली पावडर टाका. पाणी व्यवस्थित गरम होऊ द्या. त्यात चवीसाठी थोडा गूळही घाला. या काढ्याला एक उकळी आली की तो गाळून घ्या. काढा उकळत बसू नका. या काढ्यामुळे आपल्याला प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होते असंही डॉ. पांडे यांनी सांगितलं. याशिवाय आपण लवंग आणि कापूर हे दिवसभरातून साधारण एक-दोन तासांच्या अंतराने हुंगले पाहिजेत त्याचाही आपल्याला फायदा होतो असंही त्यांनी सांगितलं.