तणावामुळे निर्माण होणारी लालसा आपल्याला प्रक्रिया केलेले अन्न खाण्यास प्रवृत्त करते. ही लालसा कमी करण्यामध्ये कोकोच्या सेवनाचा कसा प्रभाव पडतो यावर एका संशोधनात अभ्यास करण्यात आला आहे. फूड अँड फंक्शन जर्नलमध्ये या वर्षी हा अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे.
नोव्हेंबरमध्ये प्रकाशित झालेल्या हस्तक्षेप अभ्यासात असे आढळून आले आहे की, “तणावाच्या नकारात्मक प्रभावांखाली असलेल्या तरुण निरोगी प्रौढांमध्ये, फॅट्सयुक्त स्नॅक्ससारख्या अस्वास्थ्यकारक पदार्थांविरोधात फ्लेव्होनॉइड-समृद्ध पदार्थांमध्ये एंडोथेलियल फंक्शनचे (रक्तवाहिन्यांच्या आतील अस्तरांचे आरोग्य आणि कार्याचे) तीव्रपणे संरक्षण करण्याची क्षमता असते. फॅट्सयुक्त जेवणासह कोकोचे सेवन केल्याने फॅट्सयुक्त अन्नाचा प्रभाव काही प्रमाणात मर्यादित होतो आणि रक्तवहिन्यांसंबंधी प्रणालीला तणावापासून संरक्षण मिळते.
पण, दोन्हीमध्ये नक्की संबंध काय? Indianexpress.com ने तज्ज्ञांना विशेषत: रात्रीच्या वेळी, आहारात कोकोचे सेवन करण्याचे आरोग्य फायदे स्पष्ट करण्यास सांगितले.
“कोकोमध्ये फ्लॅव्हनॉल समृद्ध आहे, जे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आणि मॅग्नेशियम आहे आणि अशा प्रकारे शास्त्रज्ञांनी रक्तवाहिन्यांच्या आतील अस्तरांचे आरोग्यदायी फॅट्सच्या सेवनापासून संरक्षण करण्याच्या भूमिकेचा अभ्यास केला आहे, जे तणावग्रस्त असताना फॅट्सयुक्त पदार्थ खातात”, असे एडविना राज यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. एडविना राज हे बंगळुरू येथील ॲस्टर सीएमआय हॉस्पिटलमध्ये, क्लिनिकल न्युट्रिशिअन आणि डायटेकिक्सचे (Clinical Nutrition and Dietetics) सेवाप्रमुख आहेत.
दिल्लीतील डाएट ॲण्ड न्यूट्रिशन क्लिनिकमधील आहारतज्ज्ञ नम्रता आर्य यांनी सांगितले की, कोकोच्या झाडाच्या बियांपासून तयार होणाऱ्या कोकोमध्ये अनेक संयुगे असतात, जी तणावामुळे निर्माण होणाऱ्या लालसेचा सामना करण्यास मदत करतात. “त्यात अन्डामाइड (anandamide) आहे, जे एक रसायन आहे जे आनंदाची भावना निर्माण करते. तसेच त्यातील थिओब्रोमाइन एक सौम्य उत्तेजक म्हणून कार्य करते आणि मॅग्नेशियम तणाव कमी करण्यात भूमिका बजावते.”
कोको दाहकता, उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकतो आणि मेंदूचे कार्य सुधारण्यासदेखील मदत करतो. आर्या सांगतात की, “कोकोचा आहारात समावेश केला जाऊ शकतो आणि स्मूदी आणि हॉट चॉकलेटच्या रूपात वापर केला जाऊ शकतो. ते बेक केलेल्या पदार्थांबरोबरही सेवन केले जाऊ शकते, पण दररोज मोजून ४-६ चमचे हे प्रमाण पुरेसे आहे.
आर्या सांगतात, अनेक अभ्यासांनी असे निदर्शनास आणले आहे की, “रात्री कोकोचे सेवन केल्याने झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.”
हेही वाचा- अंतराळवीरांना अवकाशात ‘मोशन सिकनेस’चा अनुभव येतो का? तज्ज्ञांनी केला खुलासा…
सावधगिरी म्हणून गर्भधारणेदरम्यान, विशेषत: तिसऱ्या तिमाहीत कोको, कोकाओ आणि चॉकलेट्स घेण्याबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला आर्या यांनी दिला आहे. कारण त्यामुळे मोठ्या रक्तवाहिन्यांचे आकुंचन होऊ शकते, ज्यामुळे बाळाच्या रक्ताभिसरणावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. श्वान आणि मांजर यांसारख्या पाळीव प्राण्यांपासूनही कोको दूर ठेवले पाहिजे, कारण ते त्यांच्या आरोग्यासाठी चांगले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.