Tan Removal Remedy Tip : सोशल मीडियावर त्वचेशी संबंधित डीआयवाय (DIY) हॅक आणि उपाय सांगितले जात असतात. त्यात त्वचेवर लावण्यासाठी आता कोणताही पदार्थ शिल्लक राहिलेला नाही. पण, सध्या एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे आणि तो म्हणजे चेहऱ्यावरील टॅन काढण्यासाठी ‘दही व कॉफीचे मिश्रण’ (Tan Removal Remedy). आता, तुम्ही ‘हे काय’ म्हणण्यापूर्वी, नक्की हा ट्रेंड काय आहे त्याबद्दल जाणून घेऊया…
कंटेंट क्रिएटर ध्रुव सेठीने याबाबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने दोन आठवडे ‘दही आणि कॉफीचे मिश्रण’ चेहऱ्यावर लावले (Tan Removal Remedy)आणि दररोज रात्री क्लीन्झरने चेहरा धुतल्यावर चार ते पाच मिनिटे मालिश केले. “मला फक्त दोन ते तीन दिवसांत याचा परिणाम जाणवला आणि माझ्या त्वचेचा रंग फक्त हलकाच नाही, तर माझी त्वचादेखील नेहमीपेक्षा अधिक मऊ व फुगलेलीसुद्धा वाटते आहे. दही तुमच्या त्वचेचा टोन हलका करते आणि कॉफी त्यात आणखीन भर घालते. किमान दोन ते तीन दिवस तरी हे करून पाहा” असे व्हिडीओत सांगण्यात आले आहे.
तर या ट्रेंडबद्दल जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने नवी दिल्लीतील सौंदर्यशास्त्रज्ञ, त्वचा तज्ज्ञ, अभिवृत एस्थेटिक्सचे (Aesthetics New) डॉक्टर जतीन मित्तल यांच्याशी चर्चा केली आहे. तेव्हा ते म्हणाले की, कॉफी आणि दही हे घटक बहुतेकदा घरगुती उपायाद्वारे त्वचेची काळजी घेण्यासाठी वापरले जातात आणि ते काही प्रमाणात त्वचा उजळण्यास मदत करू शकतात.
व्हिडीओ नक्की बघा…
कॉफी- कॉफीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि कॅफिन असतात, जे रक्ताभिसरण सुधारण्यास आणि चेहऱ्यावरील सूज कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे तुमची त्वचा उजळ आणि अधिक ताजेतवानी झाल्यासारखी दिसते. त्यात एक्सफोलिएटिंग गुणधर्मदेखील आहेत, जे मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करतात. त्यामुळे चेहरा अधिक तेजस्वी दिसतो.
दही- दही लॅक्टिक ॲसिडने समृद्ध आहे; जे त्वचेला हळुवारपणे एक्सफोलिएट करण्यास मदत करते, त्वचेच्या मृत पेशी काढून टाकते आणि चेहरा अधिक उजळ करते. तसेच दह्यामध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्मदेखील आहेत; ज्यामुळे त्वचा मऊ आणि हायड्रेटेड वाटू शकते.
पण, दही आणि कॉफीचे मिश्रण फिकट त्वचेच्या टोनसह, त्वचेचा टोन हलका करू शकते (म्हणजे टॅन काढू शकते) हा दावा दिशाभूल करणारा आहे. कारण- त्वचेतील अशुद्धता काढून टाकल्याने त्वचा उजळ होण्यास मदत होते.
डॉक्टर जतीन यांच्या म्हणण्यानुसार, दही आणि कॉफी यांच्या मिश्रणातून कोणतीही व्यक्ती मास्क बनवू शकते (Tan Removal Remedy). आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हा मास्क तुम्ही वापरू शकता. हा मास्क तुमच्या त्वचेचा पोत आणि कांती यांनुसार तुमच्या चेहऱ्यावर चमक आणण्यास मदत करू शकतो. पण, तुमच्या त्वचेचा प्रकार आणि तुमच्या वैयक्तिक प्रतिसादावर ते अवलंबून असते.