Curly Hair Care Tips : बदलत्या ऋतुनुसार केसांची काळजी घेणे गरजेचे असते. विशेषत: कुरळे केस असणाऱ्या लोकांना जास्त काळजी घ्यावी लागते. कारण या केसांवर वातावरण बदलाचा अधिक परिणाम होतो. यावर आपल्या कुरळ्या केसांमुळे ओळखली जाणारी अभिनेत्री सान्या मल्होत्रा हिने काही खास टिप्स दिल्या आहेत. सान्यासाठी कुरळे केस तिच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्त्वाचा भाग वाटतात. परंतु, कुरळे केसांची काळजी घेणं तिच्यासाठीही फार सोपं काम नाही. यावर सान्याने नुकतंच एका मुलाखतीत ती तिच्या सुंदर कुरळ्या केसांची काळजी कशी घेते याचे डेली रुटीन सांगितले आहे.

सान्याने सांगितले की, केस धुतल्यानंतर ती नेहमी कंडीशनिंग करते. यानंतर ओल्या केसांवर ती हळूवारपणे ब्रश किंवा फणी फिरवते. केस धुतल्यापासून ते पुन्हा धुवेपर्यंत मी रोज विविध प्रकारे त्यांची काळजी घेत असते. मी सर्वप्रथम केसांना कर्ल क्रीम लावले. नंतर केस दोन भागांत स्क्रंच करते. ते हेअर जेलने सीलदेखील करते. मी खास करून जेव्हा मुंबईत असते तेव्हा स्ट्राँग होल्ड जेलचा वापर करते, कारण मुंबईतील हवामान दमट असते, त्यामुळे कुरळे केस लवकर खराब होतात. पुढे मी केसांना डिफ्यूज करते, यानंतर केसांना तेल लावून थोडं मोकळं करते जेणेकरून त्यांचा व्हॉल्यूम वाढेल.

दरम्यान, कुरळ्या केसांची काळजी घेताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? याविषयी Indianexpress.com ने तज्ज्ञांकडून माहिती घेतली.

नोएडातील गीतांजली सलूनच्या क्रिएटिव्ह स्टायलिस्ट तेहिंग यांग यांनी सांगितले की, कुरळे केसांची काळजी घेताना एक गोष्ट टाळली पाहिजे, ती म्हणजे केस धुताना त्यांच्या मुळांवर शॅम्पूने न घासणे. त्याऐवजी केसांच्या मुळांना हलक्या हाताने शॅम्पू लावून मसाज करा. केसांच्या टोकापर्यंत अशाप्रकारे मसाज करत जा.

केस धुतल्यानंतर ते पुसताना टॉवेल घासू किंवा रगडू नका. कुरळे केस नेहमी मायक्रोफायबर टॉवेलने गुंडाळा, ज्यामुळे केसांचे घर्षण कमी होते आणि केस जास्त भुरेभुरे किंवा राठ होत नाहीत.

कुरळे केस एकमद ओले असताना त्यावर सीरम किंवा कोणतीही क्रीम वापरू नका. केस ४० टक्के कोरडे झाल्यानंतरच त्यावर सीरम आणि हायड्रेशन क्रीम लावा आणि त्यानंतर कर्ल क्रीम लावा.

तुमच्या केसांची रचना किंवा पोत पाहूनच तुम्ही जेल, क्रीम किंवा तेलाची निवड करा, त्यामुळे कोणतेही हेअर केअर प्रोडक्ट वापरताना समजत नसल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

स्टायलिस्ट तेहिंग यांग पुढे सांगतात की, केस धुतल्यानंतर त्यातील ओलेपणा दूर करण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करा, मात्र ड्रायरने केसांना जास्त हिट देऊ नका, यामुळे केस खराब होण्याचा धोका वाढतो. झोपताना केसांखाली रेशम कापडाची उशी, चादर किंवा स्कार्फ वापरा, यामुळे कुरळे केस तुटण्याचा किंवा खराब होण्याचा धोका नसतो.

Story img Loader