वाढत्या प्रदूषणामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. प्रदूषणाचा सर्वात जास्त परिणाम आपल्या फुफ्फुसांच्या आरोग्यावर होतो. फुफ्फुसांचे आरोग्य जपणे हे आपल्या एकूण आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. यासाठी सीताफळाचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते. कारण सीताफळामध्ये श्वसनसंस्थेचे आरोग्य जपणारे काही आश्चर्यकारक फायदे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सीताफळाला शरीफा (sharif) किंवा कस्टर्ड अॅपल (custard apple) म्हणून ओळखले जाते. त्याची गोड चव आणि अनेक आरोग्य फायद्यांसाठी हे फळ ओळखले जाते. फुफ्फुसांचे आरोग्य जपण्यासाठी आणि श्वसन संस्थेमधून प्रदूषकांना बाहेर काढण्यासाठी सीताफळामध्ये पोषक तत्वांची एक वेगळी रचना (Unique composition) आहे. सीताफळ फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहे, याबाबत अपोलो हॉस्पिटलच्या मुख्य आहारतज्ज्ञ डॉ. प्रिया रोहतगी यांनी इंडियन एक्स्प्रेसला सविस्तर माहिती दिली आहे. चला तर मग जाणून घेऊ या…

फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरणारी सीताफळातील पोषक तत्वांची रचना

सीताफळ हे व्हिटॅमिन बी ६ ने समृद्ध आहे, ज्याला पॅरॉक्सडाइन असेही म्हणतात. हे असे पोषक तत्व आहे, ज्यामध्ये दाहक विरोधी (Anti-Inflammatory) घटक आहेत. हे अत्यावश्यक व्हिटॅमिन फुफ्फुसापर्यंत पसरलेल्या ब्रोन्कियल नलिकांमध्ये (bronchial tube) होणारी जळजळ दाबून टाकण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. ज्या व्यक्तीला अस्थमासारखी आरोग्य समस्या आहे, अशा व्यक्तींसाठी सीताफळ हे उत्तम नैसर्गिक उपाय आहे. विशेषत: हंगामी बदल होताना किंवा उच्च परागकणांच्या संपर्कात आल्यानंतर (high pollen exposure) होणाऱ्या अलॅर्जीदरम्यान ते सहाय्य करते. व्हिटॅमिन बी ६ मधील दाहक विरोधी गुणधर्म ही लक्षणे कमी करते आणि श्वासोच्छ्वासाची निरोगी पद्धत तयार करण्यासाठी मदत करते.

हेही वाचा – सँडविच खाणे आरोग्यासाठी चांगले आहे की नाही? सँडविच खाण्यामुळे वजन वाढते का? जाणून घ्या काय सांगतात आहारतज्ज्ञ….. 

फुफ्फुसांमधील विषारी द्रव्ये बाहेर टाकणारे गुणधर्म

डिटॉक्झिफिकेशन म्हणजे शरीरातील अंतर्गत संस्थांमध्ये साचलेले विषारी द्रव्य बाहेर फेकणे. सीताफळ खाणे हे नैसर्गिकरित्या फुफ्फुसांची सफाई करण्यासारखे आहे. या फळामध्ये अँटीऑक्सिडंट आणि फायटोन्यूट्रिएंट्स (phytonutrients) असतात, जे श्वसन संस्थेमधून प्रदूषकांना आणि विषारी घटकांना बाहेर काढण्यासाठी सहकार्य करतात. नियमित सीताफळ खाल्ल्याने धूम्रपान किंवा प्रदूषणासारखे पर्यावरणीय घटकांमुळे फुफ्फसांमध्ये जमा होणारे हानिकारक घटक बाहेर टाकण्यास मदत होते. ही नैसर्गिक डिटॉक्झिफिकेशन प्रक्रिया स्वच्छ हवा मार्ग तयार करते, फुफ्फुसाच्या चांगल्या कार्यास प्रोत्साहन देते आणि श्वसनाच्या आजारांचा धोका कमी करते.

फुफ्फुसांचे आरोग्य जपण्यास सीताफळ मदत करते.

सीताफळामध्ये असलेले गुणधर्म हे फुफ्फुसांचे आरोग्य जपण्यासाठी मदत करते. या फळामध्ये फुफ्फुसांमधील दाह कमी करण्यासह विषारी घटक बाहेर काढण्याची क्षमता आहे. पर्यावरणीय प्रदूषकांपासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी आणि फुफ्फुसांचे कार्य व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी तुमच्या संतुलित आहारात सीताफळाचा समावेश करणे हे एक चांगला बदल ठरू शकते.

हेही वाचा – मधुमेही व्यक्तीने धावू नये का? धावण्यामुळे गुडघ्यांचे नुकसान होते का? काय मिथक आणि काय तथ्य, तज्ज्ञांकडून जाणून घ्या….

मधुमेहींनी सीताफळाचे सेवन करताना काळजी घ्या

ज्यांना मधुमेह आहे अशा व्यक्तींनी सीताफळ खाताना काळजी घ्यावी, कारण त्यामध्ये नैसर्गिक साखरचे प्रमाण जास्त असते. सीताफळाचे आरोग्यासाठी अनेक फायदे असले, तरी त्यांच्यातील गोडवा शरीरातील साखरेची पातळी वाढवू शकतो. त्यामुळे मधुमेह असलेल्यांनी सीताफळाचे सेवन माफक प्रमाणात केले पाहिजे. एकूण कार्बोहायड्रेटसच्या सेवनावर बारकाईने लक्ष असले पाहिजे आणि तुमच्या आहाराच्या गरजा आणि रक्तातील ग्लुकोजचे व्यवस्थापनाशी ते जुळत असल्याची खात्री केली पाहिजे. मधुमेहींना डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा किंवा पोषणतज्ज्ञांकडून सीताफळाचे सेवन किती प्रमाणात करावे आणि केव्हा सेवन करावे, याबाबत मार्गदर्शन घेण्याची शिफारस केली जाते.

आहारामध्ये सीताफळाचा समावेश करणे

सीताफळाचे अष्टपैलू गुणधर्म लक्षात घेता, विविध पदार्थ तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो; ज्यामुळे तुमच्या सर्वप्रकारच्या घटकांचा समावेश होईल. ते कच्चेदेखील खाऊ शकता, स्मुदीमध्ये टाकून खाऊ शकता, फळांच्या सॅलडमध्ये टाकून खाऊ शकता किंवा गोड पदार्थामध्ये ते वापरले जाऊ शकते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Custard apples surprising health benefit how it naturally detoxifies the lungs from pollutants snk
Show comments