Dahi Bundi Raita: काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढत असताना दुपारी थंडगार दही जेवणात असेल तर काय सुख मिळतं हे सांगायलाच नको. अनेकांना जेवणासह कोशिंबीर , बुंदी रायता अशा रूपात दही खायला आवडते. दह्याचे अनेक फायदे असले तरी, यापासून जास्तीत जास्त आरोग्य फायदे मिळवण्यासाठी, सेवनाचे काही आयुर्वेदिक नियम पाळायला हवेत. आयुर्वेदानुसार, दही फॅट्स वाढवते (वजन वाढीसाठी उत्कृष्ट), कफ आणि पित्त वाढवते (वात कमी करते) आणि पाचक अग्नी (पचनशक्ती) वाढवते. त्यामुळे दह्याचे सेवन करताना नियमाचे पालन करायलाच हवे. आज आपण दह्यासह काय खावे व दही खाण्याचे नियम काय हे जाणून घेणार आहोत..
दही खाण्याचे फायदे (Benefits Of Eating Curd)
आयुर्वेदिक तज्ञ आणि सल्लागार डॉ चैताली देशमुख यांच्या माहितीनुसार,दह्यामध्ये अनेक सूक्ष्मजीव असतात जे आपल्या पचनसंस्थेला मदत करतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. शरीराला लागणाऱ्या कॅल्शियम आणि फॉस्फरसची गरज पूर्ण दह्याने पूर्ण होते आणि दुधाला पोषक पर्याय म्हणून देखील हे उपयुक्त आहे.
दही खाण्याचे नियम (Rules To Eat Curd)
१) दही आपल्या कफ दोषाला वाढवू शकते, जो. “जेव्हा तुमचा कफ दोष वाढतो तेव्हा जास्त प्रमाणात श्लेष्मा तयार होतो, ज्यामुळे अपचन होऊ शकते. डॉ देशमुख म्हणतात, “रात्री दह्याचे सेवन करायचे असल्यास त्यात चिमूटभर मिरी पावडर आणि चिमूटभर मेथी पावडर टाका.”
२) डॉ देशमुख स्पष्ट करतात की समकालीन विज्ञान आणि आयुर्वेद हे दोन्ही मान्य करतात की दही गरम केल्याने त्याचे सत्व बदलू शकतात, ज्यामुळे तुमच्या शरीरात सूज येऊ शकते.
३) आयुर्वेदिक तज्ञ स्पष्ट करतात की दही हे शरीरात जळजळ वाढवू शकते. रोज दही खाणे टाळा. दह्याऐवजी तुम्ही रोज ताक पिऊ शकता.
४) दह्यासह कोणत्याही प्रकारचे फळ खाणे ऍलर्जी आणि चयापचय समस्या वाढवू शकते.
५) मासे किंवा मांस यासह दही खाल्ल्यास शरीरारात विषारी पदार्थ तयार होतात
६) काकडी रायता आणि बुंदी रायता हे अतिशय चुकीचे कॉम्बिनेशन आहे. काकडी व दही हे त्यांच्या गुणधर्माच्या दृष्टीने दोन विरुद्ध पदार्थ आहेत आणि त्यांना कोणत्याही प्रकारे एकत्र केल्याने तुमची प्रणाली आतून खराब होऊ शकतात. तसेच शरीरारात विषारी पदार्थ तयार होऊ शकतात. याचे दुष्परिणाम ताप आणि त्वचा रोगाच्या रूपात दिसून येतात.
हे ही वाचा<< खरवस, बर्फीसारखं घट्ट दही घरी बनवा; विरजणाची गरजच नाही; ‘ही’ रेसिपी आहेच भारी
७) बुंदी तुपात किंवा तेलात तळलेली असल्याने ती दह्यासह खाल्ल्यास त्याने फॅट्सही वाढू लागते. काकडीच्या रायत्यासाठी एक उत्तम पर्याय म्हणजे दुधीचा रायता.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला घ्या)