Honey Curd For Good Gut Health: आयुर्वेदात काही पदार्थ हे ‘विरुद्ध आहार’ म्हणून ओळखले जातात. एकमेकांविरुद्ध सत्व असणारे पदार्थ एकत्र खाल्ल्याने शरीरात विषारी घटक तयार होण्याचा धोका असतो. सध्या इंस्टाग्रामवर गोड मध आणि आंबट दही वापरून तयार केलेल्या ‘हाय-प्रोटीन’ ब्रेकफास्टची रेसिपी खूप व्हायरल होत आहे. खरं तर हे दोन पदार्थ सुद्धा परस्पर विरोधी आहेत पण याचा तुमच्या आरोग्याला फायदा होऊ शकतो असा दावा करण्यात आला होता. त्यामुळेच या व्हायरल व्हिडिओमागील खरे उत्तर जाणून घेण्यासाठी आपण डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया…

अरिजिता सिंग, पोषणतज्ज्ञ यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवसातील तुमच्या पहिल्या जेवणात प्रथिने व चांगल्या फॅट्सचे प्रमाण मुबलक असणे महत्त्वाचे आहे. यामुळे दिवसभर रक्तातील साखर स्थिर राहून ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते.

curd in any food be dangerous
कोणत्याही पदार्थांमध्ये दह्याचा सतत वापर करणं ठरू शकतं घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते…
Shrimant Dagdusheth Halwai Ganpati latest news
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला तब्बल ११०० नारळांचा महानैवेद्य
Which of the raw and pasteurized milk is beneficial
कच्चे व पाश्चराइज्ड यापैकी कोणते दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर? तज्ज्ञांचे मत घ्या जाणून…
Testy bhindi fry khatti mitthi bhindi lady fingars recipe for lunch or diner
भेंडीची खट्टी -मीठी भाजी; ती पण चिकट न होता! पाहा सोपी मराठी रेसिपी
yoga poses to relieve gas
Health Special: पोटातील गॅसवर योगासनांचा जालीम उपाय; नेमके काय कराल? – भाग २
tomato rice
रोज रोज भाजी-पोळी खाऊन कंटाळला आहात? मग आज बनवा टोमॅटो पुलाव तेही झटपट
What is the Leidenfrost effect
Leidenfrost Effect : जेवण बनवण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा पॅन वापरताय? मग नक्की जाणून घ्या ‘या’ हॅकबद्दल

दही मधाचे पुडिंग शरीरासाठी काय काम करते?

सिंग यांच्या मते, दही उत्तम आरोग्यासाठी आवश्यक आहे. त्यात उत्तम प्रथिने असतात. दह्यामध्ये प्रोबायोटिक सुद्धा मुबलक प्रमाणात असतात. यात भिजवलेले मनुके मिसळून खाल्ल्यास पाचक आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होऊ शकते. याशिवाय भिजवलेल्या बदामांमध्ये फायबर, व्हिटॅमिन ई, ओमेगा-३ फॅटी अॅसिड, प्रथिने असतात. भिजवलेले बदाम सर्व वयोगटांसाठी सुपरफूड आहेत. तर डाळिंब अँटिऑक्सिडंट्स वाढवते, हे दाहक-विरोधी असून व्हिटॅमिन के, सी, फायबर, पोटॅशियम समृद्ध आहे आणि हृदय, मेंदू आणि पाचक आरोग्यासाठी उत्तम आहे

डॉ. रोहिणी पाटील, एमबीबीएस आणि पोषणतज्ञ यांच्या मते, दह्यामध्ये मुबलक कॅल्शियम, जीवनसत्त्वे, प्रथिने, फॉस्फरस, बी12 आणि प्रोबायोटिक्स असे पोषक सत्व असतात. दह्यातील चांगले बॅक्टरीया आतड्याचे आरोग्य व पचन सुधारण्यासाठी मदत करतात,

मधाचे पौष्टिक मूल्य मधाच्या प्रकारानुसार बदलू शकते, परंतु सर्वसाधारणपणे, ते अँटिऑक्सिडंट्स, एन्झाईम्स आणि लोह, जस्त, पोटॅशियम आणि कॅल्शियम यांसारख्या खनिजांचा एक चांगला स्रोत आहे. मध व दही यांचे सेवन सूज कमी होणे आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारणे अशा अनेक कामांमध्ये मदत करते.

मध आणि दही यांचे मिश्रण आतड्यांसाठी चांगले आहे का?

जेव्हा तुम्ही दही आणि मध मिसळता तेव्हा दह्यातील प्रथिने, कॅल्शियम आणि प्रोबायोटिक्स व मधामध्ये आढळणारे फायदेशीर संयुगे एकत्र येऊन या पदार्थाची पोषक गुणवत्ता वाढण्यास मदत होते. “हे मिश्रण तुम्ही हेल्दी स्नॅक किंवा गोड पदार्थांना पर्याय म्हणून खाऊ शकता.

आहारतज्ञ प्रीती गुप्ता यांनी सुद्धा या माहितीला सहमती दर्शवली. त्या सांगतात की, दही आणि मध यांचे मिश्रण पाचन आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते. “दही आणि मध या दोन्हीमध्ये पोषक सत्व असतात जे निरोगी पचन वाढवतात आणि पचन समस्या दूर करण्यास मदत करतात. हे कॉम्बो मज्जासंस्थेसाठी चांगले आहे आणि ते वजन कमी करण्यास देखील मदत करू शकते. कारण मर्यादेत खाल्लेले दोन्ही घटक आतड्यांचे आरोग्य सुधारू शकतात,”

मध दही डिप साठी रेसिपी:

साहित्य

  • १ कप – साधे दही
  • 2 चमचे – मध
  • 1 टीस्पून – ऑलिव्ह तेल
  • 1/2 टीस्पून – जीरे पावडर
  • 1/2 टीस्पून – धणे पावडर
  • चवीनुसार मीठ आणि काळी मिरी
  • ताजी ओव्याची पाने

हे ही वाचा<< दह्यात काकडी किंवा बुंदी मिसळल्याने शरीरात बनते विष? तज्ज्ञांनी सांगितली सेवनाची योग्य पद्धत

कृती

  • एका भांड्यात दही, मध, ऑलिव्ह ऑईल, जिरे पावडर, धणे पावडर, मीठ आणि काळी मिरी गुळगुळीत आणि क्रीमी होईपर्यंत फेटा.
  • चिरलेली ओव्याची पाने घालून सजवा.
  • भाज्या, पिटा ब्रेड किंवा चिप्स बरोबर डिप म्हणून सर्व्ह करा.