Dark Chocolate Benefits : तुमच्यापैकी अनेकांना डार्क चॉकलेट खायला आवडत असेल. लहान मुलांना खूश करण्यासाठी किंवा जोडीदाराला सरप्राईज म्हणूनही डार्क चॉकलेट दिले जाते. बरेच लोक चॉकलेटला आरोग्यदायी मानतात. पण, काही लोक चॉकलेट शरीरासाठी हानिकारक असल्याचे म्हणतात. पण, नेचर सायंटिफिक रिपोर्ट्समधील नवीन अभ्यासानुसार, डार्क चॉकलेटमुळे उच्च रक्तदाबाची समस्या कमी होण्यास मदत होत असल्याचे समोर आले आहे. तसेच रक्त गोठण्याच्या जोखमीदेखील कमी होत असल्याचे या संशोधनातून उघड झाले आहे. पण, यातील कारणात्मक संबंध अद्याप समोर आलेले नाहीत. पण, डार्क चॉकलेटमुळे खरंच रक्तदाबाचा धोका कमी होतो यावर मुंबईतील फोर्टिस हॉस्पिटलमधील इंटरनल मेडिसिन कन्सल्टंट डॉ. सुब्रमण्यन इटोलिकर यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.

डॉ. सुब्रमण्यन इटोलिकर म्हणाले की, संशोधनातून समोर आलेली माहिती मनोरंजक आहे, कारण यातून उच्च रक्तदाब कमी होत असल्याचे सूचित केले आहे. दरम्यान, अनेकांना कोणतेही लक्षण स्पष्ट दिसत नसतानाही उच्च रक्तदाबाचा धोका असल्याचे दिसून येते, ही अत्यंत प्रचलित वैद्यकीय स्थिती आहे. जागतिक स्तरावरही अनेकांना अशाप्रकारे कोणतेही लक्षण दिसत नसतानाही उच्च रक्तदाबाचा त्रास होत असतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक येतो.

curd in any food be dangerous
कोणत्याही पदार्थांमध्ये दह्याचा सतत वापर करणं ठरू शकतं घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Shocking video If you eat roti made dough keeping fridge can make you sick
महिलांनो चपात्या केल्यानंतर उरलेलं पीठ फ्रिजमध्ये ठेवताय?; ‘हा’ VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
Which of the raw and pasteurized milk is beneficial
कच्चे व पाश्चराइज्ड यापैकी कोणते दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर? तज्ज्ञांचे मत घ्या जाणून…
Testy bhindi fry khatti mitthi bhindi lady fingars recipe for lunch or diner
भेंडीची खट्टी -मीठी भाजी; ती पण चिकट न होता! पाहा सोपी मराठी रेसिपी
Can drinking water with food cause gas or indigestion
जेवताना पाणी प्यावे का? जेवताना पाणी प्यायल्याने अपचनाचा त्रास होतो का? डॉक्टरांकडून घ्या जाणून…
Make delicious kheer
दिवाळीतील मिठाई कधी संपणार, असा प्रश्न पडलाय? मग झटपट बनवा मिठाईची स्वादिष्ट खीर
Coconuts Are Not Allowed On Planes
Coconuts Are Not Allowed On Planes : विमान प्रवासात नारळ घेऊन जाण्यावर का आहे बंदी? वाचा नियम, तोटे अन् तज्ज्ञांचे मत

डार्क चॉकलेटमधील ‘हे’ घटक एंडोथेलियल फंक्शन आणि धमनीचे कार्य सुधारण्यात आणि रक्तवाहिन्यांचे व्हॅसोडिलेशन किंवा धमन्यांचा आकार वाढवण्यासाठी मदत करतात?

एंडोथेलियल डिसफंक्शन म्हणजे हृदयातील रक्तवाहिन्यांच्या आतील अस्तरांचे नुकसान होणे, ज्यामुळे हृदयविकाराचा धोकाही वाढतो. म्हणूनच हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी संशोधनात नेहमी हे आजार रोखण्यावर भर राहिला आहे. शरीराला नेहमी नायट्रिक ऑक्साईडची गरज असते, जे रक्तवाहिन्या अरुंद होण्यापासून रोखून रक्त प्रवाह सुधारण्यास मदत करते. दरम्यान, डार्क चॉलेटमध्ये अँटीऑक्सिडंट आणि दाहकविरोधी गुणधर्मांसह फ्लेव्होनॉइड्स एंडोथेलियम असते, जे नायट्रिक ऑक्साईड सोडण्यास चालना देतात. आधीच्या अभ्यासातून समोर आलेल्या पुराव्यांनंतर या दाव्याला आणखी गती मिळाली आहे.

नायट्रिक ऑक्साईड रक्तवाहिन्यांना आराम देण्यासह प्लेटलेटची घनतादेखील कमी करते, यामुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यास प्रतिबंध करता येतो. यामुळे लिपोप्रोटीनचे ऑक्सिडेशन कमी होते. तसेच फ्री रॅडिकल्स कण रोखण्यासह स्नायूंचे होणारे नुकसान कमी होते. हे सर्व घटक रक्तवाहिन्यांमधील अडथळ्यांवर काम करतात.

डार्क चॉकलेटमध्ये पॉलिफेनॉल आणि थिओब्रोमाइन असते, जे शरीरातील कमी घनतेच्या लिपोप्रोटीन (LDL) किंवा खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते. तसेच उच्च घनता लिपोप्रोटीन (HDL) किंवा चांगले कोलेस्ट्रॉलच्या वाढीस चालना मिळते.

डार्क चॉकलेटच्या सेवनाने उच्च रक्तदाबावर कसा परिणाम होतो?

डार्क चॉकलेट मूत्रपिंडाच्या रक्त प्रवाहात होणारे बदल सुधारून उच्च रक्तदाबास प्रतिबंधित करते, ज्याला रेनल व्हॅस्कूलर हायपरटेन्शन असेही म्हटले जाते.

उच्च रक्तदाब टाळण्यासाठी केवळ डार्क चॉकलेटवर विसंबून राहू शकतो का?

उच्च रक्तदाब कमी करणे हे केवळ आहारावर अवलंबून नाही, तर जीवनशैली सुधारणे, व्यायाम आणि चांगली झोप यावरही अवलंबून आहे. आज आपण ज्या समस्यांना तोंड देत आहोत, त्यातील बहुतेक समस्या या चुकीच्या आहाराची निवड आणि बैठी जीवनशैलीमुळे निर्माण झाल्या आहेत. या समस्यांवर योग्य उपाययोजना केल्यास तुम्ही हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी करू शकता.

किडनीचे आजार, मूत्रपिंडाचा रोग, अंतःस्रावी आजारांवर डार्क चॉकलेटमुळे काय परिणाम होतात हे जाणून घेण्यासाठी आणखी संशोधन व्हायला पाहिजे का?

आत्तापर्यंतच्या झालेल्या अभ्यासातून कोको किंवा चॉकलेटचा शरीरावर किती संरक्षणात्मक प्रभाव पडतो हे निश्चित करण्यात आलेले नाही. यामुळे खरंच डार्क चॉकलेटने किडनीचे आजार, मूत्रपिंडाचा रोग, अंतःस्रावी रोगांवर प्रकाश टाकण्यासाठी अधिक संशोधनाची गरज आहे.

उच्च रक्तदाबाचा धोका असलेल्या व्यक्तींसाठी तुम्ही कोणत्या विशिष्ट प्रतिबंधात्मक उपायांची किंवा जीवनशैलीतील बदलांची शिफारस कराल?

बहुतेक असंसर्गजन्य आजार हे चुकीच्या जीवनशैलीमुळे होत असल्याचे दिसते. अगदी डार्क चॉकलेटचे सेवन दररोज ३० ते ६० ग्रॅमपेक्षा जास्त सेवन करु नका. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी हाय प्रोटीन, लो फॅट, लो कार्बोहायड्रेट असलेल्या आहाराचे सेवन करा, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप अधिक आवश्यक आहे.