Eye Dark Circles Could Be Serious Health Problem : डोळ्यांखालील काळी वर्तुळे (Dark circles) थकवा किंवा वृद्धत्वाची चिन्हे आहेत असे समजून नाकारली किंवा दुर्लक्ष केली जातात. पण, ही काळी वर्तुळे अंतर्गत आरोग्य समस्या किंवा लक्ष देण्यायोग्य जीवनशैली निवडींचे सूचकसुद्धा असू शकतात. झोप पूर्ण न झाल्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात हे तर आपल्याला माहितीच आहे. पण, तुमच्या डोळ्यांखालची ती वर्तुळे कदाचित तुमच्या एकंदर आरोग्याबद्दल एक गुपित कथासुद्धा सांगत असतील तर…

जीव्हीजी इन्व्हिओ (GVG Invivo) हॉस्पिटल्सचे वरिष्ठ सौंदर्यविषयक प्लास्टिक सर्जन डॉक्टर गुणसेकर वुप्पलापती म्हणतात की, “डोळ्यांखालची काळी वर्तुळे ही एक सामान्य चिंतेची बाब आहे आणि याचे कारण आरोग्य जीवनशैलीच्या विविध घटकांमुळे असू शकते. तसेच या काळ्या वर्तुळाचे स्वरूप कमी करण्यासाठी त्याचं मूळ कारण नेमकं काय हे सुद्धा समजून घेणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे.

attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
CCTV camera installed in 60 prisons due to inmate attacks and illegal provisions
सुरक्षेचा ‘तिसरा डोळा’बंदच; अंमली पदार्थ, मोबाईलच्या वापरावर नियंत्रण येणार तरी कसे?
Important research Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University shows that mosquitoes are repelled by yellow light of LED
डासांपासून त्रस्त झाले का? हे करून बघा, काय सांगते पिवळ्या दिव्याचे नवे संशोधन
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
india sets conditions for elon musk s starlink satellite licence approval
एलॉन मस्क यांच्या ‘स्टारलिंक’ला भारतीय अवकाश खुले; मात्र परवाना नियम-शर्तींच्या पूर्ततेनंतरच केंद्रीय मंत्र्यांचे प्रतिपादन
Savlyachi Janu Savli
Video : “आयुष्यातला अंधार…”, सावली आणि सारंगचे लग्न होणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
south superstar ram charan goes barefoot heads to lucknow video viral
Video: दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण अनवाणी पायाने पोहोचला एअरपोर्टवर, ४१ दिवस करणार ब्रह्मचर्याचं पालन; काय असतं जाणून घ्या…

काळी वर्तुळे तयार होण्यास हातभार लावणाऱ्या काही आरोग्य समस्या (Common health problems that contribute to dark circles under the eyes):

डॉक्टर गुणसेकर वुप्पलापती म्हणतात की, डोळ्यांखालील काळी वर्तुळात योगदान देणाऱ्या विविध आरोग्य स्थिती आहेत; जसे की,

ॲलर्जी (Allergies) : ॲलर्जीमुळे त्वचेवर हिस्टामाइन येऊ शकते, ज्यामुळे रक्तवाहिन्या पसरतात आणि डोळ्यांच्या सभोवतालच्या पातळ त्वचेखाली खाज येणे, जळजळ होणे, डोळ्यांना सतत चोळणे आदी कारणांमुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे तयार होऊ शकतात.

एक्जिमा आणि त्वचारोग (Eczema and Dermatitis) : त्वचेच्या या स्थितीमुळे खाज सुटणे आणि जळजळ होऊ शकते; ज्यामुळे डोळ्यांना खाज येणे, चोळणे यामुळे डोळ्यांखालची काळी वर्तुळे वाढू शकतात किंवा नवीन येऊ शकतात.

अशक्तपणा (Anaemia) : लोहाच्या कमतरतेमुळे शरीरातील ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी लाल रक्तपेशींची संख्या कमी होते, ज्यामुळे त्वचा फिकट होते आणि डोळ्यांखालील रक्तवाहिन्या गडद दिसतात आणि ती डार्क सर्कलसारखी दिसू लागतात.

हेही वाचा…सर्दी, खोकला झाल्यावर तुम्हीसुद्धा दूध पिणं टाळता का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या खरं कारण अन् त्यावरील उपाय

तुमच्या पुढील काही दैनंदिन सवयी डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळावर परिणाम करू शकतात (Your lifestyle habits can influence the dark circles) :

डॉक्टर वुप्पलापती यांनी पुढील काही सवयींपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे, ज्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे.

अयोग्य आहार (Poor Diet) : जीवनसत्त्वे K आणि B12 सारख्या आवश्यक पोषकतत्त्वांच्या कमतरतेमुळे रक्तवाहिन्या कमकुवत होऊ शकतात आणि रक्ताभिसरण बिघडू शकते, ज्यामुळे डोळ्यांखाली काळा रंग किंवा वर्तुळे येतात.

डिहायड्रेशन (Dehydration) : अपुऱ्या प्रमाणात पाणी पिल्याने त्वचा निस्तेज होऊ शकते. त्यामुळे काळी वर्तुळे अधिक स्पष्ट दिसू लागतात, त्यामुळे नेहमी हायड्रेट राहा.

धूम्रपान आणि अल्कोहोलचे सेवन (Smoking and Alcohol Consumption) : धूम्रपान आणि अल्कोहोलचे सेवन या सवयी शरीराचे निर्जलीकरण करू शकतात आणि यामुळे तुमच्या त्वचेच्या रक्तवाहिन्या विस्तारू शकतात, ज्यामुळे त्या डोळ्यांच्या त्वचेखाली त्याचा परिणाम दिसू लागतो. तसेच दीर्घकाळापर्यंत धूम्रपान आणि अल्कोहोलचे सेवन केल्याने कोलेजन आणि इलास्टिनचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे त्वचा पातळ होते आणि डोळ्याखालची काळी वर्तुळे आणखीन गडद दिसू लागतात.

स्क्रीन टाइम (Excessive Screen Time): इलेक्ट्रॉनिक स्क्रीनकडे जास्त तास बघितल्याने डोळ्यांवर ताण येतो आणि थकवा येऊ शकतो, ज्यामुळे त्या भागात रक्त प्रवाह वाढल्यामुळे तात्पुरती काळी वर्तुळे डोळ्यांखाली निर्माण होतात.

तीव्र ताण आणि झोप न लागणे (Chronic Stress and Lack of Sleep) : तणावामुळे शरीरात कॉर्टिसोल हा हार्मोन सोडण्यास चालना मिळते, ज्यामुळे डोळ्यांभोवती द्रवपदार्थ टिकून राहणे आणि सूज येऊ शकते. अपर्याप्त झोपेमुळे रक्ताभिसरण बिघडू शकते आणि रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊ शकते, ज्यामुळे त्वचा फिकट दिसू शकते. यामुळे अंतर्निहित रक्तवाहिन्या अधिक गडद दिसतात, ज्यामुळे काळी वर्तुळे निर्माण होतात.

विशिष्ट वैद्यकीय परिस्थिती किंवा कमतरता ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते :

“हायपोथायरॉईडीझमसारख्या परिस्थितीमुळे द्रवपदार्थ टिकून राहणे आणि त्वचेच्या संरचनेत बदल होऊ शकतो, ज्यामुळे डोळ्यांखाली फुगीरपणा किंवा त्या भागातील रंग खराब होतो,” असे डॉक्टर वुप्पलापती स्पष्ट करतात. व्हिटॅमिन K, B12 आणि E च्या कमतरतेमुळे रक्त गोठणे, लाल रक्तपेशींचे उत्पादन आणि अँटिऑक्सिडंट संरक्षण बिघडू शकते, हे सर्व काळ्या वर्तुळांच्या विकासास हातभार लावू शकतात. “पेरिऑरबिटल हायपरपिग्मेंटेशन ही एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये डोळ्याभोवती मेलेनिनचे उत्पादन वाढते. बहुतेकदा अनुवांशिक घटकांमुळे किंवा सूर्यप्रकाशामुळे आरोग्याच्या समस्यांशी थेट संबंध नसला तरी इतर योगदान देणाऱ्या घटकांमुळे ते वाढू शकते; असे डॉक्टर गुणसेकर वुप्पलापती यांचे म्हणणे आहे.