Dark vs milk chocolate: व्हॅलेंटाईन डे अगदी जवळ आला आहे आणि कोणताही क्षण गोड खाल्ल्याशिवाय पूर्ण होत नाही. नात्यात गोडवा येण्यासाठी जोडीदाराला चॉकलेट भेट म्हणून दिले जाते. या दिवशी तुम्ही तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना आणि क्रशला चॉकलेट भेट देऊ शकता. तथापि, हे केवळ भेटवस्तू देण्याचा एक मार्ग नाही तर नातेसंबंधांमध्ये गोडवा आणण्याचा आणि प्रेम व्यक्त करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. म्हणून, जर तुम्ही तुमच्या व्हॅलेंटाईनला चॉकलेट्स देऊन इम्प्रेस करण्याचा विचार करत असाल, तर हे तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला डार्क चॉकलेट दिले पाहिजे की मिल्क चॉकलेट दिले पाहिजे? दोघांपैकी आरोग्यासाठी कोणते उत्तम आहे हे सांगणार आहोत. बेंगळुरूमधील एस्टर सीएमआय हॉस्पिटलचे क्लिनिकल न्यूट्रिशन आणि डायटेटिक्सच्या सेवाप्रमुख एडविना राज आणि बेंगळुरूचे औषध सल्लागार डॉ. फयाज यांनी या संदर्भात द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डार्क चॉकलेट की मिल्क चॉकलेट

बेंगळुरूमधील एस्टर सीएमआय हॉस्पिटलचे क्लिनिकल न्यूट्रिशन आणि डायटेटिक्सच्या सेवाप्रमुख एडविना राज यांच्या मते, डार्क चॉकलेट हे सामान्यतः मिल्क चॉकलेटपेक्षा आरोग्यदायी पर्याय मानले जाते.

७०-८५% कोको असलेल्या डार्क चॉकलेटच्या १००-ग्रॅम बारमध्ये ११ ग्रॅम फायबर, १२ मिलीग्राम लोह, २५० मिलीग्राम मॅग्नेशियम, १.७ मिलीग्राम तांबे आणि १.९ मिलीग्राम मँगनीज यासह भरपूर पोषक असतात. त्यात पोटॅशियम, फॉस्फरसदेखील लक्षणीय प्रमाणात आहेत.

बेंगळुरूचे औषध सल्लागार डॉ. फयाज म्हणाले की, डार्क चॉकलेट मेंदूला रक्त प्रवाह वाढवून मेंदूची कार्यक्षमता वाढवते. ते खराब कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब कमी करते आणि हृदयविकाराचा धोका कमी करते. याव्यतिरिक्त, डार्क चॉकलेट मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत करू शकते. डार्क चॉकलेटचे सेवन करण्यासाठी आदर्श प्रमाण दररोज सुमारे ३०-६० ग्रॅम आहे.

डार्क चॉकलेट, मिल्क चॉकलेट तोटे

डॉ. फयाझ यांनी निदर्शनास आणले की, डार्क चॉकलेटमध्ये कॅफिन असते, जे मोठ्या प्रमाणात सेवन केल्यास झोपेचा त्रास आणि अस्वस्थता येऊ शकते. तसेच चरबीयुक्त सामग्रीमुळे वजन वाढू शकते. यामुळे काही व्यक्तींमध्ये गॅस आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यादेखील उद्भवू शकतात.

तर मिल्क चॉकलेटमध्ये कोकोआ बटर, साखर आणि दुधाच्या घन पदार्थांपासून बनवलेले पदार्थ असतात. तसेच त्यात साखर आणि संतृप्त चरबीचे प्रमाण जास्त आहे, तसेच ते अत्यंत प्रक्रिया केलेले असते. म्हणून डार्क चॉकलेटच्या तुलनेत मिल्क चॉकलेटचे पौष्टिक मूल्य कमी आहे.