मुलं जसजशी नऊ दहा वर्षांची होतात त्यांना सोशल मीडियाचे वेध लागायला सुरुवात होते. कधीतरी तर त्याही आधी त्यांना इंस्टाग्रामवर जायचे असते. त्यासाठी पालकांकडे हट्ट सुरु होतो. महामारीच्या आधी स्वतःचे स्वतंत्र्य मोबाईल नसल्यामुळे पालकांच्या मोबाईलवरुन सोशल मीडिया खाती उघडण्याचे प्रमाण स्वतःचा मोबाईल नसलेल्या मुलांमध्ये कमी होतं. पण कोरोना काळात सगळ्या मुलांच्या हातात फोन गेले. ऑनलाईन शाळेपाठोपाठ मुलं अचानक सोशल मीडियावर दिसायला लागली. इंस्टाग्राम किंवा फेसबुकसारखा सोशल मीडिया असं म्हणतो की तुम्हाला स्वतःचं आणि स्वतंत्र्य सोशल मीडिया अकाउंट हवं असेल तर १३ वर्ष पूर्ण होणं गरजेचं आहे. त्याआधी मोठ्यांच्या देखरेखीखाली तुम्ही अकाउंट सुरु करु शकता. घराघरातल्या टीनएजर मुलांना काही मोठ्यांच्या देखरेखीखालील अकाउंट नको असतं त्यामुळे मूल जर १३ वर्ष पूर्ण नसेल तर ते त्याची जन्म तारीख बदलून सोशल मीडियावर स्वतंत्र्यपणे येतं असं अनेकदा दिसून येतं. इतकंच नाही तर, मला काम करताना हेही लक्षात आलं आहे की पालकही मुलांची हौस पूर्ण करुन देण्यासाठी खोट्या जन्म तारखा घालून ८ ते १२ वयोगटातल्या मुलांना सोशल मीडिया देतात. या सगळ्यातच माध्यम शिक्षण हा भाग कुठेही दृष्टीक्षेपात नसतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा