Benefits Of Eating Dates Seeds Powder: खजूर खाल्ल्याने होणारे फायदे आपण आजवर अनेकदा ऐकले असतील पण खजूर खाल्ल्यावर जी बी तुम्ही फेकून देता ती सुद्धा बहुपयोगी आहे हे तुम्हाला माहित आहे का? खजुराच्या बिया विशिष्ट पद्धतीने वाटून पावडर स्वरूपात खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यापासून ते अनेक प्रकारचे फायदे शरीराला मिळू शकतात. नेमकी खजुराच्या बियांची पावडर बनवायची कशी, खायची कशी व त्याच्या सेवनाचे फायदे काय हे आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊया..

जिंदाल नेचरक्योर इन्स्टिट्यूटच्या मुख्य आहारतज्ज्ञ सुषमा पीएस यांनी इंडियन एक्सस्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, खजुराच्या बिया एक पौष्टिक खजिना आहेत. “खजुराच्या बियांचा रक्तातील साखरेच्या पातळीवर सकारात्मक प्रभाव पडतो. बियांमधील काही घटक ग्लुकोजचे चयापचय नियंत्रित करण्यास मदत करू शकतात, ज्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी किंवा स्थिती विकसित होण्याचा धोका असलेल्या लोकांसाठी या बिया फायदेशीर ठरू शकतात. “

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Jaggery on empty stomach
थंडीच्या दिवसात सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे?
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
Make Kabuli Chana Kebabs in just a few minutes
अवघ्या काही मिनिटांत बनवा काबुली चन्याचे कबाब; वाचा साहित्य आणि कृती
Dragon fruit benefits for skin and hair
त्वचा आणि केसांसाठी ड्रॅगन फ्रूट फायदेशीर; जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ
Benefits of lemon water Is Warm Lemon Water On An Empty Stomach Good for You? Expert Says This know more
Lemon water:सकाळी उठून लिंबू पाणी पिण्याची ७ कारणं, आरोग्यासाठी अप्रतिम फायदे वाचून व्हाल थक्क
25 December Rashi Bhavishya In Marathi
२५ डिसेंबर पंचांग: चारचौघात कौतुक ते अचानक धनलाभ; पंचांगानुसार आज तुमची रास ठरेल का भाग्यवान? वाचा राशिभविष्य

डॉ संगीता तिवारी, क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट, आर्टेमिस हॉस्पिटल्स यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, खजुराच्या बियांमध्ये आहारातील फायबरचे प्रमाण मुबलक असते, जे आतड्याच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. हे फायबर पचनास मदत करते आणि बराच वेळ पोट भरल्याची भावना निर्माण करते पारिणामी वजन कमी करण्याच्या प्रवासात सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो.

खजुराच्या बियांची पावडर हायपरग्लायसेमिक रुग्णांमध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करू शकते, सामान्य लोकांच्या बाबत ग्लायसेमिक निर्देशांक बदलतच नाही. याचा अर्थ मधुमेहाच्या रुग्णांसाठी खजूर सर्वाधिक फायदेशीर आहे, असे सुषमा यांनी सांगितले.

डॉ. तिवारी यांनी असेही नमूद केले की खजुराच्या बिया तुमच्या शरीरातील मुक्त रॅडिकल्सशी लढा देणाऱ्या अँटिऑक्सिडंट्सनी समृद्ध असल्याने ते पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात. तसेच, हृदयविकाराचा धोका कमी करू शकतात.

खजुराच्या बियापासून पावडर कशी बनवायची?

  • खजूर बिया
  • बेकिंग शीट
  • ओव्हन
  • ब्लेंडर किंवा कॉफी ग्राइंडर
  • हवाबंद कंटेनर

पद्धत

  • फळ खाल्ल्यानंतर खजुराच्या बिया साठवून ठेवा. बिया नीट धुवून घ्या
  • बिया धुतल्यानंतर बेकिंग शीटवर पसरवून काही दिवस हवेत कोरड्या होऊ द्या. बुरशीची वाढ थांबविण्यासाठी बिया पूर्णपणे वाळलेल्या असल्याची खात्री करा.
  • बिया भाजून घ्या. ओव्हनचे तापमान 200°C (390°F) वर सेट करा.
  • बिया एका बेकिंग शीटवर ठेवा सुमारे अर्धा तास बेक करा. भाजल्याने खमंग सुगंध तर येतोच पण कुरकुरीतपणा येऊन बिया पटकन वाटल्या जातात.
  • भाजलेल्या बिया पूर्णपणे थंड होण्यासाठी वेळ द्या.
  • बिया थंड झाल्यावर ब्लेंडर किंवा कॉफी ग्राइंडर वापरून बारीक पावडर करा.
  • खजुराच्या बियांची पावडर हवाबंद डब्यात थंड, कोरड्या जागी ठेवा

खजुराच्या बियांची पावडर कशी वापरायची?

  • स्मूदीजमध्ये: तुमच्या स्मूदीजमध्ये अतिरिक्त पोषण मिळवण्यासाठी, खजूरच्या बियांच्या पावडरचा एक चमचा मिसळा.
  • बेकिंग करताना: कुकीज, ब्रेड आणि मफिन्स सारख्या बेक केलेल्या पदार्थांच्या रेसिपीमध्ये पावडर घाला.
  • कॉफीचा पर्याय म्हणून: नटी-चवदार, कॅफीन-मुक्त पेय बनवण्यासाठी कॉफीप्रमाणेच खजुराची पावडर वापरू शकता.

हे ही वाचा<< आलं, हळदीसह ‘हे’ ४ मसाले एकत्रित पाण्यात मिसळून प्यायल्याने फॅट्स झटपट वितळतील? डाएटिशियनने सांगितले फायदे तोटे

खजुराच्या बियांचे सेवन करताना नेहमी लक्षात ठेवा..

आधी कमी प्रमाणापासून सुरुवात करा तुमचे शरीर कसा प्रतिसाद देतेय हे पहा, विशेषतः जर तुम्ही पावडरचा वापर रक्तातील साखरेचे नियमन करण्याच्या क्षमतेसाठी करत असाल तर, शरीरातील बदलांचे बारकाईने निरीक्षण करा. खजुराचे बियाणे संभाव्य फायदे देत असले तरी त्यांचे सेवन कमी प्रमाणात करणे महत्त्वाचे आहे, असे डॉ. तिवारी यांनी सांगितले. आपल्याला एखादी अंतर्निहित आरोग्य स्थिती असल्यास आधी आपल्या स्थितीशी परिचित असलेल्या तज्ज्ञांशी आवर्जून चर्चा करावी.

Story img Loader