सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर इन्स्टाग्रामवर निरोगी आहाराच्या मौल्यवान टिप्स शेअर करीत असतात; ज्यामुळे लोकांना बदलत्या ऋतूंसाठी त्यांचे शरीर तयार करण्यास मदत होते. नुकताच त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे; ज्यात नवरात्रीमध्ये काही आरोग्यदायी खाद्यपदार्थ खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हे पदार्थ आतड्यांचे आरोग्य सुधारतात आणि शरीराला हंगामी संक्रमणांमध्येदेखील आराम देतात.
व्हिडीओमध्ये दिवेकर यांनी सांगितले की, नवरात्रीसाठी ‘तीन विशेष पदार्थ’ सुचवले आहेत जसे की, कच्च्या केळ्यांचे वेफर्स, खारीक (कोरडे खजूर) आणि बदाम व काजूच्या पुरी, हे सर्व तुमच्या आहारात समाविष्ट करणे सोपे आहे. भारतात कच्च्या केळ्यांच्या वेफर्समध्येही खूप विविधता आहे.”
त्यानंतर त्यांनी खारीक खाण्याचे फायदे सांगितले. “त्यात फायबर, लोह आहे आणि चांगली चव आहे. विशेषत: तुम्हाला साखर किंवा गोड खाण्याची इच्छा होत असेल, तर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात खारीक खाऊन करावी.”
मुलांसाठी खाद्यपदार्थ सुचवताना त्या म्हणाल्या, “मला वाटते की, आपल्यापैकी बरेच जण बदाम आणि काजू पुरी विसरले आहेत. बदाम, काजू किंवा पिस्ते यांसारखा काही सुका मेवा आणि साखर घालून या पुऱ्या बनवल्या जातात.
पण, नवरात्रीच्या काळात हे पदार्थ आहारात समाविष्ट केल्यावर ते किती प्रभावी ठरतात? नोंदणीकृत आहारतज्ज्ञ अनुश्री शर्मा या विषयावर मौल्यवान माहिती देतात.
हेही वाचा – Pune Video : पुण्यात नवरात्रीदरम्यान या ठिकाणी मिळतो २४ तास मोफत महाप्रसाद; एकदा हा व्हिडीओ पाहाच
कच्च्या केळीचे विशिष्ट आतड्यांसाठी आरोग्य फायदे (Specific gut health benefits of raw bananas)
शर्मा म्हणतात, “कच्ची केळी त्यांच्या पौष्टिक रचनेच्या बाबतीत पिकलेल्या केळ्यांपेक्षा लक्षणीयरीत्या भिन्न आहेत. त्यामध्ये जास्त प्रमाणात स्टार्च असते, जे पिकल्यावर साध्या कार्बोहायड्रेट्समध्ये रूपांतरित होते. या वाढलेल्या स्टार्चयुक्त घटकांमुळे पचन प्रक्रिया मंद होते. परिणामी कच्च्या केळ्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) कमी होतो. परिणामी ते आतड्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. कारण- स्टार्च आतड्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठता टाळते. त्याशिवाय कच्ची केळी चांगली प्रो-बायोटिक्स मानली जातात. जरी त्यांचे इतर फळांसह साम्य असले तरी फायबरचे प्रकार आणि जीआय (GI) बदलू शकतात. आतड्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी केवळ एकाच प्रकारावर अवलंबून न राहता, पेरू आणि नाशपती यांसारख्या विविध प्रकारच्या फळांचे सेवन करणे आवश्यक आहे.”
शर्मा यांनी सांगितले, “जेव्हा कच्च्या केळ्याच्या वेफर्सचा खाण्याचा विचार करता, तेव्हा ते तळलेले नाहीत, तर भाजलेले असावेत याची खात्री करा.”
शर्मा यांनी सांगितले की, “जेव्हा कच्च्या केळीच्या वेफर्सचा खाण्याचा विचार करता तेव्हा ते तळलेले नाही तर भाजलेले असावे याची खात्री करा.”
रक्तशर्करा नियंत्रण आणि पचनशक्ती सुधारण्यास खारीक उपयुक्त
दिवेकर यांच्याशी सहमती दर्शवीत शर्मा यांनी सांगितले की, खारीक हा आणखी एक पौष्टिक पर्याय विचारात घेण्यासारखा आहे. “ते नैसर्गिकरीत्या गोड आणि फायबरने समृद्ध आहेत. गोड काहीतरी हवे असणाऱ्यांसाठी तो एक उत्कृष्ट पर्याय ठरतो. त्यातील उच्च फायबर हा घटक केवळ परिपूर्णतेची भावनाच देत नाही, तर गोड खाण्याची लालसाही कमी करण्यास मदत करतो.”
हेही वाचा –जेव्हा आपल्याला खूप राग येतो तेव्हा शरीरावर कसा परिणाम होतात? तज्ज्ञांनी केला खुलासा
त्याशिवाय खारीकमधील फायबर, जीवनसत्त्वे व खनिजे हे घटक आतड्यांकरिता अनुकूल असतात. त्यामध्ये पॉलीफेनॉलदेखील असते, जे आतड्यांतील चांगले जीवाणू टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यामुळे पचनशक्ती चांगली वाढते आणि आतड्यांतील दाहकता प्रतिबंधित होते.
बदाम आणि काजू पुरी हे पदार्थ प्रौढ आणि मुलांसाठी महत्त्वपूर्ण पौष्टिक फायदे देऊ शकतात?
जेव्हा आरोग्यदायी नाश्त्याच्या पर्यायांचा विचार केला जातो, तेव्हा काजू पुरी किंवा बदाम पुरी हे मुलांसाठी चांगले पर्याय ठरू शकतात, जे चांगली चरबी आणि दुधामध्ये आढळणारी काही प्रथिने यांच्यामुळे कॅलरी आणि पौष्टिक फायदे मिळवून देतात. शर्मा सांगतात की, या बदाम आणि काजू पुरी तळलेले आहेत की भाजलेले हे लक्षात घेणेही महत्त्वाची गोष्ट आहे. त्या म्हणतात, “मी नेहमी तळलेल्या पुऱ्यांपेक्षा भाजलेल्या पुऱ्या खाण्याचा सल्ला देईन.”
हेही वाचा – रोज बडीशेप आणि ओव्याचे पाणी प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांनी केला खुलासा
प्रौढांसाठी, विशेषत: मधुमेह किंवा हृदयाच्या समस्या असलेल्यांनी तळलेल्या पुऱ्यांऐवजी भाजलेल्या पुऱ्या निवडणे अधिक फायदेशीर आहे. शर्मा शिफारस करताना सांगतात, “ज्या मुलांचे वजन जास्त आहे, त्यांनीही तळलेल्या पदार्थांचे पर्याय टाळावेत. इतर आरोग्यदायी नाश्त्यामध्ये मखाना (फॉक्स नट्स), कमी साखर असलेली मखाना खीर (पुडिंग), पॉपकॉर्न, गूळ घालून बनविलेले सुक्या मेव्याचे लाडू आणि सुक्या मेव्याची पंजिरी (गहू व नारळापासून बनविलेला गोड पदार्थ) यांचा समावेश होतो.“