Dhoom director Sanjay Gadhvi Heart Attack During Morning Walk: धूम चित्रपटाचे दिग्दर्शक संजय गढवी यांना मॉर्निंग वॉक दरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समजतेय. या घटनेनंतर सकाळच्या वेळी हृदयविकाराचा झटका येण्याची अधिक शक्यता असते का? असं नेमकं का घडतं, तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी व त्रास झाल्यास नेमका उपाय काय याविषयी अनेकांना प्रश्न पडले आहेत. आजवर झालेल्या काही अभ्यासांमध्ये असे आढळून आले आहे की पहाटे ४ ते सकाळी १० च्या दरम्यान हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. विशेषतः ज्यांना अगोदरच हृदयासंबधित विकार आहेत अशा मंडळींना याचा धोका अधिक असतो. त्यामुळेच आज आपण वरील नमूद केलेल्या व तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत.

सूर्योदयानंतर म्हणजेच्या दिवसाच्या पहिल्या प्रहरात शरीर दिवसभराच्या कामासाठी तयार होत असतं. यावेळी शरीरात एड्रेनालाईन आणि तत्सम हार्मोन्स सक्रिय असतात. कॉर्टिसॉल हा तणाव नियंत्रणाचा हार्मोन सुद्धा तुम्ही झोपेतून जागे झाल्यानंतर लगेचच उच्च पातळीवर पोहोचू शकतो. यामुळे रक्त घट्ट होण्यासह प्लेटलेट्स चिकट होऊन क्लस्टर (गुठळ्या) तयार होण्याची शक्यता असते. शिवाय याने मेंदू किंवा हृदयाच्या धमन्यांमधील अस्थिर प्लेक्स फुटतात. आता या अस्थिर प्लेक्स स्वतःहून समस्या निर्माण करू शकत नाहीत परंतु त्या रक्त प्रवाहात अडथळा आणू शकतात आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

Can 30 grams of protein within 30 minutes of waking help regulate cortisol and balance hormones
सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटांत ३० ग्रॅम प्रथिने खाल्ल्याने कॉर्टिसोलचे नियमन आणि हार्मोन्स संतुलन होईल का? तज्ज्ञांनी केला खुलासा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
kama Hospital study shows increased diabetes prevalence in pregnant women due to changing lifestyles
गर्भधारणेच्या वेळी महिलांना मधुमेहाचा धोका
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
lead in turmeric FSSAI
तुमच्या आहारातील हळद विषारी आहे का? संशोधनात हळदीत आढळून आली ‘या’ हानिकारक धातूची भेसळ

बदलत्या हवामानामुळे सकाळचे तापमान सध्या कमी असते. तेव्हा शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी धमन्या संकुचित होतात. परिणामी हृदयाला जोरात पंप करावा लागतो, रक्तदाब वाढतो ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. तसेच REM (रॅपिड आय मूव्हमेंट स्लीप) दरम्यान, जो सहसा तुमच्या झोपेच्या चक्राचा शेवटचा टप्पा असतो, हृदय गती अनियमित होते, रक्तदाब वाढतो आणि श्वासोच्छवासाचा वेग वाढतो, यामुळे प्लेक फुटू शकतो.

शरीराची सर्कॅडियन प्रणाली, किंवा ज्याला आपण बॉडी क्लॉक (शरीराचे चक्र) म्हणतो यानुसार शरीर दिवसभर जागरण आणि थकवा नियंत्रित करते. परिणामी तुमच्या मेंदूतील काही रसायने आणि तुमच्या रक्तातील पेशींमध्ये वाढ आणि घट होते. सकाळी ६.३० च्या सुमारास, सर्कॅडियन प्रणाली PAI-1 प्रोटीन पेशींची वाढीव मात्रा पाठवते जे रक्ताच्या गुठळ्या तुटण्यापासून प्रतिबंधित करते. रक्तातील PAI-1 पेशी जितक्या जास्त असतील तितके रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका जास्त असतो ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो.

लंडनच्या क्वीन मेरी युनिव्हर्सिटीने केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग असलेल्या रुग्णांच्या रक्तात सकाळच्या वेळी संरक्षणात्मक घटकांची पातळी कमी असते. यामुळे रक्त गोठणे आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढू शकतो.

तुम्ही काय काळजी घ्यायला हवी?

१) जर तुम्हीहायपरटेन्सिव्ह असाल, तर पहाटे रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच तज्ज्ञांनी शिफारस केलेली औषधे दिवसाच्या पहिल्या प्रहरात घ्यायला हवीत.

२) हृदयाच्या समस्या असलेल्या लोकांनी अत्यंत थंडीत बाहेर पडू नये. निदान काही प्रमाणात सूर्यप्रकाश असल्यावरच व्यायामासाठी बाहेर पडावे.

३) व्यायामाच्या आधी दोन ते तीन ग्लास पाणी प्या. कोणत्याही कठोर व्यायाम सत्रापूर्वी नेहमी वॉर्म अप करा. चालण्यासाठी पाच मिनिटे काढा, तुमचे हात आणि पाय फिरवा आणि स्ट्रेच करा. एकदा शरीर तयार झाले की मग कठीण व्यायाम करा.

हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे व जोखीम घटक

अनेक रुग्ण छातीत अचानक दुखत असल्याची तक्रार करतात. तुम्हाला अनियमित श्वासोच्छवास किंवा छातीत दुखत असल्यास सर्वात आधी कोणाची तरी मदत घ्या. एकटे असल्यास आपत्कालीन सेवांना कळवा. गाडी चालवू नका. एखाद्या सपाट जागेवर बसा किंवा झोपा, श्वास घ्या आणि मदत येण्याची प्रतीक्षा करा. शक्य असल्यास डिस्प्रिन घ्या.

हे ही वाचा<< Sad Eating: रागात, दुःखात, तणावात पोट दुखेपर्यंत खाण्याची सवय लागलीये? ‘हे’ ३ पदार्थ व ‘या’ ३ सवयी ठरू शकतात वरदान 

सोमवारी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते?

सोमवारी सकाळी लवकर हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते. मँचेस्टरमधील ब्रिटीश कार्डिओव्हस्कुलर सोसायटी (BCS) परिषदेत सादर केलेल्या अभ्यासात संशोधकांना असे आढळले की कामकाजाच्या आठवड्याच्या सुरूवातीस STEMI हृदयविकाराच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे, ज्याचा दर सोमवारी सर्वाधिक १३ टक्के आहे. आयर्लंड बेटावरील रुग्णालयांमध्ये (आयर्लंड प्रजासत्ताक आणि उत्तर आयर्लंडसह) १०, ५२८ रुग्णांच्या नोंदींमध्ये असे आढळून आले की हृदयविकाराचा सर्वात गंभीर प्रकार, ST-सेगमेंट एलिव्हेशन मायोकार्डियल इन्फेक्शन (STEMI) म्हणून ओळखला जातो. यामध्ये तुमच्या हृदयाला रक्तपुरवठा करणारी एक प्रमुख कोरोनरी धमनी पूर्णपणे ब्लॉक होते. STEMI प्राणघातक ठरू शकतात.