Yoga can reduce diabetes risk: सध्या भारतात मधुमेहाचे प्रमाण खूप वाढले आहे. २०२३ च्या आकडेवारीनुसार, भारतात सुमारे ७.७ कोटी (७७ दशलक्ष) लोकांना मधुमेह आहे आणि हा आकडा २०४५ पर्यंत १३४ दशलक्षापर्यंत वाढण्याची शक्यता आहे; तर सुमारे २.५ कोटी लोक मधुमेहपूर्व अवस्थेत आहेत. म्हणजेच त्यांना मधुमेह होण्याची शक्यता आहे. भविष्यात मधुमेह होण्याच्या जोखमीला प्री-डायबिटीज म्हटलं जातं. परंतु, आता प्री-डायबिटीज असलेल्या लोकांमध्ये मधुमेहाचा धोका कमी होण्याचा एक उत्तम पर्याय सापडला आहे.

भारतातील पाच केंद्रांमधून नुकत्याच प्रकाशित झालेल्या अभ्यासात दिसून आले आहे की, दररोज ४० मिनिटांच्या योगामुळे तुमचा मधुमेह होण्याचा धोका जवळपास ४० टक्क्यांनी कमी होऊ शकतो. जीवनशैलीतील बदल किंवा केवळ औषधांपेक्षा योगा चांगले परिणाम दर्शवतो.

Is Dandelion Tea Really Beneficial
कंबरदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी डँडेलियन चहा खरंच फायदेशीर आहे का? वाचा, तज्ज्ञांचे मत…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
I don’t believe in work-life balance Narayana Murthy stands firm on 70-hour workweek
“माझा वर्क-लाइफ बॅलन्सवर विश्वास नाही”; आठवड्यातील ७० तास काम करण्याच्या मतावर नारायण मूर्ती अजूनही ठाम
Can 30 grams of protein within 30 minutes of waking help regulate cortisol and balance hormones
सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटांत ३० ग्रॅम प्रथिने खाल्ल्याने कॉर्टिसोलचे नियमन आणि हार्मोन्स संतुलन होईल का? तज्ज्ञांनी केला खुलासा
How exercising for 2-3 days may help reduce risk of Alzheimer’s Alzheimer Disease exercise
व्यायामामुळे ‘अल्झायमर’चा धोका कमी होऊ शकतो; डॉक्टरांनी सांगितले व्यायाम प्रकार
Yoga Guru Sharath Jois
Yoga Guru Sharath Jois : मॅडोनाचे योग गुरू शरथ जोइस यांचं ट्रेकिंग करताना ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन
vidya balan reveals her weight loss struggle in one interview
विद्या बालनने कसं घटवलं वजन? अनुभव सांगत म्हणाली, “मी जितका व्यायाम केला तितकी जास्त जाड…”

हेही वाचा… सकाळी भिजवलेले बदाम खातोस का? रोहित शर्माच्या विसरभोळेपणावर विराट कोहलीचा मजेशीर प्रश्न; भिजवलेले बदाम खाण्याचे आरोग्याला होतात ‘हे’ फायदे

या अभ्यासात असे शोधण्यात आले की, योगा केल्याने प्री-डायबिटीज असलेल्या लोकांमध्ये टाइप २ मधुमेहाची वाढ थांबवता येईल का? प्री-डायबिटीज म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्य रक्तातील ग्लुकोज पातळीपेक्षा जास्त असते, पण ते मधुमेह मानण्यात येत नाही. देशात अंदाजे १०१ दशलक्ष लोक मधुमेहासह जगत आहेत, आणखी १३६ दशलक्ष लोक प्री-डायबिटीजसह जगत आहेत, त्यापैकी बहुतेकांनी जर जीवनशैलीत लक्षणीय बदल केला नाही तर त्यांना मधुमेह होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा… उर्फीने दात पांढरेशुभ्र करण्यासाठी वापरला टॉयलेट क्लिनर, तर मुरूमांसाठी वापरलं हे औषध; तज्ज्ञांनी सांगितले याचे दुष्परिणाम

या अभ्यासाचे पहिले लेखक आणि दिल्लीच्या GTB हॉस्पिटलमधील एंडोक्राइनोलॉजी विभागातील प्राध्यापक डॉ. एसव्ही मधु म्हणाले, “आम्ही हे दाखवून देऊ शकलो की केवळ जीवनशैलीतील काही बदलांच्या तुलनेत योगा हा टाइप २ मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी अधिक प्रभावी आहे. किंबहुना, इतर अभ्यासांमध्ये दर्शविल्याप्रमाणे जीवनशैलीतील बदल आणि औषधांच्या तुलनेत योगामुळे फायदा जास्त होतो. तसेच योगामुळे यापेक्षाही जास्त फायदे होतात असे मानले जाते. कारण योगा दीर्घकालीन मानसिक ताण कमी करू शकतो. तसेच तो इम्यून प्रणालीवर प्रभाव टाकतो, ज्यामुळे दाह (inflammation) आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होतो आणि त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो.”

निरोगी राहण्याचा सल्ला काय आहे?

डॉ. एसव्ही मधु म्हणतात की, ज्यांना मधुमेह होण्याचा धोका जास्त आहे – जसे की, मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास असलेले लोक किंवा जे लठ्ठ आहेत त्यांना योगाचे फायदे होण्याची शक्यता आहे. “मधुमेहापासून दूर राहण्यासाठी दररोज ४० मिनिटे योगा करावा असे सुचवले जाते,” असंही ते म्हणाले.

योगाचा फायदा मधुमेह असलेल्या लोकांना होईल का?

सध्याच्या अभ्यासात ज्यांना आधीच मधुमेह आहे, त्यांच्यावर योगाचा प्रभाव दिसून येत नसला तरी डॉ. मधु म्हणतात की, यामुळे त्यांनाही मदत होण्याची शक्यता आहे. “मधुमेहावरील योगाच्या प्रभावावरील इतर अल्पकालीन अभ्यासांमध्ये, रक्तातील ग्लुकोजच्या पातळीत घट झाल्याचे दिसून आले आहे, त्यामुळे योगा केल्याने मधुमेह असलेल्या लोकांना त्यांची साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते,” असे ते म्हणतात.

अभ्यास महत्त्वाचा का आहे?

योगाच्या बाजूने हा अभ्यास महत्त्वाचा पुरावा असल्याचे डॉ. मधु स्पष्ट करतात. “योगासह जीवनशैलीतील केलेला बदल आणि फक्त जीवनशैलीतील बदल या दोन्ही गटांतील जवळपास ५०० सहभागींसह योग्य चाचणी करून केलेला आमचा अभ्यास आहे. अभ्यासातील सहभागींचाही तीन वर्षांच्या कालावधीसाठी पाठपुरावा करण्यात आला आहे.” त्यांनी हेही स्पष्ट केले की, मागील अभ्यासातील पुराव्यांनुसार रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी जीवनशैलीतील बदल आणि औषधांच्या वापरामुळे हा धोका २८ ते ३२ टक्क्यांदरम्यान कमी होतो.