Mistakes While Eating Fruits Can Boost Blood Sugar: डायबिटीज एक असा क्रोनिक आजार आहे ज्याने जगभरात ४०० मिलियनहुन अधिक लोक त्रस्त आहेत. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या एका अभ्यासात समोर आलेल्या माहितीनुसार, डायबिटीजच्या रुग्णांमध्ये पुरुषांची संख्या (2.3%) ही महिलांच्या तुलनेत (1.4%) अधिक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार जगभरात २०२५ पर्यंत डायबिटीजच्या रुग्णांमध्ये १७० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास असेल किंवा तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीत खूप चढ-उतार होत असेल तर खालील माहिती आपल्यासाठी जाणून घेणे गरजेचे आहे.

विविध आजारांपासून लांब राहण्यासाठी फळे खाण्याचा सल्ला दिला जातो पण तुम्हाला माहीत आहे का, चुकीच्या पद्धतीने फळे खाल्ल्यास डायबिटीजचा धोका वाढू शकतो. या चुकी कोणत्या व त्यापासून कसे लांब राहता येईल हे जाणून घेऊया.

१) डॉ. डिंपल जांगडा यांच्या माहितीनुसार, फळांमध्ये फ्रुक्टोज असते, ही एक अशी नैसर्गिक साखर आहे जी तुमच्या रक्तप्रवाहात जलद शोषली जाऊ शकते. जेव्हा आपण केवळ फलाहार करता तेव्हा फ्रुक्टोजचे प्रमाण वाढू शकते. म्हणूनच ज्यांना मधुमेह आहे, किंवा तसा कौटुंबिक इतिहास आहे, म्हणूनच अशा लोकांनी फळे खाताना काजू, बदाम किंवा सुक्या मेव्यासह खावी. सुका मेवा सुद्धा फळांच्याच गटातील असला तरी त्यात असे ऍसिड व सूक्ष्मजीव एंजाइम असतात जे पचायला जास्त वेळ घेतात व यामुळे फ्रुक्टोजचे शोषण कमी होते.

२) फळे खाताना अनेकजण फळांचा रस घेण्याचा पर्याय निवडतात. मात्र फळांचे रस द्रव रूपात असल्याने त्वरीत पोटातून प्रक्रिया होऊन मूत्रावाटे बाहेर पडतात. यामुळे तुमच्या शरीराला फायबर, पोषक आणि खनिजे शोषून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. याउलट कच्ची फळे खाल्ल्याने आतड्यातील उत्तम बॅक्टेरिया वाढवून अन्य पोषणाच्या शोषणास पुरेसा वेळ मिळतो.

हे ही वाचा<< ‘या’ ब्रेडने वजन होईल कमी, अभ्यासात समोर आली माहिती; पांढरा ब्राऊनचा वाद सोडा स्वस्त पर्याय पाहा

३) पेरू, आंबा आणि अननस अशी फळे नैसर्गिक प्रोबायोटिक्स आहेत. ही फळे कार्ब्स, जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिने यांचा समृद्ध स्रोत म्हणून काम करतात. पण ही फळे जर आपण ओट्स किंवा धान्यासह खाल्ली तर त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे शरीरातील पित्त वाढू शकते.

Story img Loader