Foods For a Diabetic: विविध वयोगटांतील लोकांमध्ये मधुमेह ही एक मोठी समस्या बनत आहे. हा जीवनशैलीचा आजार आहे; जो निष्काळजीपणामुळे बळावतो. मधुमेह होण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे सध्याची बिघडलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव होय. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी मधुमेही व्यक्तींना त्यांच्या आहारावर विशेष लक्ष देत, आरोग्याची काळजी घ्यावी लागते. खाण्या-पिण्याच्या योग्य सवयी आणि योग्य जीवनशैली यांचे पालन करूनच तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवू शकता. आता प्रश्न असा आहे की, मधुमेही रुग्णांनी काय खावे? उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या आहार तज्ज्ञ एकता सिंघवाल यांनी कोणत्या पदार्थांचे सेवन केल्याने मधुमेहाच्या रुग्णांना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते. याविषयी माहिती दिली असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मधुमेहींनी आहारात आवर्जून समावेश करावयाचे पदार्थ खालीलप्रमाणे

१. पालेभाज्या

कोणत्याही रोगात डॉक्टर हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला देतात आणि मधुमेहग्रस्तांसाठी तर हिरव्या पालेभाज्या म्हणजे रामबाण उपाय आहे. कारण- पालेभाज्यांमध्ये फायबर असते. पालक, मेथी इत्यादी पालेभाज्यांमध्ये जीवनसत्त्वे व खनिजे आढळतात. तसेच नियमित जेवणात सॅलडचाही समावेश करावा. हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅलरीज आढळतात. त्यामध्ये कार्बोहायड्रेट्सदेखील कमी प्रमाणात असतात. आहारातील अशा या घटकांमुळे आपल्या रक्तातील साखर नियंत्रित राहते.

(हे ही वाचा : ‘या’ बियांच्या सेवनाने झपाट्याने वजन होईल कमी? कधी व किती सेवन करावे समजून घ्या तज्ज्ञांकडून…)

२. बेरी

बेरी हे फळ नैसर्गिकरीत्या गोड असते. तसेच यात असणारे फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात. त्यामुळे हे फळ खाण्याचा सल्ला मधुमेहाच्या रुग्णांना दिला जातो. रोजच्या आहारात ब्ल्यूबेरीचा समावेश केल्यास कार्बोहायड्रेट्स मिळू शकतात. ब्ल्यूबेरी किंवा बेरीज नियमित खाल्ल्याने इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते.

३. सुका मेवा

बदाम, अक्रोड, पिस्ता या सुक्या मेव्याचे मधुमेहग्रस्तांनी रोज सेवन करावे. त्यामुळे भूक नियंत्रणात आणि शरीरातील साखरेचे प्रमाण संतुलित राहते. मधुमेहींसाठी अक्रोड फायदेशीर असल्याचे आढळले आहे. त्यांच्या आहारात प्रामुख्याने फळे, भाज्या, धान्ये, कडधान्ये आणि काजू इत्यादी वनस्पती-आधारित पदार्थांचा समावेश होतो. पण, मधुमेहींनी हे सर्व पदार्थ योग्य प्रमाणात घ्यावेत.

४. चिया बिया

मधुमेहाच्या रुग्णांसाठी चिया बिया खूप फायदेशीर आहेत. त्यामध्ये भरपूर फायबर आणि पाचक कर्बोदके असतात. हे घटक आरोग्यासाठी खूप चांगले आहेत. ते तुमच्या रक्तातील साखर वाढवत नाहीत. चिया बियांचे नियमित सेवन केल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होते.

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी रुग्णाला आपला आहार अत्यंत काटेकोर प्रमाणात ठेवावा लागतो. मधुमेहींसाठी आहार आणि पुरेसा व्यायाम आवश्यक असतो. म्हणून सांगितल्याप्रमाणे सुपरफूड्सचा आहारात समावेश करा आणि निरोगी राहा.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diabetes diet four superfoods that help you manage blood sugar pdb