Diabetes News : मधुमेहग्रस्तांना आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. वातावरणातील अति दमटपणामुळे अनेकदा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे कठीण जाते. उष्णता आणि हवेतील ओलावा यांमुळे जी आर्द्रता निर्माण होते, त्याचा थेट परिणाम आपल्या रक्तातील साखरेच्या पातळीवर होतो. ज्या लोकांना मधुमेह आहे, त्यांनी ही बाब समजून घेणे गरजेचे आहे की, दमटपणा त्यांच्या शरीरातील ग्लुकोजच्या पातळीवर कसा परिणाम करतो.

अति दमटपणा रक्तातील साखरेच्या पातळीवर कशा प्रकारे परिणाम करतो. विशेषत: मधुमेहींच्या आरोग्यावर त्याचा कसा परिणाम होतो? याबाबतची माहिती दिल्ली येथील सी. के. बिर्ला हॉस्पिटलच्या इंटर्नल मेडिसिनच्या संचालिका डॉ. मनीषा अरोरा यांनी दिली आहे.

Sugar factory workers warn of strike Government announces committee for wage hike Mumbai news
साखर कारखाना कामगारांचा संपाचा इशारा; वेतनवाढीसाठी सरकारकडून समितीची घोषणा
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
mercury in nashik drops 9 4 degrees celsius
नाशिकमध्ये थंडीचे पुनरागमन; पारा ९.४ अंशावर
What happens to the body when you take cold showers in winter? Cold Water Bath Benefits
हिवाळ्यात थंड पाण्यानं अंघोळ केल्यास शरीरावर काय परिणाम होतात? चांगलं की वाईट, जाणून घ्या
Cold weather Thane district, Thane district temperature,
ठाणे जिल्हा पुन्हा गारठला, जिल्ह्यातील तापमान सरासरी १२ अंश सेल्सिअस
After Cyclone Fengal Mumbais weather turned cold with temperatures dropping since Sunday
मुंबईत प्रथमच किमान तापमान २० अंशाखाली, सांताक्रूझमध्ये १३.७ नीचांकी तापमानाची नोंद
Benefits of eating tup chapati
पोळीला तूप, साखर लावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे; पण खाण्याची योग्य वेळ कोणती?
Moong dal health benefits
दररोज भिजवलेले मूग खाणं आरोग्यासाठी घातक? मग तज्ज्ञ काय सांगतात…

अति दमटपणामुळे तणाव वाढतो आणि त्यामुळे शरीरात कॉर्टिसोल हार्मोनची पातळी वाढते. कॉर्टिसोल हा ‘स्ट्रेस हार्मोन’ आहे; ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते. कॉर्टिसोल हार्मोनमुळे मधुमेही रुग्णाच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होते; ज्याला हायपोग्लायसेमिया म्हणतात.

हेही वाचा : रोज सकाळी रिकाम्यापोटी तुळशीच्या पानांचे सेवन केल्यास शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांनी केला खुलासा

अति दमटपणामुळे शारीरिक थकवा जाणवतो आणि त्यामुळे तुम्हाला शरीराची हालचाल करण्याची इच्छा होत नाही आणि एका जागी बसून राहावेसे वाटते. कमी शारीरिक हालचालींमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. हे अजूनही सिद्ध झालेले नाही; पण काही पुरावे सांगतात की, दमट वातावरणामुळे शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. त्यामुळे डिहायड्रेनशची समस्या निर्माण होते. जेव्हा शरीरातील पेशींना रक्तातील ग्लुकोज शोषून घेण्यास अडचण जाणवते तेव्हा शरीराला आणखी इन्सुलिनची आवश्यकता भासते.

दमटपणामुळे जेव्हा तुम्ही औषधी घेत नाही तेव्हा त्याचा थेट परिणाम रक्तातील साखर नियंत्रणेवर होतो आणि रक्तातील साखर अचानक वाढते.

दमट वातावरणात मधुमेहाच्या रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी?

आरोग्यतज्ज्ञाचा नियमित सल्ला आवश्यक : दमटपणामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे खूप कठीण जाते. पण, रक्तातील साखरेच्या पातळीविषयी आपल्या आरोग्यतज्ज्ञाला नियमित माहिती देणे आणि त्याविषयी आवश्यक सल्ला घेणे गरजेचे आहे.

संतुलित आहार : चांगला संतुलित आहार ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. संतुलित आहार हा आपली रक्ताची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतो. विशेषत: जेव्हा वातावरणात बदल जाणवतो, तेव्हा पोषक आहार फायदेशीर ठरतो.

भरपूर पाणी पिण्याची गरज : भरपूर पाणी पिणे खूप जास्त गरजेचे आहे. त्यामुळे डिहायड्रेशनसारखी समस्या दूर होते आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवता येऊन, रक्तातील ग्लुकोज शोषून घेणे पेशींना सोपे जाते.

निवासस्थळी थंडावा महत्त्वाचा : दमट वातावरणात थंड ठिकाणी राहा. एसी, कूलर किंवा पंख्याचा वापर करा. त्यामुळे तणाव कमी होतो. त्याचबरोबर खूप जास्त एसीचा वापर करू नका. काही ठराविक कालवधीनंतर ब्रेक घ्या.

णाव कमी करण्यासाठी योगधारणा : तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी योगा, ध्यान किंवा दीर्घ श्वास घेणे इत्यादी व्यायाम करा. त्यामुळे शरीरातील कॉर्टिसोल हार्मोनची पातळी कमी होईल आणि तुम्हाला तणाव जाणवणार नाही.

Story img Loader