तुम्हीही रोज भात खात असाल तर काळजी घ्यावी. याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. बऱ्याच लोकांना याची जाणीव आहे, परंतु तरीही बहुतेक भारतीय घरांमध्ये पांढरा तांदूळ वापरला जातो. भारतातील बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की त्यांचे जेवण भाताशिवाय अपूर्ण आहे. मात्र, पांढरा तांदूळ अस्वास्थ्यकर असल्याचेही अनेक संशोधनांमध्ये सांगण्यात आले आहे. खर तर, पांढऱ्या तांदळावर प्रक्रिया केल्यामुळे त्यातील सर्व पोषक तत्वे निघून जातात. त्यामुळे या भातामध्ये फक्त चव किंवा चरबी बाकी राहते. जे वजन वाढवण्यास कारणीभूत ठरते.

आपण सर्व सामान्यतः पांढरा भात खातो. युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ एग्रीकल्चरच्या मते, तांदळात लोह, व्हिटॅमिन बी १, व्हिटॅमिन बी ३ आणि फॉलिक ऍसिड असते. त्यामुळे एक कप पांढऱ्या तांदळात १६० कॅलरीज असतात.

Farmers demand geographical classification for organic vaal in Chirner uran news
उरण: चिरनेरच्या सेंद्रिय गोड वालांना हवे भौगोलिक मानांकन
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
सोनु सुदने चपाती खाणे केले बंद! चपाती खाणे पूर्णपणे बंद केल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल?
What happens to your body if you eat raw onions every day
तुम्ही रोज कच्चा कांदा खाल्ला तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…
sunlight
हिवाळ्यात एक-दोन आठवडे आणि एक महिना सूर्यप्रकाशापासून दूर राहिल्यास काय होईल? तज्ज्ञांनी केला खुलासा…
chaturang article
स्थलांतरातून बहरलेली खाद्यसंस्कृती
tribal students protest nashik
नाशिक : निकृष्ट भोजन निषेधार्थ आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन
ating eggs with cholesterol
दररोज अंडी खाल्ल्यास शरीरावर नेमका काय परिणाम होतो? बॅड कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणात होते वाढ? वाचा डॉक्टर काय सांगतात

पौष्टिक कमतरता असलेली लोक

जास्त भात खाल्ल्याने तुमच्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता होऊ शकते. तुमच्या आरोग्याची स्थिती आणि तुमच्या वयानुसार, तुमच्या आहारात प्रामुख्याने विविध फळे, भाज्या आणि प्रथिनांचा समावेश असला पाहिजे. असे मानले जाते की पांढऱ्या भाताऐवजी तुम्ही ब्राऊन राइस खाऊ शकता. अलीकडे ब्राऊन राईस खाण्याची खूप क्रेझ आहे. पण एका ब्राउन राईसमध्ये पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत फक्त १.५ ग्रॅम जास्त फायबर असते. हा भात पचायला तुलनेने सोपा असल्याने तो वारंवार खाण्याची शिफारस केली जाते.

( हे ही वाचा: खराब कोलेस्ट्रॉल लघवीद्वारे सहज काढून टाकतील ‘या’ तीन भाज्या, जाणून घ्या कसे)

हृदयरोग्यांनी भात खाऊ नये

तुमच्या शरीराला आवश्यक पोषक तत्वे तांदळात मिळत नाहीत, त्यामुळे एखाद्या व्यक्तीने दररोज भात खाल्ल्यास सावधगिरी बाळगली पाहिजे. जानेवारी २०१५ मध्ये अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, जास्त भात खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अनेक पटीने वाढू शकते. त्यामुळे ज्यांना हृदयाशी संबंधित काही तक्रारी किंवा समस्या असतील त्यांनी पांढऱ्या तांदळाचे जास्त सेवन टाळावे. अन्यथा तुम्हाला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात.

मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी भाताचे सेवन करू नये

१५ मार्च २०१२ रोजी ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार पांढऱ्या तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो, याचा अर्थ रक्तातील साखरेमध्ये वाढ होऊ शकते. मागील संशोधनात उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या पदार्थांचा टाईप २ मधुमेहाचा धोका वाढण्याशी जोडला गेला आहे. त्यामुळे पांढरा भात खाल्ल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे ताबडतोब आहारातून पांढरा तांदूळ काढून टाकण्याचा प्रयत्न करा. यासोबतच काही लोकांना मेटाबॉलिक सिंड्रोमची समस्या असू शकते, ज्याला फक्त पांढरा तांदूळ जबाबदार मानला जाऊ शकतो. म्हणूनच महिन्यातून एकदाच पांढरा भात खाण्याचा प्रयत्न करा. याच्या मदतीने तुम्ही मेटाबॉलिज्मची समस्या टाळू शकता.

Story img Loader