मधुमेह हा एक सामान्य आजार बनत चालला आहे. या आजारावर अद्याप कोणताही इलाज सापडलेला नाही. पण काही आयुर्वेदिक आणि घरगुती उपायांनी रक्तातील साखर मात्र नियंत्रित ठेवता येते. मधुमेह असलेल्या लोकांच्या आहारावर अनेक निर्बंध आहेत. अशा परिस्थितीत माणसाला आपला आहार अत्यंत काळजीपूर्वक निवडावा लागतो. त्याच वेळी, काही लोकांचा असा विश्वास आहे की मधुमेहींनी लसणाचे नियमित सेवन केले पाहिजे. याने रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.

डॉ. पाखी शर्मा, माजी जनरल फिजिशियन, विमलया हॉस्पिटल, बेंगळुरू यांच्याकडून, जाणून घेऊया मधुमेहींसाठी लसूण खाणे सुरक्षित आहे का? मधुमेहाच्या रुग्णांनी किती प्रमाणात लसूण खावे?

Health Special What exactly is insulin
Health Special : इन्सुलिनच्या जगात
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
eating egg whites is not good for you
Eating Egg Whites Healthy Or Not : फक्त अंड्यातील पांढरा भाग खाणं शरीरासाठी चांगलं की वाईट? तज्ज्ञांनी मांडली मते…
tomato ketchup adulteration
टोमॅटो सॉसमधील भेसळ कशी ओळखाल? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
coriander juice beneficial for weight loss
Coriander Juice : खरंच कोथिंबिरीचा रस प्यायल्याने वजन कमी होते? जाणून घ्या, हा रस आरोग्यासाठी कसा फायदेशीर?
central cabinet, minimum selling price of sugar
साखरेची किमान विक्री किंमत वाढीचा प्रस्ताव लांबणीवर, केंद्रीय मंत्रिगटाचा निर्णय; साखर उद्योगात नाराजी
Methi Sprouts Benefits
वजन नियंत्रणात ठेवण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत मोड आलेली मेथी आहे फायदेशीर; किती प्रमाणात खावी? तज्ज्ञांचे मत घ्या जाणून
delicious oatmeal poha
ओट्स खायचा कंटाळा येतोय? मग ट्राय करा ओट्सचे चविष्ट पोहे

पोषक तत्वांनी युक्त लसूण

डॉ.पाखी यांच्या मते लसणामध्ये कार्बोहायड्रेट, फॅट, प्रथिने, जीवनसत्व आणि खनिजे, व्हिटॅमिन बी1, व्हिटॅमिन बी2, व्हिटॅमिन बी3, व्हिटॅमिन बी5, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन बी9, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, मॅंगनीज, फॉस्फरस, पोटॅशियम सोडियम, सेलेनियम यांसारखे पोषक घटक आढळतात. लसणामध्ये मजबूत अँटीबॅक्टीरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. झिंक, फॉस्फरस, सेलेनियम, कॅल्शियम आणि लोह यांसारख्या अनेक खनिजांनेही ते समृद्ध आहे. त्यात ‘अॅलिसिन’ नावाचे उत्कृष्ट गंधकयुक्त संयुग देखील असते, जे तिखट चव आणि वासासाठी जबाबदार असते.

मधुमेहासाठी लसणाचे फायदे

डॉ शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की लसूण केवळ रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यातच नव्हे तर टाइप 2 मधुमेह रोखण्यात देखील सक्रिय भूमिका बजावते. लसणात भरपूर झिंक आणि नैसर्गिक अँटिऑक्सिडंट असल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते. कार्बोहायड्रेट्स त्वरित मेटाबॉलिज़्म वाढवतात. कार्बोहायड्रेट थेट रक्तातील साखरेमध्ये तीव्र वाढ करतात आणि लसणाचे सेवन ही साखर नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे. अमिनो अॅसिड होमोसिस्टीन नावाचे संयुग मधुमेहासाठी धोकादायक घटक आहे. लसणाचे दीर्घकाळ सेवन केल्याने शरीरातील हे संयुगे कमी होतात.

मधुमेहामध्ये लसूण खाण्याचा उत्तम मार्ग

डॉ. शर्मा यांनी सांगितले की, भाजी, चपात्या, सूप, सॉस, लोणचे आणि गार्निश बनवण्यासाठी लसणाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. जगभरातील पोषणतज्ञांना संधिवात, क्षयरोग, दमा, उच्च कोलेस्ट्रॉल आणि इतर आजारांवर उपचार करण्यासाठी लसूण खूप प्रभावी असल्याचे आढळले आहे. डॉ. पाखी म्हणतात की, लसणात आढळणारे एलिसिन आणि इतर संयुगे रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढवतात.

( हे ही वाचा: Colon Cancer: प्रसिद्ध फुटबॉलपटू पेले यांचे कोलन कॅन्सरमुळे निधन; जाणून घ्या ‘या’ आजाराची लक्षणे आणि योग्य उपचार)

लसूण कधी खावे

डॉ शर्मा यांच्या मते, काही आयुर्वेदिक उपायांनुसार, रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाल्ल्याने यकृत आणि रक्तवाहिन्या स्वच्छ होतात. मात्र, आतापर्यंतच्या कोणत्याही संशोधनात याची पुष्टी झालेली नाही.

लसणाच्या अतिसेवनाचे धोके

डॉ. पाखी यांच्या मते, लसणात अँटिऑक्सिडंट, खनिजे आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात; त्यामुळे एखाद्या व्यक्तीला जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी अल्प प्रमाणातही पुरेसे आहे. लसणाचे जास्त सेवन केल्याने कधीकधी गॅस, मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात. कच्च्या लसूण सेवनाच्या बाबतीत हे परिणाम जास्त असतात. लसूण खाण्याचे सर्वात सामान्य दुष्परिणाम म्हणजे श्वासाची दुर्गंधी आणि शरीराची दुर्गंधी.