भारतासह जगभरात मधुमेह असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मधुमेह असणाऱ्यांना आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण कोणत्याही कारणामुळे त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित होणे त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते. यासाठी त्यांना आहाराबाबतही योग्य काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. काही फळं खाल्ल्याने नैसर्गिकरित्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. मधुमेह असणाऱ्यांनी अशी फळं खाणे टाळावे. कोणती आहेत अशी फळं जाणून घ्या.

आणखी वाचा: डायबिटीज रुग्णांसाठी ‘हा’ सुका मेवा ठरतो विषासमान? काजू बदाम खाल्ल्याने शरीरात होतात ‘हे’ बदल

मधुमेह असणाऱ्यांनी पुढील फळं खाणे टाळावे:

केळी
केळ्यांमध्ये कर्बोदके (कार्ब्स) व फायबर आढळते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते.

द्राक्ष
द्राक्षांमध्ये नैसर्गिक गोडवा असतो. तसेच यामधील साखर रक्तात लगेच मिसळली जाते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते.

संत्री
संत्र्यामध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात आढळते, पण मधुमेहाच्या रुग्णांनी हे फळ टाळावे कारण यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. जर संत्री खायची असतील तर हिरवी संत्री निवडावी, ज्यामध्ये आंबटपणा जास्त असतो.

आणखी वाचा: आता मधुमेहापासून होणार कायमची सुटका? बाबा रामदेव यांनी सांगितलेला असरदार उपाय जाणून घ्या

चिकू
चिकूदेखील अत्यंत गोड फळ आहे. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे अशा गोड फळांऐवजी डाळिंब, पपई, पेरू ही फळं मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी खावी.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

Story img Loader