Cloves For Sugar Control: डायबिटीज असल्यास तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला दिला जातो. आपल्या नियमित आहारात पण असे काही पदार्थ असतात ज्यांच्यामुळे स्वादुपिंडात इन्सुलीनचे उत्पादन होण्याचा वेग मंदावतो. परिणामी ब्लड शुगर एकाएकी बूस्ट होण्याचा धोका असतो. जर डायबिटीजवर वेळीच नियंत्रण ठेवले नाही तर आपले हृदय, मेंदू, डोळे, किडनी, असे सर्वच अवयव धोक्यात येतात. तज्ज्ञांच्या माहितीनुसार डायबिटीजच्या रुग्णांसाठी त्यांच्या किचनमधील हा एक मसाल्याचा पदार्थ चमत्कारिक ठरू शकतो. आहारात या मसाल्याचा समावेश केल्यास डायबिटीज नियंत्रण सोप्पे होऊ शकते. हा जादुई मसाला कोणता व त्याचे नेमके काय फायदे आहेत? तसेच नियमित आहारात आपण त्यांचा कसा समावेश करू शकतो हे आता आपण पाहुयात..

एम्स रुग्णालयाचे माजी सल्लागार व साओल हार्ट सेंटरचे संस्थापक डॉ. बिमल झांजेर सांगतात की, डायबिटीजच्या रुग्णांसाठी लवंगाचे अगदीच फायदेशीर ठरू शकते. या मसाल्याचे ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. तसेच यामुळे ब्लड शुगरही नियंत्रणात राहू शकते.

Can 30 grams of protein within 30 minutes of waking help regulate cortisol and balance hormones
सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटांत ३० ग्रॅम प्रथिने खाल्ल्याने कॉर्टिसोलचे नियमन आणि हार्मोन्स संतुलन होईल का? तज्ज्ञांनी केला खुलासा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
kama Hospital study shows increased diabetes prevalence in pregnant women due to changing lifestyles
गर्भधारणेच्या वेळी महिलांना मधुमेहाचा धोका
Issues of sugar factory in assembly elections is troubling candidate
विधानसभा निवडणुकीत साखर कारखानदारीचे मुद्दे पेटले!
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
lead in turmeric FSSAI
तुमच्या आहारातील हळद विषारी आहे का? संशोधनात हळदीत आढळून आली ‘या’ हानिकारक धातूची भेसळ

डायबिटीज नियंत्रणात लवंग कशी करते मदत? (How clove controls diabetes)

  • अँटी डायबिटिक व अँटी -इंफ्लेमेटरी गुणसत्व असणाऱ्या लवंगांमुळे इंसुलीनचा स्तर नियंत्रित राहतो .
  • अँटी ऑक्सिडंट्स पॅनक्रियाजमध्ये इन्सुलिन तयार करण्याचा वेग वाढवतात.
  • लवंगांमध्ये व्हिटॅमिन सीचा मुबलक साठा असतो. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

लवंगाचे शरीराला अन्य फायदे (Benefits Of Cloves)

  • लवंग पाण्यात भिजवून ठेवल्यास ते पाणी प्यायल्याने पचनप्रक्रिया सुद्धा वेगवान होऊ शकते. तुम्हाला जर शौचास साफ न होण्याची समस्या असेल तर लवंगाच्या पाण्याने नक्कीच मदत होऊ शकते.
  • लवंगाचे सेवन तुमच्या शरीरातील जंत बाहेर काढून टाकण्यास मदत करतात.
  • प्रवासात मळमळ जाणवत असेल तर लवंगाचे सेवन फायदेशीर ठरते.
  • दृष्टी कमजोर झाली असल्यास सुद्धा लवंगाच्या सेवनाने फायदा होऊ शकतो.
  • दातदुखीवर सुद्धा लवंग परिणामकारक आहे.
  • थंडीच्या दिवसात सतत कफ होत असल्यास लवंगाचे सेवन करून आराम मिळू शकतो.

हे ही वाचा<< बटाटा, टोमॅटो व पेरू भाजून खाल्ल्याने ‘हे’ ३ त्रास झपाट्याने होतात कमी? अन्यथा थंडीत होऊ शकतो खूपच त्रास

डायबिटीज रुग्णांनी लवंगाचे सेवन कसे करावे? (How To Eat Cloves In Diabetes )

ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी डायबिटीजच्या रुग्णांनी एक ग्लास पाण्यात ८ ते १० लवंगा बिजवून ठेवाव्यात, नंतर हे पाणी उकळून थंड करून ठेवावे. हे पाणी प्यावे व नरम झालेल्या लवंगा सुद्धा चघळून एक एक करून खाऊ शकता.