Diabetes Risk Factors: सध्याचा काळ हा डिजीटलचा काळ आहे जिथे लॅपटॉप आणि मोबाईलचा सर्रास वापर केला जात आहे. दिवसरात्र लॅपटॉप आणि मोबाईल वापरत असल्यामुळे आपला स्क्रिन टाईम मोठ्या प्रमाणात वाढत आहे. स्क्रिन टाईम वाढत असल्यामुळे मोबाईल आणि लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशाचे दुष्परिणाम देखील समोर येत आहे. याबाबत कित्येक संशोधन आणि माहिती आपल्या कानावर पडत असते. दरम्यान आता महिलांना झोपण्यापूर्वी घरातील प्रकाशाचे दिवे मंद करण्याचा सल्ला शास्त्रज्ञांनी दिला आहे. यामुळे गरोदरपणातील डायबिटीजचा धोका कमी होते असा दावा त्यांनी केला आहे.

अमेरिकन वैद्यकीय मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेला लेख युएसमधील नॉर्थवेस्टर्न मेडिसिनतर्फे पार पडलेल्या संशोधनावर प्रकाश टाकतो. प्राप्त माहितीनुसार, झोपेपूर्वी तीन तास कॉप्युटर स्क्रिन, स्मार्ट फोन सारख्या डिव्हाईसमधून येणारा प्रकाश देखील दूर ठेवावा असे सांगण्यात आले आहे. सहाय्यक प्राध्यापक मिंजी किम सांगतात की “झोपेच्या वेळेपूर्वी प्रकाशाच्या संपर्कात येणे हे गरोदरपणातील मधुमेहाचे कारण ठरू शकते. प्रौढांमध्ये याचा थेट संबंध ग्लुकोजच्या पातळीत चढ उतार होण्याशी असल्याचे सुद्धा अभ्यासात दिसून आले आहे”

curd and coffee for tan removal
Tan Removal Remedy : चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी करा उपाय! दही व कॉफीचा लावा मास्क; पण डॉक्टरांचे मत काय?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
difference between shivlinga jyotirlinga
शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यात नेमका फरक काय?
four days week in japan
विश्लेषण : जन्मदर वाढविण्यासाठी जपानमध्ये चार दिवसांचा आठवडा..! काय आहेत कारणे? योजना कशी राबवणार?
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
dharmarajya party agitation against evm in thane
ईव्हीएम यंत्राविरोधात धर्मराज्य पक्षाकडून आंदोलनाला सुरूवात; शहरातील चौका-चौकात ईव्हीएम हटविण्यासाठी मतदान
Do you let children drink tea
तुम्ही लहान मुलांना चहा प्यायला देता का? मग हा VIDEO एकदा पाहाच
Benefits of eating tup chapati
पोळीला तूप, साखर लावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे; पण खाण्याची योग्य वेळ कोणती?

गरोदरपणातील मधुमेह कसा ठरतो धोक्याचा?

संशोधनांर्तगत गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत असणाऱ्या महिलांच्या रक्तातील साखरेची पातळी अभ्यासण्यात आली होती. गरोदर महिलांमधील मधुमेह हा प्रसूतीच्या वेळी गुंतागुंत वाढवू शकतो. यामुळे आईला मधुमेह, हृदयरोग आणि स्मृतिभ्रंश होण्याचा धोका असतो. तसेच बाळाला देखील लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाब होण्याची शक्यता असते. किम सांगतात की, गरोदर महिलांमध्ये मधुमेह असल्यास टाइप २ मधुमेह होण्याची शक्यता १० पट जास्त असते.

झोपण्यापूर्वी अतिउजेड असल्यास..

झोपण्यापूर्वी अतिउजेडात आल्यामुळे ह्रदयाचे ठोके वाढतात आणि आणि ओटीपोटात फॅट्स जमा होण्याचा धोका असतो. याशिवाय रक्तात इन्सुलिन प्रतिरोध वाढून रक्तदाब वाढू शकतो. तसेच हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी विकारांचा सुद्धा धोका वाढू शकतो.

हे ही वाचा<< नारळामध्ये जास्त पाणी व खोबरं आहे का कसे ओळखाल? ‘या’ सात सोप्या टिप्स नेहमी लक्षात ठेवा

दरम्यान, किम सांगतात की, नक्की कोणत्या प्रकारच्या प्रकाशामुळे नुकसान पोहचत आहे हे अद्याप उघड झाले नाही परंतु हे सर्व एकत्रितपणे कारणीभूत असू शकतात. झोपण्यापूर्वी तीन तास आधी तुमच्या आसपासच्या वातावरणामधील प्रकाश कमी करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या पूर्ण दिवसभराच्या कामात प्रकाश नसावा असे नाही पण हा प्रकाश झोपण्यापूर्वी काही तास आधीपासून पुरेसा मंद असाला पाहिजे. जर नियमित सवय लावली तर संध्याकाळपासून आपण जे काही काम करतो त्यासाठी कदाचित आपल्याला इतक्या प्रकाशाची गरज भासणार नाही.

Story img Loader