भारतासह जगभरात मधुमेह असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आपण या आजाराला बळी पडू नये यासाठी सध्या तरुण मंडळी तब्बेतीकडे विशेष लक्ष देत असल्याचे जाणवते. तर ज्यांना हा आजार झाला आहे ते अधिक फिट राहण्याच्या प्रयत्नात असतात. मधुमेह असणाऱ्या रुग्णांना आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण जेवणातील काही पदार्थांमुळे, रोजच्या काही सवयींमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते. यावर उपाय करण्यासाठी काही उपाय फायदेशीर ठरू शकतात. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी कोणते उपाय मदत करतात जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्लड शुगर वाढवतात गव्हाच्या पोळ्या? ‘या’ ३ पिठांचा पर्याय ठरू शकतो बेस्ट; डायबिटीजमध्ये दिवसात किती पोळ्या खाव्यात?

रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करणारे उपाय

  • शरीरासाठी आवश्यक असणारे कार्बोहायड्रेटचे पर्याय निवडा. तेलकट पदार्थ खाणे टाळा.
  • सकाळी चहा, कॉफी अशा पेयांचे सेवन करणे टाळा. जर तुम्हाला अशी पेयं पिण्याची सवय असेल तर दालचिनीचा चहा यासाठी एक पर्याय ठरू शकतो.
  • शरीरासाठी अपायकारक ठरणाऱ्या फॅट्सचे सेवन टाळा, कारण यामुळे शरीरातील सुज वाढू शकते.
  • रोज नियमितपणे योगा, व्यायाम करण्याची सवय लावा, या सवयींमुळे निरोगी राहण्यासह रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत मिळते.
  • नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण यांनंतर १५ मिनिटं चाला, यामुळे जेवणानंतर रक्तातील साखर वाढणार नाही.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diabetes tips how to control blood sugar make these changes in daily diet pns
Show comments