बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि अनुवंशिकता आदी कारणांमुळे देशात सध्या मोठ्या प्रमाणात मधुमेहाचे रुग्ण आढळून येत आहेत. शरीरातील साखर अति प्रमाणात वाढल्यास मधुमेहाचा जास्त त्रास होतो. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे फार महत्वाचे असते. मधुमेहाच्या समस्येमध्ये शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नाही, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रक्तामधील साखरेची पातळी एका मर्यादेपेक्षा जास्त वाढल्यामुळे मधुमेह ही आयुष्यभर चालणारी स्थिती तयार होते. मधुमेहावर कायमस्वरूपी कोणताही उपचार नाही. पण, ते नियंत्रणात ठेवल्यास आपण सामान्य जीवन जगू शकतो. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक औषधेही उपलब्ध आहेत. मधुमेहाच्या बाबतीत शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

लहान मुलं, तरुणांमध्ये हा आजार अगदीच नगण्य प्रमाणात आढळून येत होता. मात्र, आता सर्व वयोगटांतील व्यक्ती या आजारानं त्रस्त असल्याचं दिसून येतं. गेल्या काही वर्षांत मधुमेह ग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. पण, कमी वयात मधुमेह झाल्याने तुमचे आयुर्मान कमी होऊ शकते का? चला तर जाणून घेऊया नुकत्याच प्रकाशित झालेल्या अभ्यासातून कोणता खुलासा करण्यात आलाय, या विषयीची माहिती इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना फोर्टिस सी-डॉक रुग्णालयाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. अनुप मिश्रा यांनी दिली आहे.

(हे ही वाचा : नवरात्रीच्या उपवासात साबुदाणा खाल्ल्यानं रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते? डॉक्टर काय सांगतात…)

जर्नल ‘लॅन्सेट’ मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, लहान वयात मधुमेहाचे निदान झाल्यास तुमचे आयुष्य अक्षरशः कमी होऊ शकते. मधुमेह नसलेल्या लोकांच्या तुलनेत ३० वर्षांच्या वयात निदान झालेली लोकं १४ वर्षे आधी मरण पावल्याचे या अभ्यासातून उघड झाले आहे. तर १९ उच्च उत्पन्न असलेल्या देशांतील डेटाच्या विश्लेषणानुसार, ४० व्या वर्षी निदान झालेल्यांचा १० वर्षांपूर्वी मृत्यू झाला आणि ५० वर्षांच्या निदान झालेल्यांचा मृत्यू सहा वर्षांपूर्वी झाला, असे अभ्यासातून समोर आले आहे.

डॉ. मिश्रा सांगतात, मधुमेह हा एक गंभीर आजार आहे, जो मुळापासून बरा होऊ शकत नाही. हा जीवनशैलीचा एक भाग बनून जातो. रक्तातील साखरेची उच्च पातळी रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवू शकते. जर तुम्हाला मधुमेह नियंत्रणात ठेवायचा असेल तर खाण्याच्या सवयींवर लक्ष देणे गरजेचे आहे. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहार आणि जीवनशैली या दोन्हींमध्ये बदल करणे अत्यंत आवश्यक आहे. देशात कमी वयात मुधमेह होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. देशातील अनेक लोकं मधुमेहासारख्या भयंकर रोगाच्या विळख्यात आले आहेत.

मधुमेह हा एक असा आजार आहे, जो आपल्या शरीरातील अनेक अवयवांवर परिणाम करू शकतो. त्यामुळे डोळे, किडनी, हृदय आणि त्वचेवरही परिणाम होतो. अनुवंशिकता हेदेखील मधुमेह होण्यामागे एक महत्त्वाचं कारण मानलं जातं. बहुतांश लोकांच्या आहारात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण अधिक असते. त्या आहारात प्रथिनांनाही जागा दिली पाहिजे. भाज्या-फळं अशा कच्च्या आहाराचं प्रमाण वाढवलं पाहिजे. साखर आणि गोड पदार्थ, चॉकलेट्सचं प्रमाण कमी केलं पाहिजे. डॉ. मिश्रा म्हणतात, मधुमेहाचे निदान झालेल्या प्रत्येकानी रक्तातील ग्लुकोज, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी या तीन घटकांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diagnosis of diabetes at a younger age can literally cut your life short according to a recent paper in the journal lancet pdb
Show comments